Back
मनपाने 4000 मालमत्तांचे केले पाडणे, रस्त्यांच्या निधीचा प्रश्न अद्याप अनुत्तरीत!
VKVISHAL KAROLE
FollowJul 19, 2025 03:00:36
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn encroachment av
Feed attached
मनपाने सर्व्हिस रोडसाठी सुमारे ४००० मालमत्ता पाडल्या. मात्र रस्ते तयार करण्यासाठी निधी कोठून आणणार या प्रश्नावर शासनाकडून तोडगा काढण्यात आला आहे. जो रस्ता ज्या विभागाकडे देण्यात आला त्या रस्त्याचे काम त्या विभागाने करायचे आहे असा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, आमदार अनुराधा चव्हाण, मनपा आयुक्त जी. श्रीकांत आणि संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या सर्व रस्त्यांच्या कामाचा डीपीआर सादर करण्याचे आदेश शिवेंद्रसिहराजे यांनी दिले. पहिल्या टप्प्यात मनपाने प्रमुख पाच रस्ते मोकळे केले असून आता अंतर्गत रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, दिल्ली गेट ते महावीर चौक अशी मार्किंग शुक्रवारी करण्यात आली, तर वाळूज येथील रस्ता रुंदीकरणात १२०० मालमत्ता बाधित होणार असून त्याची मार्किंग पूर्ण झाली आहे.
'
3
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowJul 19, 2025 12:12:10Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_JOSHI
राज्यात हिंदी सक्ती नको मराठी अभिनेता स्वप्निल जोशी याचं परखड मत
ज्याला हिंदी शिकायची त्याला हिंदी शिकू द्यावी पण हिंदीची शक्ती नको ,मराठी म्हणून माझं वैयक्तिक मत
मराठी हिंदीच्या वादावर अभिनेता स्वप्नील जोशी यांना हिंदी सक्तीला केला विरोध
तर मी आयुष्यात ऑनलाइन जुगाराची जाहिरात करणार नसल्याचा घेतला निर्णय
पाच वर्षांपूर्वी मी या जाहिराती करत होतो पण मला काही संघटना व्यक्तींनी निवेदन दिल्यानंतर त्या जाहिराती थांबवल्या
व यापुढे त्या ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती करणार नसल्याचा निर्णय घेतला असल्याचं अभिनेता स्वप्नील जोशी यांनी सांगितला आहे
अभिनेता स्वप्नील जोशी धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या वन मोहिमेसाठी धाराशिव जिल्ह्यात आला होता
Byte_ स्वप्निल जोशी अभिनेता
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 19, 2025 12:10:08Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: निवडणुका जाहीर होण्या आधीच नाईकांनी सांगितले प्रचाराचे मुद्दे, एकनाथ शिंदे विरोधात दंड थोपटण्याचे दिले संकेत.
municipal election on ganesh naik
FTP slug - nm ganesh naik on election
byet- ganesh naik
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: वन मंत्री गणेश नाईक यांनी आगामी मनपा निवडणुकीतील प्रचाराचे मुद्देच जाहीर केलेत. यामध्ये थेट एकनाथ शिंदे यांच्याविरोधात दंड थोपटण्याचे संकेत नाईकांनी दिलेत. नवी मुंबई महापालिकेला जनतेच्या हिता करता जे भुखंड पाहिजेत ते भुखंड या कालखंडात मिळाले नाहीत तर प्रचाराचा मुद्दा असेल. भुखंड चोरले स्वतःच्या स्वार्था करता बिल्डरांच्या घशात घातले अशा लोकांना तुम्ही काय सन्मानित करणार असा सवाल देखील नाईकांनी केलाय. पाणी चोरल्याचा आरोप करीन, गॅस चोरल्याचा, औषध चोरल्याचा आरोप करीन आणि स्वतःच्या लहरी करता 6हजार कोटींचा भुर्दंड 14 गावांचा समावेश करून नवी मुंबईवर टाकलाय हे प्रचाराचे मुद्दे असतील अशी प्रतिक्रिया वन मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलेय.
बाईट -: गणेश नाईक -वन मंत्री
0
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 19, 2025 12:09:47Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_SIRNAIK
ठाकरे ब्रँड संपणार नाही मात्र ठाकरे म्हणजे फक्त उद्धव ठाकरे नाहीत. त्यात राज ठाकरे व संपूर्ण कुटुंब आहे
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे वक्तव्य
ठाकरे ब्रँड संपवण्याच्या आरोपावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी केले ठाकरे ब्रँड चे समर्थन केले
राज ठाकरे यांनी राज्य सरकारला चॅलेंज दिलेलं नाही ते चॅलेंज त्यांनी हिंदी सक्ती करणारा ला दिले आहे
तूर्तास हिंदी सक्तीची नाही. म्हणत प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला दिले समर्थन.
समितीच्या अहवालानंतर हिंदी सक्तीचा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं वक्तव्य
या वक्तव्याला प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षरीत्या दिले समर्थन
प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा हिंदी मराठी सवाद पेटण्याची चिन्ह
Byte2
बाईट ऑन मुलाखत
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलखात कौटुंबिक मुलाखत
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर टीका
प्रश्न विचारणारे तेच उत्तर देणारे तेच ते सगळं ठरवून विचारलं जातं त्यामुळे न बोललेलं बरं
प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत यांनी घेतलेला उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर धाराशिव येथे पत्रकाराची बोलताना केली टीका
Byte1
1
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 19, 2025 12:05:57Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_DANDVAT
सातारा - वाई तालुक्यातील कुसगाव, एकसर, बोरीव गावांतील ग्रामस्थांनी अवैध खाण आणि क्रशर परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा तिसरा दिवसही शासनाच्या कोणत्याही ठोस निर्णयाविना पार पडला.आज आंदोलनकर्त्यांनी निरा नदीच्या पुलावर दंडवत आंदोलन करत सातारा जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. ग्रामस्थांनी माजी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, तहसीलदार सोनाली मिटकरी, गौण खनिज अधिकारी अमोल थोरात, वाई पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली आहे.आंदोलकांचा स्पष्ट इशारा आहे की, जोपर्यंत क्रशरचा परवाना रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही. त्यामुळे आंदोलनकर्ते आता सातारा जिल्ह्याची सीमा ओलांडून पुणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत आणि पुढील टप्प्यात आंदोलन मुंबईकडे वळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
शासनाच्या दुर्लक्षामुळे लोकांमध्ये असंतोष वाढत असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 19, 2025 11:36:57Kalyan, Maharashtra:
कल्याणमध्ये बिबट्याच दर्शन
विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीच वातावरण
Anchor- कल्याणमध्ये बिबट्याचं दर्शन घडलंय. आंबिवलीच्या एनआरसी स्कूल परिसरात हा बिबट्या रात्रीच्या सुमारास फिरत होता.
Vo- त्यावेळेस एका नागरिकांना आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ चित्रित केलाय. दरम्यान एनआरसी स्कूल परिसरात हा बिबट्या आढळल्याने विद्यार्थ्यां, पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलय. शाळा प्रशासनाने या संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांना मुलांना शाळेत पाठवताना काळजी घ्यावी अशा सूचना केल्यात .दरम्यान वनविभागाने या परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. मात्र आता हा बिबट्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात निघून गेला असल्याची शक्यता वनविभागाने वर्तवलीय. मात्र तरी देखील वनविभाग सतर्क असून नागरिकांना काळजी घेण्याचा सूचना करण्यात आल्यात.
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 19, 2025 11:36:52Navi Mumbai, Maharashtra:
story slug -नवी मुंबई मद्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतली भेट
ftp slug - nm bjp ganesh naik meeting
byet- ganesh naik minister
shots-
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: नवी मुंबईतील विविध प्रलंबित विकास कामे आणि नागरी समस्यांबाबत वन मंत्री गणेश नाईक यांच्यातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आलेय. वाशी येथील सिडको एक्सिबिशन येथे आयोजित या बैठकीला मनपा आयुक्त कैलास शिंदे, विभाग प्रमुख, माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवलेय. या बैठकीत नवी मुंबईतील सर्व विभागातील समस्यांचा पाढा वाचण्यात आल्या असून त्यासमस्या सोडविण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश वन मंत्री गणेश नाईक यांनी मनपा प्रशासनाला दिलेत.
बाईट - गणेश नाईक -वनमंत्री
Byte -: गणेश नाईक वन मंत्री
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 19, 2025 11:32:48Parbhani, Maharashtra:
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनूकीच्या धर्तीवर त्यांनी कार्यकर्ता सवांद मेळावा घेतला,त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांची उत्तरे दिली...
अजित पवार यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त संबंध देशभरात अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम दिले आहेत. अजित दादा प्रशासन बरोबरच क्रीडा सांस्कृतिक कला साहित्य पर्यावरण या प्रत्येक क्षेत्राशी जोडले गेले आहेत. पक्षाच्या वेगवेगळ्या शाखेच्या माध्यमातून 22 जुलै ते 30 जुलै असा राज्यव्यापी उपक्रम दिलेत. त्याचीही माहिती आम्ही सर्व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना देत आहोत.
जो उत्साह विधानसभा निवडणुकीमध्ये त्यापेक्षा थोडा जास्त का होईना परंतु कार्यक्रम त्यांचा उत्साह या निवडणुकांमध्ये अनुभवायला मिळतोय उत्तर महाराष्ट्रातील दौरा असो किंवा मराठवाड्यातील आजची तिसरी बैठक असो यामध्ये कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह अनुभवायला मिळतोय इतर पक्षात वेगवेगळ्या पदावर काम करणारी कार्यकर्ते आज आमच्या प्रवाहात येत आहेत याचं कारण सत्तेत असलं तरीही आमच्या मूळ विचारसरणी प्रेमाने राहिलो
धर्मनिरपेक्ष विचार फुले शाहू आंबेडकरांचा समतावादी विचारधारा घेऊनच आम्ही सरकारमध्ये काम करतोय. त्यामुळे हे विश्वास सार्हता अधिक भारतीय त्यामुळे वाढलेल्या विश्वासाला संघटन प्रमुख म्हणून सोबत घेणार हे माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच कर्तव्य आहे
On स्थानिक स्वराज्य संस्थेला माहिती म्हणून सोबत जाणार की स्वबळावर लढणार
राज्यात समन्वय समितीची बैठक झाली त्या वेळेला महायुती अबाधित राहून निवडणुकीला समोर जाऊ अशी चर्चा झाली त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे जिल्ह्यातल्या मतदारसंघातील परिस्थिती सुद्धा वेगळी आहे तिन्ही पक्षातील नेत्यांनी असं ठरवलं की ज्या त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती त्या त्या नेत्यांकडून समजून घ्यावी त्यानंतर तिन्ही पक्षातील प्रमुख नेते बसून जिल्हा निहाय निर्णय घेऊ
On
महायुती म्हणून निवडणुकीला समोर जाणार आणि कार्यकर्त्यांना न्याय देणार हे कसं जमवणार
महायुतीच्या ऐक्याला बाधा न येता निवडणुकीला समोर जायचं
राज्यात जावे ला 95 ते 99 शिवसेना-भाजपचे सरकार होतं 99 ते 2015 ला लोकशाही आघाडी अर्थात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार होतं 14 ते 19 भाजप सेनेचे सरकार होतं त्यावेळेस सुद्धा सत्तेमध्ये राज्यात जरी एकत्र होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या होत्या याचा अर्थ आम्ही वेगळं लढणार आहोत अशातला भाग नाही पण कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल
On सावली बार प्रकरणी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची परब यांच्याकडून मागणी
विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला आहे. माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करण्याचा आश्वासन दिला आहे. त्या संदर्भातील चौकशी करतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील
On
अजित दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली
माझ्यासहित पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याची ही इच्छा आहे. परंतु आम्ही राजकीय वास्तववादी आहोत जमिनीवरती आहोत आम्हाला वास्तव कळतं. भाजपचे 131 आमदार आहेत शिवसेनेचे 60 आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. त्यामुळे आघाडीच्या युतीच्या राजकारणाची अपरिहार्यता त्यावेळेला तशी परिस्थिती निर्माण होईल आता मला ते माहित नाही. ज्या वेळेला तशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष आहे. त्यावेळेला आमचं स्वप्न साकार होईल अशी अपेक्षा धरू ( अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार होईल अशी अपेक्षा तरी असं म्हणत आहेत. )
महाराष्ट्र ग्राम मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे प्रवेशासाठी ओघ लागलेला आहे
On
लाडक्या बहिणीच्या मदतीमध्ये एक वीस रुपयाची वाढ कधी होईल
संयुक्त जाहीरनामा महायुतीने तयार केला आहे तीन गोष्टी आम्ही प्रामुख्याने आश्वासित केले आहेत
लाडक्या बहिणीने २१ रुपये पर्यंत वाढ देणे
हे सरकार योग्य या बाबतचा निर्णय घेनार आहे.
On
विधान भवन आमदारांचा राडा
वाईट वाटण्यापेक्षा चुडिया तुम्ही वारंवार सांगत असतो विधिमंडळातील कोणत्याही राजकीय पक्षाचा विधानसभा सदस्य असेल किंवा लोकसभा सदस्य असो त्यांचं वर्तन त्यांची भूमिका ही नेहमीच लोकांचा अपेक्षांची पूर्तता करणारे असले पाहिजे या निंदनीय घटनांचा मी निषेध वारंवार केलाय राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मी मागणी केली आहे की अशा पद्धतीने कृत्य करणाऱ्या वरती कार्यवाही केली पाहिजे
On शेतकरी आत्महत्या
दुर्दैवाने तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आल्या काही वेळेला प्रमाण सुद्धा वाढला केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने उपाययोजना सुद्धा झाल्या तरी सुद्धा हे सत्र थांबत नाही हे आम्हा सर्वांसाठी क्लेश कारक आहे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय यापूर्वीसुद्धा घेतलेत अधिक निर्णय कशा पद्धतीने करता येतील याबाबतीत विचार राज्य आणि केंद्र पातळीवर सुरू आहे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्याचे अमूल बजावणी करणे गोदावरी जोड प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे पिक विमा योजना योजनांची अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या बारापर्यंत करणे तेच उद्दिष्ट ठेवून आम्ही काम करत आहोत
On
निशिकांत दुबेला मुंबईत आल्यावर मारू राज ठाकरेंचा वक्तव्य
निशिकांत दुबे च वक्तव्य महाराष्ट्र दृष्टिकोनातून किंवा देशाच्या दृष्टिकोनातून योग्य नव्हतच त्यांचासुद्धा वक्तव्याचा निषेध मी जरी आज एनडीए मध्ये असलो तरी दुबे यांचे वक्तव्य महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या बद्दलचे वक्तव्य योग्य नव्हतं ठाकरे घराणे किंवा राज ठाकरे हे त्यांच्या शैलीमध्ये बोलत असतात आवड निवड काही असो ते त्यांच्या ठाकरी शैलीमध्ये बोलत असतात
On
आमदार राजू नवघरे यांना मंत्री करण्याबाबतचा शब्द अजित परांनी पाळलेला नाही
मंत्रिमंडळाची रचना करत असताना संख्येवरच्या मर्यादा आल्या आणि त्यामुळे अनेक सहकार्यांना मंत्रिमंडळामध्ये घेता आले नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आमदार नवघरे यांना मंत्री करण्याचा योग्य तो निर्णय योग्यवेळी घेतला जाईल
On
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे काही संकेत आहेत का
राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा स्थानिक पातळीवरती सुद्धा नाही हे मी वारंवार स्पष्ट केल आहे
येईल त्या वेळेला कोरकमिटी त्याबाबत निर्णय घेईल पण निर्णय करत असताना ज्या वेळेला आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालोत त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोललो केंद्रीय नेतृत्वाने सहमती दर्शवली म्हणून आमचा सत्तेमधील सहभाग आहे अशा वेळेला कुठलाही मोठा राजकीय निर्णय घ्यायची शक्यता येईल त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेतृत्वाशी बोलावं लागेल चर्चा करावी लागेल
On
पहिली ते पाचवी हिंदी सुरू करून तर दाखवा शाळाच नाही तर दुकानही बंद करून टाकू व राज ठाकरे
ती ठाकरे शैली आहे आपण जे बोलतो ते सरकार करणार हे त्यांना माहीत असतं सरकारने हिंदी बाबतचा निर्णय रद्द केला नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. राष्ट्रवादीने सुद्धा स्वच्छ पाण्याची भूमिका मांडली त्रिभाषिक सूत्र आपल्याला स्वीकारायचे असेल तर ते पाचवीच्या नंतरच करावी लागेल.काही नेते महाराष्ट्रात बोलत आलेले आहेत. त्यात वेगळं वाटायचं आम्हाला काही कारण नाही.
On
ठाकरे ब्रँड जनतेने स्वीकारला आहे -उद्धव ठाकरे
दोन्हीही गोष्टीचे उत्तर काळच देईल
On
ठाकरेंच्या शैलीला कोणत्या शैलीत उत्तर असेल
आमची शैली वसंतराव चव्हाण यांची आहे चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत शैलीमध्ये आम्ही वाटचाल करत आहोत आणि जनता आम्हाला ताकद देते निवडणुकीमध्ये यश देते ही आमची शैली आहे .
On
माझ्यावरील हल्ल्याचा सूत्रधार आरएसएस आहे या - प्रवीण गायकवाड
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध केला आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सुद्धा निषेध केला आहे सरकारने चौकशी केलेली आहे आरोपी अटक केलेले आहेत. कठोर कार्यवाही व्हावी ही आमची मागणी आहे
On
सरकार माजले आहे स्वतःधारी देखील मजले आहेत - संजय राऊत
लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांनाच वाटलं होतं की महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल सात ते आठ मुख्यमंत्री तयार झाले होते 40 ते 50 मंत्र्यांनी सुद्धा नवीन कोट शिवून शपथ घेण्याची तयारी सुरू केली होती दारू अपयश आलेल्या नैराशातून अजून कोणीही बाहेर आलेलं नाही त्यामुळे संजय राऊत यांना दररोज सकाळी असं बोलून दिवसभर हे चालवायचे असते. या पलीकडे त्यांच्या वक्तव्याचं दखल घेण्यासारखे काही नाही.
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 19, 2025 11:32:35Akola, Maharashtra:
Anchor : अकोला पोलिसांनी गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक नवीन पद्धत लागू केली आहेय..शहरातील जुने शहरातील परिसरात दहशत माजवणाऱ्या तीन आरोपींची पोलिसांनी परेड काढली..या परेडचा मुख्य उद्देश स्थानिक नागरिकांमध्ये गुन्हेगारांबाबतची भीती कमी करणे आणि त्यांना सुरक्षिततेचा अनुभव देणे हा आहेय..पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होण्याची अपेक्षा आहे, तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात मदत होईल.
Byte : नितिन लव्हेकर , जुना शहर, पोलीस निरीक्षक
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 19, 2025 11:30:59Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1907ZT_WSM_POLICE_ACTIONAGAINST_VEHICLES
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम शहरात वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि प्रलंबित दंड वसूल करण्यात यावा यासाठी वाशिम पोलिसांनी विशेष नाकाबंदी मोहीम राबवली.जिल्हा वाहतूक शाखा, शहर वाहतूक शाखा व आरसीपी यांच्या संयुक्त कारवाईत वाहनांची तपासणी करण्यात आली.यामध्ये विविध नियमभंगांवर 61,100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तसेच कागदपत्रांची तपासणीदरम्यान 10 ऑटो रिक्षा आणि 3 दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली.
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 19, 2025 11:07:42Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_CASH_CHORI
सातारा - भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे-बेंगळूर महामार्गावर एका कार चालकावर हल्ला करून 20 लाख रुपये लुटण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि भुईंज पोलिसांनी संयुक्त कारवाई करत केरळ राज्यातील दरोडेखोर टोळीला अटक केली असून, 24 तासांच्या आत 7 आरोपींना ताब्यात घेतले आहे.तपासात इनोव्हा, स्कॉर्पिओ, स्विफ्ट कार, मोबाईल्स आणि 20 लाखांची रोख रक्कम असा 35.27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी केरळ, मध्यप्रदेश, दिल्ली, तमिळनाडूमधील असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
1
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 19, 2025 11:04:05Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 1907_GON_ACCIDENT
FILE - 7 VIDEO 1 IMAGE
विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या काफील्याने तरुणाचा मृत्यू....परिणय फुके न थांबता निघून गेल्याचा कुटुंबीयांचा आरोप......
Anchor: आज गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक असून त्या निमित्ताने विधान परिषद सदस्य परिणय फुके हे गोंदिया करता निघाले असता गोरेगाव दरम्यान रस्ता ओलांडत असलेल्या युवकाला ताफ्यातील वाहनाची धडक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र परिणय फुके हे न थांबता तिथून निघेल गेले असल्याने मृतकाच्या परिवाराने जोपर्यंत परिणय फुके येत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा शव विच्छेदन करणार नाही अशी भूमिका परिवाराने घेतली आहे.
BYTE - 2
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 19, 2025 11:02:31Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: नवी मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचा युवासेना शक्ती मेळावा संपन्न.
nm yuvasena melava
FTP slug - nm yuvasena melava
shots-
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: नवी मुंबईत जुईनगर नेरुळ विभागाचा युवासेना शक्ती मेळावा संपन्न झालाय. आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने युवासेना तयारीला लागलेली पहायला मिळत असून विभाग निहाय मेळावे घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येतेय. युवासेनेतर्फे प्रत्येक महाविद्यालयात कॉलेज युनिटची स्थापना करण्यात येत असून 1 ऑगस्ट रोजी कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्याहस्ते या सर्व कॉलेज युनिटचे उदघाटन करण्यात येणार आहे.
gf-
===============================
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 19, 2025 11:01:02Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - इस्लामपूरचे ईश्वरपुर केल्याच्या निर्णयाबद्दल महायुतीच्या वतीने पेढे आणि साखर वाटप करत फटाक्याची आताषबाजी.. इस्लामपूर मध्ये सदाभाऊ यांचे मिरवणूक काढून केले जंगी स्वागत.
अँकर :- सांगलीच्या उरुण-इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात आले आहे. या निर्णयाचे आज इस्लामपूर मध्ये आतषबाजी करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सदाभाऊ खोत हे इस्लामपूर मध्ये दाखल होताच त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातून साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
इस्लामपूरच्या पंचायत समिती येथील क्रांतिसिंह नाना पाटील,तहसील कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करत फटाक्याची आताषबाजी करण्यात आली.यावेळी आमदार सदाभाऊ खोत,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील, भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.तर यावेळी बोलताना
सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुती सरकारचे आभार व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्या वडिलांचे स्वप्न आम्ही स्वप्न पूर्ण केले,अशी प्रतिक्रिया खोत यांनी दिली आहे.
बाईट-: सदाभाऊ खोत - आमदार .
2
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 19, 2025 10:36:12Navi Mumbai, Maharashtra:
story slug -दारूच्या दुकानातून 17 लाखांची दारू चोरणारया दोघांना अटक cctv च्या मद्यमातून अटक
17 लाख की शराब चोरी cctv जारी
FTP slug - nm vashi liquer cctv
shots-cctv
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: वाशी सेक्टर 31 मधील व्ही फाईव्ह लिविंग लिक्विड्स या मद्य विक्री दुकानाचे शेटर आणि लॉक तोडून विविध कंपन्याच्या दारूच्या बॉटल चोरी करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्यांनी तब्बल 17 लाख 57 हजार रुपये किंमतीच्या दारूच्या बॉटल टेम्पोमध्ये टाकत चोरी केल्या होत्या. पोलीसांनी सिसीटीव्ही फूटेज आणि गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दहिसर येथून दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली असता दोघांनी गुन्हा कबूल केलाय. वाशी पोलीसांनी वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या बॉटल, गुन्ह्यात वापरलेला टेम्पो तसेच चोरी करण्यासाठी वापरलेले हत्यार असा एकूण 9 लाख 33 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. वाशी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
gf-
========≠===========
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 19, 2025 10:33:05Ambernath, Maharashtra:
अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलं गुंडगिरीच्या मार्गावर!
इन्स्टाग्रामवर रील अन स्टोरी टाकत गुन्हेगारीचं समर्थन
पोलिसांनी युवकांना 'योग्य दिशा' दाखवण्याची आवश्यकता
Amb reel
Anchor : अंबरनाथमध्ये १५ ते १८ वयोगटातली अल्पवयीन मुलं गुन्हेगारीच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळतंय. अशाच एका मुलाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या रील अन स्टोरीवर चाकूच्या फोटोमुळे या मुलांना पोलिसांनी योग्य दिशा दाखवून त्यांची गुन्हेगारीची नशा उतरवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जातेय.
Vo : इन्स्टाग्रामवर बद्री यादव नावाने एक अकाउंट तयार करण्यात आलं असून त्यावर एक रील शेअर करण्यात आलीये. यात आम्हाला पोलीस स्टेशनची केस आवडत असल्याचं या तरुणांचं म्हणणं आहे. याच अकाउंटवर स्टेटसला स्टोरी ठेवण्यात आली असून त्यात चाकूचा फोटो ठेवण्यात आलाय, आणि बॅकग्राऊंडला सरकार चित्रपटातील गाणं ठेवण्यात आलंय. हे पाहिल्यानंतर अंबरनाथ शहरातली तरुणाई कोणत्या दिशेनं चाललीये, असा प्रश्न उपस्थित झालाय. शहरात सोल्युशन, व्हाईटनर हुंगत फिरणारी अल्पवयीन मुलं सर्रास पाहायला मिळतात. हीच मुलं गुन्हेगारीकडेही वळू लागली असून पोलिसांनी या मुलांना समजेल, अशा भाषेत पोलिसांनी त्यांना समजवावं, अशी मागणी नागरिकांमधून केली जातेय.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report