Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005

नितीन गडकरींचा कृषी विकासाचा मंत्र: AI आणि तंत्रज्ञानाची शक्ती!

AKAMAR KANE
Jul 19, 2025 04:03:09
kolhapur, Maharashtra
2c ला दोन साउंड बाईट जोडले आहे... ------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात लोकांचे प्रबोधन केले. समाज परिवर्तन केले. राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्यासाठी राष्ट्रभक्ती रुजवण्याचे काम केले, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेय...त्याचवेळी महाराजांचे विचार सर्वव्यापी करण्यासाठी, नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित विदर्भास्तरीय खंजारी भजन स्पर्धेचा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी गडकरी बोलत होते. भजने मनोरंजनासाठी नाहीत, समाजावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी आहेत. महाराजांच्या भजनांमध्ये हा भाव आपल्याला बघायला मिळतो, याचाही गडकरी यांनी उल्लेख केला. ग्रामविकास ही ग्रामगीतेची संकल्पना आहे. ग्रामीण भागाचा विकास कसा व्हायला हवा, आदर्श गाव कसे असावे हे राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये सांगितले. पण हा विचार शब्दांपुरता मर्यादित न राहता आपल्याला कृतीमध्ये उतरवावा लागेल, असेही गडकरी म्हणाले. महाराजांनी त्यांच्या जीवनात कृषी विकास, स्वच्छता आदींचा विचार पोहोचवला. त्यांच्या गीतांनी, भाजनांनी आपण भारतीय आहोत, ही भावना रुजविण्याचे काम केले, असेही ते म्हणाले. ----- नागपूर नितीन गडकरी, पॉइंटर... - *आर्टिफिशियाल इंटेलिजन्सवर काम करत आहे... यात झाडाला उत्तम वाढ करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गुगल काम करत आहे..अमेरिकेमध्ये लागलेल्या सॅटॅलाइटच्या माध्यमातून शेतात असलेल्या संत्राच्या झाडाची परिस्थिती काय आहे हे कळणार आहे... तेही मोबाईलवर येणार आहे. त्यासाठी प्रत्यक शेतात मध्ये आठ ते दहा हजार रुपयांचा खर्च आहे. तो खर्च कमी कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जमिनीत पाण्याचा ओलावा किती आहे, याची यंत्र हे सॅटेलाईट सोबत कनेक्ट असणार आहेत. त्यावरून झाडाला तहान लागली आहे, हे कळेल आणि लगेच AI च्या माध्यमातून डीप इरिगेशनने पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल*. - *झाडाला कुठल्या विटामिन्स कमी आहे. हे कळणार आहे. त्या झाडावर कुठला रोग येणार आहे आठ दिवसापूर्वीच कळेल त्यामुळे त्या माध्यमातून स्प्रे करता येईल*. - स्पेन मधील व्हॅलेन्शियां आहे हे संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शहर आहे.... तिथे एका एकरात 340 झाडं लावतात आणि 30 ते 40 टन उत्पादन घेतात.. आपल्या एका एकरात फक्त शंभर झाडे लावली जाते आणि 3 ते 4 टन उत्पादन होत. संत्राहा दर्जनाने पॅक करून विकतात. पण आपल्या संत्र्याची लूट होते.. - तिथं या सगळ्याच शूट केलं आणि नागपूरला आलं यावर ऍग्रो व्हिजन च्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना दाखवलं.. - *दाखवताना फुकट देण्याची किंमत होत नाही. माझा अनुभव खराब आहे.. जरी राजकारणात असलो तरी विचार स्पष्ट आहे गरज असेल तर मत द्या नाहीतर देऊ नका... (दारू) हे पाजणार नाही, आणि ते(मटन) खायला देणार' नाही". - अडीचशे रुपये तिकीट लावल्यावरही साडे सहाशे शेतकरी आले. साडेचार तास त्यांनी व्हॅलेंशीया मधील संत्रा उत्पादनाचा तंत्र समजून घेतलं आणि त्याचा अवलंब केला... याचा परिणाम झाल.. शेतकऱ्यांनी ते तंत्रज्ञान अवलंबला सुरुवात केली आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसे वाढतील यासाठी प्रयत्नशील झालेले आहे. - यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावल्यास उत्पादनात वाढ होईल आणि खऱ्या अर्थाने तुकडोजी महाराजांचे कृषी आणि ग्रामीण विकासाच स्वप्न पूर्ण होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत.
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top