Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

खारघर चोरट्याला 42 लाखांच्या दागिन्यांसह अटक, काय आहे कथा?

SNSWATI NAIK
Jul 20, 2025 11:04:02
Navi Mumbai, Maharashtra
story slug - खारघर येथील बंगल्यातून 42 लाख रुपये किंमीचे दागिने चोरुन फरार झालेला आरोपी अखेर अटकेत 42 लाख के गहने चुराने वाले नोकर को पकडा FTP slug - nm khargher crime shots- reporter- swati naik navi mumbai anchor : खारघर येथील एका बंगल्यामधुन तब्बल 42 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे तसेच डायंमडचे दागिने व रोख रक्कम चोरुन पळून गेलेल्या नोकरास खारघर पोलिसांनी राजस्थान जालौर येथुन शिताफिने अटक केली आहे. दौलत शैतान सिंग (25) असे या चोरटÎाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडुन चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेला आरोपी दौलत सिंग हा आरोपी खारघर येथील बंगल्यात नोकर म्हणुन काम करत होता. या चोरटÎाने गत 9 जुलै रोजी संधी साधुन बंगल्यातील रोख रक्कमेसह सोन्याचे, चांदीचे दागिने तसेच डायमंडचे दागिने चोरुन पलायन केले होते. खारघर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उप निरीक्षक सुरज जाधव व पोलीस हवालदार कासार, पोलीस नाईक खेडकर, पोलीस शिपाई मोरे यांचे पथक आरोपीच्या राहत्या पत्तावर पाठविण्यात आले होते. सदर पोलिसांचे पथक आरोपी दौलत सिंग याच्या सिरोही राजस्थान येथील घरावर पाळत ठेवली असताना, आरोपी हा त्याचे लोकेशन बदलत वावरत असल्याचे तसेच त्याचे लोकेशन हे हिमाचल येथे असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी दुसरे पथक रवाना करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आरोपीचे लोकेशन जालौर, राजस्थान येथे आल्यानंतर पोलिसांच्या पथकाने दौलत सिंग याला राजस्थान येथून शिताफिने ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी दौलत सिंग याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडुन तब्बल 42 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे, चांदीचे दागिने डायमंड व रोख रक्कम असा मुद्देमालासह हस्तगत करुन त्याला अटक केली. बाईट - भाऊसाहेब ढोले - सहाय्य क पोलीस आयुक्त
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top