Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण पूर्वेत कचरा प्रकल्पावर आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात!

ABATISH BHOIR
Jul 19, 2025 06:37:32
Kalyan, Maharashtra
कल्याण पूर्वेत आरक्षित जागेवर कचरा प्रकल्प! AAP-BJP कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन करत आंदोलन आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतली ताब्यात! Anc..कल्याण पूर्वेतील शंभर फुटी रोड परिसरात गार्डनसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर महानगरपालिकेकडून घनकचरा प्रकल्प सुरू करण्यात आल्याच्या विरोधात आज स्थानिक नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आम आदमी पार्टी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मिळून ठिय्या आंदोलन केले पालिकेकडून कोणतीही लेखी परवानगी न दाखवता गुपचूपपणे हा प्रकल्प राबवला जात असल्याचा आरोप करत कार्यकर्ते अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले ." ह्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे," असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.महानगरपालिका सध्या डम्पिंग ग्राउंडवरील ताण टाळण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी घनकचरा वर्गीकरण प्रकल्प सुरू करत आहे. अशाच प्रकारे, कल्याण पूर्वेतील गार्डनसाठी आरक्षित भूखंडावरही शहराचा कचरा आणून त्यावर प्रक्रिया केली जात आहे. मात्र या प्रकल्पाला आंदोलक आणि स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध दर्शवत असून या नागरिकांची पालिकेच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलन उग्र रूप धारण करताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top