Back
जेलमधून पळालेल्या अनिल पटेनियाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 19, 2025 01:01:56
Ambernath, Maharashtra
जेलमधून पळालेल्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना येरवडा जेल मधून होता पळाला
Ulh arrest
Anchor जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जेलमधून पाळलेल्या आरोपीला उल्हासनगरच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, अनिल पटेनिया असे या आरोपीचे नाव असून तो पुण्याच्या येरवडा जेलमधून पळाला होता.
Vo मोबाईल लोकेशन आणि गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक इसम हा चोरीस गेलेली दुचाकी वरून उल्हासनगर खेमानी परीसरात फिरत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती . त्या माहितीच्या आधारे सदर आरोपीला पकडून पोलिसांनी ताब्यात घेतले , त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अनिल पटेनिया असे सांगितले , तसेच सदर दुचाकी ही चोरुन आणल्याचाही कबूलिही त्याने दिली, तसेच त्याचेकडे आणखीन विचारपुस केली असता सदर आरोपीवर टिटवाळा पोलीस ठाण्यात 302 चा गुन्हा दाखल आहे. तसच तो पुण्याच्या एरवडा जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पायल याची माहिती ही मिळाली. त्यानंतर सदर आरोपीस पकडून पोलिसांनी न्यायालय हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
Byte dcp
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
13
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowJul 19, 2025 10:08:07Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
5 FILES
SLUG NAME -SAT_SHINDE_SWAGAT
सातारा - नवनिर्वाचित शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे साताऱ्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले.साताऱ्यातील सारोळा पूल,शिरवळ,वेळे,भुईंज , पाचवड आणि सातारा शहरात कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबी मधून मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली.त्याच बरोबर भले मोठे हार क्रेन च्या सहाय्याने शशिकांत शिंदे यांना घालण्यात आले.
*प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बाईट पॉइंटर..*
शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व सामान्य कार्यकर्त्याला मान दिला आहे.. पक्षांमध्ये अनेक दिग्गज नेते ताकतीचे होते मात्र पवार साहेबांनी आणि पक्षांनी प्रदेश अध्यक्ष पदाची संधी मला दिली.. आमच्यातीलच मंडळी फोडून भाजपने आपला बालेकिल्ला तयार केला असला तरी नवीन सारथी घेऊन पुन्हा बालेकिल्ला उभा करणार आहे अशी टीका प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली..
राष्ट्रवादीच्या विलीनी करणाच्या चर्चा सुरू असल्या तरी मी पक्ष वाढी साठी प्रयत्न करणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे तो दूर झाला पाहिजे.. शरद पवारांचे विचारायचा महाराष्ट्र पुन्हा कार्यकर्ते उभे करतील हा संदेश मला द्यायचा आहे..
महाराष्ट्राला विधानसभेची निवडणूक कशी झाली माहिती आहे, महाविकास आघाडीला लोकसभेला चांगले यश आल्यानंतर भाजप सावध झाल आणि त्यांनी निवडून येण्यासाठी काही योजना आणल्या रणनीती आखली त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला.. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज होती मात्र तो केलेला नाही. लाडक्या बहिणी योजनेला देखील कात्री लावण्याचे काम केले जात आहे. मागासवर्गीय समाजाचा निधीदेखील वळवण्याचा प्रयत्न केला जातो.. समाजामध्ये जागृती केली तर या सरकारची नाराजगी दिसून येईल..
अजित पवार मुख्यमंत्री हवेत या प्रश्नावर येणारा दिवस काय होईल ते माहित नाही मात्र माझी पार्टी मी कशी मजबूत होईल यासाठी मी प्रयत्न करणार.. 2029 ला शरद पवार त्यांच्या पक्षाची सत्ता कशी याचा प्रयत्न करणार..
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही असं सांगावं लागतं यामध्येच शंका आहे. मुख्यमंत्र्यांना सातत्याने असं विधान का करावं लागतं हे मला समजत नाही. हिंदी भाषेवरून सक्ती करण्याचे काम सुरू आहे.दिल्ली मधून आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत असेल याचा अर्थ मुंबई वेगळी करण्याचा निर्णय होतोय का अशी शंका लोकांच्या मनात आहे..
माझ्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जरी जबाबदारी दिली असली तरी लगेच मी यश आणू शकत नाही. प्रयत्न करणं आपलं काम आहे. महाराष्ट्रातील जनता खासदारकीला आणि आमदार केला इतिहास घडवू शकते. तर ही जनता कोणत्याही प्रकारचा अरेरावी पाना, हुकूमशाही खपवून घेणार नाही. फक्त आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे.. मंग उद्याचा परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल..
ही लढाई विकास निधीची राहिलेली नाही, आत्ता सत्ता टिकवण्यासाठी हुकूमशाही दडपशाहीची रणनीती आखली जात आहे.
कर्जमाफीची आश्वासन सरकारने दिले होते. अधिवेशना मध्ये देखील आम्ही प्रश्न उपस्थित केला मात्र त्याला कोणतेही उत्तर मिळालेले नाही. कर्जमाफीचे आश्वासन देऊन मत घेतली आहेत जनता यांना माफ करणार नाही.. या सरकारवर काय परिणाम होतील ते शेतकरी वर्ग दाखवून देणार..
हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सर्व विरोधक जर एकत्र आले तर या सरकारची मस्ती उतरवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही..
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 19, 2025 10:04:15Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Jarange Press
File:03
Rep: Hemant Chapude(Khed)
*मनोज जरांगेपाटील बाईट *
- मराठा आणि धनगर वेगळा नसुन एकच आहे जरांगे पाटलांना पाठिंबा दिलाय
- आम्ही वेगळे नव्हतो आणि यापुढे नसणार धनगरांच्या पाठिंब्यावर जरांगेची प्रतिक्रिया
- कारण नसताना मराठा समाजाच्या आरक्षाणाला धनगरांचा विरोध नाही
*आव्हाड पडळकर वाद...!*
- गोट्या खेळायचा खेळ आहे यांचे काहीच खरे नसते
- हि खरी भांडणं करतात मुद्दाम भांडण करतात अशी शंका जरांगेंनी व्यक्त केली
*मुबंई मोर्चा ..*
पहिल्यापेक्षा पाचपटने अधिक संख्येने मराठा समाज या मोर्चात सहभागी असेल
अंतर वाली मार्गे आहिल्यानगर शिवनेरी,माळशेज घाट कल्याण मार्गे मुंबई धडकणार
*ठाकरे बंधु एकत्र*
- दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही
- जुनी म्हण आहे कि *"मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे"*
- कुठल्याही पक्षाचा असला तरी प्रत्येकाचे मत मुंबईत ठाकरेच असावे असं होतं.पण कशासाठी म्हणत होते माहिती नाही
- दोन भावांनी एकत्र यावं
- वेगळे लढले तरी पडतात मग एकत्र येऊन पडु द्या
- पण लोकांची इच्छा आहे ना दोन ठाकरेंनी एकत्र यावं मग त्यांनी एकत्र यावं..
- लोकांची इच्छा आहे दोघांनी एकत्र यावं आमचा काही फायदा नाही एकदा होऊन जाऊ द्या
*राष्ट्रवादी एकत्र..*
- दोन राष्ट्रवादी वेगळ्या नव्हत्याच आता कुठुन एकत्र यायचं दोन राष्ट्रवादी वेगळ्या हे लोकांना दाखवायला आहे राजकारणी छक्केपंज्जे दाखवतात
*राज ठाकरे*
- राज ठाकरे आज गुजरातवर बोलत आहे मात्र पुर्वी यांनीच गुजरातचा प्रचार केला जरांगेंनी राज ठाकरे ना मोंदीच्या प्रचाराची आठवण करुन दिली
-
*देवेंद्र फडणवीस इशारा...*
- संजय शिरसाटांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा जात प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी रोखण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय
- मला मिळालेली माहिती खरी असुन असले चाळे बंद करा
- प्रमाणपत्र रोखुन धरु नका वेळ वाईट येईल जरांगेंचा फडणवीसांना इशारा
*१९ ऑगस्ट आझाद मैदान मोर्चा...*
- मागच्या वेळी जरांगेच्या मोर्चा लोणावळा मार्गे मुंबई होता मात्र यावेळी हा मोर्चा शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेज मार्गे कल्याण ठाणे चेंबुर करुन आझाद मैदानावर धडकणार असुन माळशेज घाटातुन खाली उतरल्यावर मराठ्यांचा मोर्चा हा एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातुन निघणार आहे याबाबत विचारलं असता जरांगेंनी आम्ही निस्वार्थी भावनेने पुढे जातोय कल्याण मार्गे जवळचा रस्ता असल्याने हा मार्ग निवडला...
- मागच्या वेळी मुंबईत येऊन एकनाथ शिंदे नी मध्यस्थी केली होती यावर बोलताना आम्ही कुणाच्या सांगण्यावरुन थांबत नाही असा टोला जरांगेंनी लावला
- हा मोर्चा शिंदे ना टार्गेट असे छक्केपंज्जे खेळत नाही मी थोड्या दिवसाचा पाहुणा माझे शरीर मला साथ देत नाही जाताना शिवनेरीची माती कपाळाला लावुन जाणार आहे परत माघारी येईल याची खात्री नाही
Byte: मनोज जरांगे पाटील
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 19, 2025 09:38:42Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1907ZT_WSM_KHATNAPUR_ROAD
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशिम च्या कारंजा तालुक्यातील खतनापूर–इमामपूर–बांबर्डा–कामरगांव हा शेतकऱ्यांच्या दैनंदिन दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून, कारंजा बाजार समितीशी थेट जोडणारा हा मार्ग आजही ग्राम रस्ता क्रमांकाच्या प्रतीक्षेत आहे. हजारो हेक्टर शेतीला जीवनदायिनी असलेला हा रस्ता क्रमांकाअभावी विकासापासून वंचित राहिला आहे.तसेच शेती कामासाठी पावसाळ्यात या रस्त्यावरून जाताना चिखलातुन जावं लागतं शेतकऱ्यांना अडचणीला समोर जावं लागत त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी तातडीने रस्ता क्रमांक मंजूर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली जातं आहे.
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 19, 2025 09:32:58Kalyan, Maharashtra:
उल्हासनगरमध्ये तिकट बुकिंगच्या नावाखाली महागड्या विदेशी दारूची तस्करी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण विभागाच्या भरारी पथकाने पोलखोल करत केली कारवाई
एकाला अटक , 1लाख किमतीचे विदेशी मद्य जप्त
Anc...तिकीट बुकिंग च्या नावाखाली बेकायदेशीरपणे महागड्या विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या एका इसमाला राज्य उत्पादन शुल्कच्या कल्याण विभागाच्या पथकाने उल्हासनगर येथे एका दुकानात छापा टाकत केली आहे .परदेशातून विनापरवाना आयात केलेल्या 1 लाख 7 हजार रुपये किमतीच्या 21 विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.राजेश विषणदास छाबरिया असे आरोपीचे नाव आहे . राज्य उत्पादन शुल्कच्या कल्याण विभागाच्या भरारी पथक निरीक्षक दीपक परब यांच्या पथकाने हि कारवाई केली.
0
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 19, 2025 09:32:48Kolhapur, Maharashtra:
Kop Mahadik Gokul PKG
Feed :- Live U & 2C
Anc :- कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीला अजून एक वर्ष शिल्लक आहे. पण गोकुळचे संचालक पद 21 वरून 25 करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतल्यानंतर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे गोकुळचा राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे..
VO 1:- गोकुळ दूध संघाच्या चेअरमन पदी महायुतीचे नावेद मुश्रीफ यांची नुकतीच निवड करण्यात आली. असं असलं तरी गोकुळचे सत्ताधारी नेते हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हेच गोकुळचा कारभार चालवत आहेत. नुकताच गोकुळच्या संचालकांची बैठक पार पडली या बैठकीत गोकुळचे संचालक संख्या 21 वरून 25 करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी संचालक संख्या वाढीला विरोध करत आक्षेप नोंदविला आहे.
Byte :- शौमिका महाडिक, विरोधी संचालिका
VO 2:- गोकुळच्या विरोधी संचालिका शोमीका महाडिक यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत विरोध केला होता. त्यानंतर आता माजी आमदार महादेवराव महाडिक आणि त्यांचे पुतणे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी सुद्धा कंबर कसली आहे. पुढील वर्षी गोकुळची पंचवार्षिक निवडणूक होत आहे, त्या पार्श्वभूमीवर महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांची देखील बैठक पार पडली. या बैठकीत दूध उत्पादक आणि गोकुळचे नुकसान करणाऱ्या नेत्यांना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संचालक वाढीचा निर्णय होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे अशी भूमिका घेतली आहे.. सध्या गोकुळची सत्ता मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या हातात आहे.. महाडिक यांचे कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या सतेज पाटील यांना सत्तेतून बाजूला ठेवण्यासाठी महाडिक यांनी यापूर्वीच राजकीय खेळी करायला सुरुवात केलीय.. पण सहकारात राजकारण नको म्हणणारे मंत्री हसन मुश्रीफ या विरोधाला किती किंमत देतात यावरच गोकुळ मधील आगामी राजकारण आवलंबून आहे. पण सद्यातरी महाडिक यांनी संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाला कडाडून विरोध केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र पातळीवर नेत्यांची देखील मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे गोकुळ पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर संचालक संख्या वाढीचा घेतलेला निर्णय आगामी गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीवर परिणाम करणार हे नक्की.
प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 19, 2025 09:32:11Chandwad, Maharashtra:
अँकर:-
*चांदवड शहरात बाजारतळातील पेटीशॉपचे गाळे मिळण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या गाळेधारकांना न्याय द्यावा याकरता ठिय्या आंदोलन करण्यात आले यानंतर नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 19, 2025 09:06:20Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Lonikand Bhima River Man Death
File:01
Rep: Hemant Chapude(Pune)
Anc :पुण्याच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भीमा नदीत एका अन्द्यात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस येताच लोणीकंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला असून लोणीकंद पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया लोणीकंद पुणे...
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 19, 2025 09:06:12Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn rebbis update
feed attched
छत्रपती संभाजीनगरच्या म्हारोळा गावात एक आगळावेगळा प्रकार घडला आहे. आठ दिवसांपूर्वी या गावातील एका गायीच्या वासराला पिसाळलेला कुत्रा चावला. काल सकाळी हा वासरू मृत्युमुखी पडला. विशेष म्हणजे वासरू गायीचं दूध पित असल्याने गायीला देखील याचं इन्फेक्शन झाल्याची अफवा गावात पसरली. बरं या गाईचं दूध गावातील अनेक घरांना पुरवठा केला जात होता. त्यामुळे आपल्याला देखील इन्फेक्शन होईल म्हणून अख्ख गावं शासकीय रुग्णालयात रेबीजच इंजेक्शन घेण्यासाठी पोहचेले आहे. परिस्थिती अशी आहे की रुग्णालयात इंजेक्शन पुरत नाही. लोक रुग्णालयात रांगा लावून इंजेक्शन घेत आहे
byte 2 गावकरी आहे
byte डॉ. प्रणिती म्हात्रे, वैद्यकीय अधिकारी
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 19, 2025 09:03:31Chandwad, Maharashtra:
अँकर:- चांदवड शहराच्या आठवडे बाजार मध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत ओरबडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या पार्श्वभूमीवर
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेग बिर सिंगसंधू उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलिसांनी सापळा रसून पोत चोरणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले आहे. या महिलां विरुद्ध चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ तपास करत आहे
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 19, 2025 09:02:24Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - संरक्षण शस्त्र सामग्री तयार करणाऱ्या प्रकल्पाविरोधात खंडाळा येथे मोर्चा
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याच मतदार संघात प्रकल्पाची घोषणा
प्रकल्पासाठीची जमीन अधिग्रहण सूचना रद्द करावी यासाठी मोर्चा
मोर्चा झाल्यानंतर असीम सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 19, 2025 09:00:26Ambernath, Maharashtra:
बदलापुरात ज्वेलर्समध्ये चोरी!
दत्तवाडी परिसरातील मराठा ज्वेलर्स फोडलं!
बदलापूर पूर्व पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल
पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
Bdl theft
Anchor : बदलापूरच्या दत्तवाडी परिसरात चोरट्यांनी ज्वेलर्स फोडल्याची घटना घडलीये. शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हे दुकान फोडलं असून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Vo : बदलापूरच्या दत्तवाडी परिसरातील मराठा ज्वेलर्स चोरट्यांनी फोडलंय. या दुकानाच्या बाहेरची ग्रील तोडून शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि चोरी केली. यात नेमका किती मुद्देमाल चोरीला गेलाय, याचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, दत्तवाडी परिसरात चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 19, 2025 08:38:11Akola, Maharashtra:
10 फाईल्स आहेत..PKG
Note : शौच करिता जाणाऱ्या महिलांचे चेहरे ब्लर करावे..
Anchor : ' बेटी बचाव , बेटी पढाओ ' सरकारचा हा ब्रिद वाक्य अकोल्यातील मौजे सागद या गावात फोल ठरत असल्याचं दिसून येत आहेय..शाळेला जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरावस्था आणि गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी या गावातील विद्यार्थी आणि गावकरी सरसावले आहेत..
Vo 1 : 40 किलोमीटरच्या अंतरावरून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले हे विद्यार्थी आपल्या गावातील रस्ता आणि गाव हागणदारीमुक्त करण्याच्या विनंतीसाठी आले आहेत...अकोला जिल्ह्यातील मौजे सागद ते निंबा या रस्त्यावर महिला व पुरुष शौच करण्यासाठी बसतात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने आणि काटेरी झुळूप वाढल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांसाठी अडथळे निर्माण होत आहेत आणि रस्त्यांची दुरवस्था सध्या गावकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहेय..गावातील ग्रामस्थांना रस्त्याच्या दुरुस्तीच्या समस्येशी सामना करावा लागत आहेय.. गावातील हा रस्ता दुरुस्त करून गाव हागणदारीमुक्त करण्यात याव अशीया शाळकरी विद्यार्थ्यांची मागणी आहेय..
Byte : खुशी राऊत , विद्यार्थिनी
Vo 2 : रस्त्यावरून मोठे वाहन आल्यास रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने घाण असल्याने विद्यार्थ्यांना खाली सुद्धा उतरता येत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभा राहण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही.. यासोबतच शेजारील गावातील नागरिक या रस्त्यावर शौच करण्यासाठी येत असल्याने या गावातील जागृत महिलांना रोज या लोकांसोबत ' पंगा ' घ्यावा लागत आहेय.. अनेक महिलांना या ठिकाणी शौचासाठी रोखल्यास हाणामारी पर्यंतच्या गोष्टी या महिला करतात..
रस्त्यामुळे सुद्धा अनेक दुर्घटना घडतात..
ग्रामस्थांनी आता संबंधित अधिकाऱ्यांकडे रस्त्यांची दुरुस्ती आणि हागणदारी मुक्तीच्या मागणीसाठी तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली आहेय...
Byte : रत्नाबाई गवारगुरु , ग्रामस्थ..
Final Vo : हागणदारी मुक्त गाव करण्याची जबाबदारी गावकऱ्यांसोबत प्रशासनाची सुद्धा आहे त्यामुळे गावकऱ्यांनी सुरू केलेल्या या मोहिमेत प्रशासनाने सुद्धा त्यांची साथ दिली पाहिजे..
जयेश जगड,
झी मीडिया,
अकोला
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 19, 2025 08:38:03Pandharpur, Maharashtra:
19072025
Slug - PPR_MOHITE_SPEECH
feed on 2c
file 01
-----
Anchor - राष्ट्रवादीचे दोन गट एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी 2009 ते 2024 काळात एकत्र राष्ट्रवादीची वाट का लावली, आम्हाला भाजपत जाण्यासाठी का परिस्थिती तयार केली असे म्हणत आपली खदखद बोलून दाखवली आहे.
2009 मध्ये माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात अनेक जण कात्री घेऊन बसले होते. यातूनच जिल्ह्यात राष्ट्रवादी कमकुवत झाली असे म्हणत अप्रत्यक्ष अजित पवार यांच्यावर टीका केली.
पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपली मनातील खदखद बोलून दाखवली. त्यामुळे खासदाराची एकत्रित होण्याची सध्या तरी मानसिकता दिसत नसल्याचे चित्र आहे.
------
Sound Byte - खासदार धैर्यशील मोहिते पाटील
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 19, 2025 08:37:19Shirdi, Maharashtra:
Anc_ शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या योगीराज गंगागीरी महाराजांच्या 178 व्या हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळा आज वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव येथे पार पडला.. अहिल्यानगर आणी संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या शनीदेवगाव येथे हजारो भक्तांच्या उपस्थितीत अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणी महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी खासदार संदिपान भुमरे आमदार रमेश बोरणारे हे देखील उपस्थित होते येत्या 30 जुलै पासून मोठ्या भक्तीमय वातावरणात सप्ताह पार पडणार आहे..
2
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 19, 2025 08:31:09Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_KADU_ON_COMITE एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
सरकारने नेमलेली समिती कर्जमाफीसाठी आहे की उपाययोजनासाठी आहे हेच कळत नाही; येत्या 24 तारखेला चक्काजाम होणारच – बच्चू कडू
अँकर :– शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते तेव्हा सरकारच्या आश्वासनानंतर कडू यांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित केले होते या आंदोलनानंतर काल एक समिती स्थापन केली आहे यावर बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे. कर्जमुक्ती साठी सरकारने जी समिती काल नेमली त्यातून काही अर्थ बोध होत नाही. त्यामुळे येत्या 24 तारखेला संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार घेतला आहे. नेमलेली समिती कर्जमाफीसाठी आहे की उपाययोजनासाठी आहे हेच कळत नाही हे सर्व उत्तर थातुर मातुर आहे असल्याच बच्चू कडू यांनी म्हटले आहे. जोपर्यंत कर्ज माफी संदर्भात ठोस भूमिका घेतली जात नाही कर्जमाफीची तारीख सांगितली जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. दिव्यांगांचे मानधन वाढवले त्या संदर्भात सरकारचे आभारच आहे पण इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र प्रगत राज्य असून देखील दिव्यांगांना कमी मानधन देत असेही कडू म्हणाले.
बाईट :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
Share
Report