Back
शशिकांत शिंदे यांचे जल्लोषात स्वागत, साताऱ्यात फटाक्यांची आतिषबाजी!
TTTUSHAR TAPASE
FollowJul 19, 2025 10:08:07
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE
5 FILES
SLUG NAME -SAT_SHINDE_SWAGAT
सातारा - नवनिर्वाचित शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे साताऱ्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले.साताऱ्यातील सारोळा पूल,शिरवळ,वेळे,भुईंज , पाचवड आणि सातारा शहरात कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबी मधून मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली.त्याच बरोबर भले मोठे हार क्रेन च्या सहाय्याने शशिकांत शिंदे यांना घालण्यात आले.
*प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बाईट पॉइंटर..*
शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व सामान्य कार्यकर्त्याला मान दिला आहे.. पक्षांमध्ये अनेक दिग्गज नेते ताकतीचे होते मात्र पवार साहेबांनी आणि पक्षांनी प्रदेश अध्यक्ष पदाची संधी मला दिली.. आमच्यातीलच मंडळी फोडून भाजपने आपला बालेकिल्ला तयार केला असला तरी नवीन सारथी घेऊन पुन्हा बालेकिल्ला उभा करणार आहे अशी टीका प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली..
राष्ट्रवादीच्या विलीनी करणाच्या चर्चा सुरू असल्या तरी मी पक्ष वाढी साठी प्रयत्न करणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे तो दूर झाला पाहिजे.. शरद पवारांचे विचारायचा महाराष्ट्र पुन्हा कार्यकर्ते उभे करतील हा संदेश मला द्यायचा आहे..
महाराष्ट्राला विधानसभेची निवडणूक कशी झाली माहिती आहे, महाविकास आघाडीला लोकसभेला चांगले यश आल्यानंतर भाजप सावध झाल आणि त्यांनी निवडून येण्यासाठी काही योजना आणल्या रणनीती आखली त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला.. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज होती मात्र तो केलेला नाही. लाडक्या बहिणी योजनेला देखील कात्री लावण्याचे काम केले जात आहे. मागासवर्गीय समाजाचा निधीदेखील वळवण्याचा प्रयत्न केला जातो.. समाजामध्ये जागृती केली तर या सरकारची नाराजगी दिसून येईल..
अजित पवार मुख्यमंत्री हवेत या प्रश्नावर येणारा दिवस काय होईल ते माहित नाही मात्र माझी पार्टी मी कशी मजबूत होईल यासाठी मी प्रयत्न करणार.. 2029 ला शरद पवार त्यांच्या पक्षाची सत्ता कशी याचा प्रयत्न करणार..
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही असं सांगावं लागतं यामध्येच शंका आहे. मुख्यमंत्र्यांना सातत्याने असं विधान का करावं लागतं हे मला समजत नाही. हिंदी भाषेवरून सक्ती करण्याचे काम सुरू आहे.दिल्ली मधून आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत असेल याचा अर्थ मुंबई वेगळी करण्याचा निर्णय होतोय का अशी शंका लोकांच्या मनात आहे..
माझ्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जरी जबाबदारी दिली असली तरी लगेच मी यश आणू शकत नाही. प्रयत्न करणं आपलं काम आहे. महाराष्ट्रातील जनता खासदारकीला आणि आमदार केला इतिहास घडवू शकते. तर ही जनता कोणत्याही प्रकारचा अरेरावी पाना, हुकूमशाही खपवून घेणार नाही. फक्त आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे.. मंग उद्याचा परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल..
ही लढाई विकास निधीची राहिलेली नाही, आत्ता सत्ता टिकवण्यासाठी हुकूमशाही दडपशाहीची रणनीती आखली जात आहे.
कर्जमाफीची आश्वासन सरकारने दिले होते. अधिवेशना मध्ये देखील आम्ही प्रश्न उपस्थित केला मात्र त्याला कोणतेही उत्तर मिळालेले नाही. कर्जमाफीचे आश्वासन देऊन मत घेतली आहेत जनता यांना माफ करणार नाही.. या सरकारवर काय परिणाम होतील ते शेतकरी वर्ग दाखवून देणार..
हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सर्व विरोधक जर एकत्र आले तर या सरकारची मस्ती उतरवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही..
7
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement