Back
उल्हासनगरात विनयभंग आरोपीच्या सुटण्यानंतर उन्माद, पोलिसांचा धाक आहे का?
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 20, 2025 01:30:11
Ambernath, Maharashtra
उल्हासनगरात विनयभंगाच्या आरोपीचा जेलमधून सुटताच उन्माद!
पीडित तरुणीच्या घराबाहेर फटाके फोडत वाजवले ढोलताशे!
पोलिसांची गुन्हेगारांवर वचक आहे का ?
Ulh accused
Anchor : उल्हासनगरात विनयभंगाच्या आरोपीने जेलमधून सुटताच तक्रारदार पीडित तरुणीच्या घराबाहेर फटाके फोडत ढोलताशे वाजवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यानंतर उल्हासनगरात पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
Vo : उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील रमाबाई टेकडी परिसरात २७ एप्रिलच्या रात्री हंशू बिपिन झा, रोहित झा सोनमणी झा आणि बिट्टू सिताराम यादव यांनी एका घराचा दरवाजा तोडून घरात घुसत घरातील दोन तरुणींना बाहेर खेचलं आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला, असा आरोप होता. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपींना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील रोहित झा या आरोपीचा जामीन न्यायालयाने मंजूर केला. आधारवाडी कारागृहातून सुटल्यावर रोहितची मिरवणूक काढत त्याला रमाबाई टेकडी परिसरात आणण्यात आले. तिथे ज्या मुलीचा त्याने विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप होता, तिच्याच घरासमोरच फटाके फोडत ढोल ताशे वाजवत विकृत सेलिब्रेशन करण्यात आलं. एखादा आरोपी जेलमधून सुटल्यावर फिर्यादीच्या घराबाहेर सेलिब्रेशन करत असेल, तर हा दहशत निर्माण करण्याचा प्रकार असून यामुळे उल्हासनगरचे पोलीस नेमके करतात काय? उल्हासनगरात पोलिसांचा धाक उरला आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
5
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 20, 2025 06:36:25Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Paratayak Car Checking
File:03
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc: सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील जुन्नर तालुक्याच्या नाणेघाट दाऱ्याघाट परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी वीकेंडला पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली असून या ठिकाणी हुल्लडबाजांचा मद्यपींचा कुटुंबासोबत आलेल्या पर्यटकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी जुन्नर पोलिसांकडून गाड्यांची मद्यपींची कसून तपासणी केली जातीय,मद्यप्राशन केलेल्या पाच पर्यटकांवरती आतापर्यंत जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून येणाऱ्या पर्यटकांना सुखरूप आणि व्यवस्थितपणे पर्यटनाचा आनंद घेता यावा या अनुषंगाने जुन्नर पोलीस सर्व खबरदारी घेताना पाहायला मिळताय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
Wkt: हेमंत चापुडे(प्रतिनिधी )
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे..
1
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 20, 2025 06:35:32Kalyan, Maharashtra:
केडीएमसी ने पाठवली 38 मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस
पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न केले नसल्याचा ठपका
Anchor :- कल्याण डोंबिवली महापालिकेकडून महापालिकेच्या शाळा हायटेक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत . या शाळा हायटेक करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतला मात्र शाळा व्यवस्थापनांनी या उपक्रमाबाबत उदासीन तर दाखवल्याचं समोर आलंय महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे घटत चाललेले विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचा ठपका ठेवत संबंधित 38 शाळांच्या मुख्याध्यापकांना कल्याण डोंबिवली महापालिका कडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलत या कारवाईमुळे महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत
Vo..कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत महापालिकेच्या 29 प्राथमिक दोन माध्यमिक अशा 61 शाळा चालवल्या जातात या शाळांमध्ये सुमारे चार हजार 71 विद्यार्थी व चार हजार 367 विद्यार्थिनी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. तर या शाळांमध्ये सुमारे 300 च्या आसपास शिक्षक कार्यरत आहेत . कल्याण डोंबिवली महापालिकेने शाळांचा दर्जा शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी महापालिका शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी वीविध उपक्रम सुरू केले या पार्श्वभूमीवर यावर्षी जुलै महिना तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देखील पुरवण्यात आले आहे . मात्र शाळेतील पटसंख्या वाढवण्यात बाबत काही शाळांमधील मुख्याध्यापक मात्र उदासीन असल्याचं समोर आलंय . या उपक्रमाबाबत तब्बल 29 शाळांमधील मुख्याध्यापक उदासीन असल्याचं दिसून आलं त्यामुळे केडीएमसी ॲक्शन मोडवर आली असून महापालिकेकडून या 39 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शिक्षकांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे देखील महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले
Byte : संजय जाधव (उपायुक्त केडीएमसी)
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 20, 2025 06:05:59Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2007ZT_MAVAL_LON_FOG
Total files : 01
Headline : लोणावळ्यात पावसाने पाठ फिरवली तरी टायगर पॉईंट वर धुक्याची चादर
Anchor :
लोणावळ्यात सध्या पावसाने पाठ फिरवली असून पर्यटकांना पावसाचा आनंद जरी मिळत नसला तरी धर्तीवरचा स्वर्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या टायगर पॉइंटवर धुक्याची दाट चादर पसरत आहे. उंच घाट माथ्यावर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या टायगर पॉइंट ला पर्यटक पावसाळ्यात मोठी पसंती देतात, सध्या टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट धुक्यात हरवल्याचे चित्र पहायला मिळत आहे. थंडगार वारे आणि दाट धुकं यामुळे लोणावळ्याचा निसर्ग मनमोहक झालाय.
3
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 20, 2025 06:02:21Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_KADU_ON_KOKATE एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
कृषिमंत्री मीटिंग करताना रमी खेळत आहे हे शेतकऱ्याचे दुर्दैव; बच्चू कडू यांची कृषिमंत्री कोकाट्यांवर जोरदार टीका
अँकर :– कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधान भावना अधिवेशन सुरू असताना जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला आहे यावर बच्चू कडूंनी संताप व्यक्त करत कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कृषिमंत्री मीटिंग करताना रमी खेळत आहे हे शेतकऱ्याचे दुर्दैव आहे. सरकारने कर्जमाफीसाठी समिती गठित केली नाही, आत्महत्या होणार नाही यासाठी समिती गठित केली कृषीमंत्र्यांची ही आठवी नववी चूक असेल यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या असे म्हणत बच्चू कडू यांनी कोकाटे यांना धारेवर धरले आहे. शेतकरी दारू पितो म्हणून कर्जबाजारी होता आणि आत्महत्या करतात मात्र आमचा कृषिमंत्रीच रमी मध्ये गुंग असेल तर शेतकऱ्यांचं काय भलं होईल कर्जबाजारीपणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे सध्या कर्जमाफी करून उपाययोजना करण्याची गरज आहे जोपर्यंत कर्जमाफीची तारीख घोषित होत नाही आणि कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आमचा आंदोलन सुरू राहील येत्या 24 तारखेला संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू सरकारला दिला आहे.
बाईट :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 20, 2025 06:02:16Niphad, Maharashtra:
अँकर :- द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे गेल्या दोन महिन्यांपासून सततच्या पावसामुळे शेतात पाणी राहत असल्यामुळे द्राक्ष बागेच्या मूळ्या चोकप झाल्याने द्राक्ष बागेवरील फांद्यांवर मूळ्या बाहेर आल्या आहे तर द्राक्ष बागेवर सततच्या पावसामुळे करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना अतिरिक्त औषध फवारणीचा खर्च येत असल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे येणाऱ्या द्राक्षांच्या हंगामामध्ये उत्पादन घटनेची भीती व्यक्त करत उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाल्याने उत्पादन खर्च निघेल किंवा नाही ही सुद्धा शाश्वती राहिली नसल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी सुनील गवळी सांगत आहे
बाईट :- सुनील गवळी ( द्राक्ष उत्पादक शेतकरी, ब्राह्मणगाव विंचूर)
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 20, 2025 05:35:30Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2007ZT_MAVAL_EWAY_DP_ROAD
Total files : 05
Headline -पीएमआरडीएचा डीपी रद्द केल्याने शेतकऱ्यांचा जल्लोष
Anchor:
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर दोन्ही बाजूंनी नियोजित पुणे महानगर विकास प्राधिकरण यांनी तीस मीटर रुंदीच्या आरक्षित सर्विस रस्त्याला पन्नास गावातील शेतकऱ्याचा तीव्र विरोध होता. याबाबत संबंधित विभागाकडे हरकती देखील शेतकऱ्यांनी नोंदविल्या होत्या. गेली पंचवीस वर्षे शेतकऱ्यांचा हा लढा सुरू होता. अखेर उच्च न्यायालयाने पीएमआरडीएचा प्रारूप विकास आराखडा रद्द केल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला आहे. त्यामुळे मावळातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करून एकमेकांना पेढे भरवून तोंड गोड केलं. एक्स्प्रेस वे वरील नवीन उर्से टोलनाका या ठिकाणी सर्वांनी एकत्रित येऊन आनंद साजरा केला तसेच सरकारचे आभार मानले. मुंबई पुणे, तसेच पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वरील दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडवर पुणे महानगर विकास प्राधिकरण यांनी ३० मीटर रुंदीचे आरक्षण टाकले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यास मोठया अडचणींना सामोरे जावं लागत होते. या सर्व्हिस रस्त्याला शेतकऱ्याचा तीव्र विरोध होता. याबाबत संबंधित विभागाकडे हरकती देखील शेतकऱ्यांनी नोंदविल्या होत्या. उच्च न्यायालयाने पीएमआरडीए चा प्रारूप विकास आराखडा रद्द केल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला आहे.
बाईट : सुभाष धामणकर अध्यक्ष शेतकरी कृती समिती, एक्स्प्रेस वे मावळ. (file no.03)
बाईट : कृष्ण कारके, शेतकरी (file no.04)
बाईट : गुलाब घारे, शेतकरी (file no.05)
3
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 20, 2025 05:33:48Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
exclusive
स्किप्ट ::- हडोळतीत शॉर्टसर्किटने भीषण आग... आगीत लाख रुपयाचे साहित्य जळाले.... आग विझवण्याचे प्रयत्न सुरू...
AC ::- अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील बसथांब्याजवळ दोन ते तीन दुकानांना भिषण आग लागली आहे. या आगीत लाखों रूपयांचे साहित्य जळुन खाक झाले आहेत. लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. हि आग
शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या भिषण आगीमुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी पाण्याच्या टँकरच्या मदतीने हि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आग वाढत असल्याने अहमदपूर येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसरात इतर दुकाने असल्याने मोठा अनर्थ टळावा म्हणून स्थानिक व्यापारी आणि नागरिक सतर्क झाले आहेत.
1
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 20, 2025 05:03:56Pandharpur, Maharashtra:
20072025
Slug - PPR_PANDURANG_PALKHI
feed on 2c
file 01
--------
Anchor - संत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्यासाठी पंढरपूर मधून पांडुरंगाच्या पालखीचे आज प्रस्थान झालेलं आहे.परंपरेप्रमाणे काशी कापडी समाज यांच्या मठातून पांडुरंगाच्या पादुका रथा मध्ये ठेवून माढा तालुक्यातील अरण येथे प्रस्थान ठेवले आहे.हा पालखी सोहळा पंढरपुरातून अरण गावा कडे पायी जात असतो. दोन दिवसाच्या प्रवासानंतर 23 तारखेला संत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्या दिवशी ही पालखी अरुण येथे पोहोचणार आहे.
1
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 20, 2025 05:02:37Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn paithan rada av
feed attached
ANCHOR : छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरात काल रात्री जोरदार राडा झाला. रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास शहरातील कापड मंडई परिसरात जागेच्या जुन्या वादातून दोन गटात जोरदार राडा झाला. त्यामुळे परिसरात अचानक पळापळ सुरू झाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पैठण पोलोसांच्या फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. मिळालेल्या माहितीनुसार सौम्यलाठीमार करून पोलिसांनी नियंत्रण मिळविले. त्यानंतर दोन्ही गटातील लोकांची धरपकडकरून ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 20, 2025 05:02:30Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील माना येथील
जिल्हा परिषद विद्यालय येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली..या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी जवळपास 25 उमेदवार रिंगणामध्ये होते या उमेदवारांमधून शालेय प्रमुख, संरक्षण मंत्री, पोषण आहार मंत्री, पर्यावरण मंत्री, स्वच्छता मंत्री इत्यादी प्रमुख निवडून द्यायचे आहेत..आजचे विद्यार्थी उद्याचे मतदार असल्याने भारतातील लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी तसेच आपल्या देशाच्या हितासाठी उत्तम प्रतिनिधी निवडून देण्याची जाण विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीचे आयोजन विद्यालयात करण्यात आले..वर्ग पाच ते दहा च्या 236 विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. निवडणूक प्रक्रिया अतिशय शांततेत संपन्न झाली असून निवडणुकीचा निकाल व मंत्रिमंडळाचे पुनर्गठण पुढील आठवड्यात होणार आहेय..
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 20, 2025 05:02:21Beed, Maharashtra:
बीड : प्रेम संबंधाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
Anc : गेवराईच्या गंगावाडी येथे प्रेमसंबंधाच्या वादातून २१ वर्षीय शिवम चिकणे या तरुणावर पाच जणांनी लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण केली. ही घटना गंगावाडी ते तळवाडा रस्त्यावर घडली होती. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शिवम वर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आधी जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता, आता खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे. या प्रकरणात मुलीच्या वडिलासह एकाला अटक करण्यात आली असून, पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे.
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 20, 2025 04:35:16Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निर्धार नवपर्वाचा पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला,परभणी जिल्ह्यात पक्ष संघटन, मतदार आणि
विचाराने प्रेरित झालेले कार्यकर्ते आहेत,त्यामुळे परभणीत स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. आताही स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सत्ता आणण्यासाठी पक्ष संघटन वाढविण्याचे आदेश यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
1
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 20, 2025 04:35:08Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2007ZT_WSM_PLANTATION
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील भुली येथील वसंतराव नाईक विद्यालयात 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात मातृप्रेमाचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण करण्यात आले व विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाची शपथ देण्यात आली व "झाडे लावा, झाडे जगवा" अशा घोषणांनी वातावरण साकारले.जिथे वृक्षारोपणासोबत फळांचे वाटपही करण्यात आले.विधानपरिषद आमदार बाबूसिंग महाराज यांच्या पुढाकारातून संपूर्ण सर्कलमध्ये वृक्ष उपलब्ध करून देण्यात आले.मुख्याध्यापक व शिक्षकांनी कार्यक्रमातील सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
0
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 20, 2025 04:34:55Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_DOG_BYTE एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती जिल्ह्यात दोन महिन्यात 1500 जणांना श्वानदंश; मागील वर्षभरात 23 हजार नागरिकांना श्वानाने घेतला चावा
अँकर :- अमरावती शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मोकाट आणि भटक्या श्वानांची समस्या वाढली आहे. मागील दोन महिन्यात अमरावती जिल्ह्यात 1500 जणांना श्वानांनी चावा घेतला आहे. अमरावती शहरातच एक लाखाच्या आसपास भटक्या श्वानांची संख्या असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. शहरातील चायनीज, खाद्यपदार्थ, मास विक्रेते व नागरिक शिळे अन्न रस्त्यावर फेकून देतात ते खाण्यासाठी मोकाट व भटक्या श्वानांची संख्या वाढताना दिसते. रात्रीच्या वेळी वाहने व पादचाऱ्यांवर श्वान धावून जातात यामध्ये कोणाला ते चावा घेतात तर दुचाकीवरून अनेक लोक खाली सुद्धा पडली आहे. मागील वर्षभरात 23 हजार नागरिकांना श्वानाने चावा घेतल्याची आकडेवारी सुद्धा समोर आली आहे.
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 20, 2025 04:32:11Hingoli, Maharashtra:
अँकर- हिंगोलीत आदिवासी विद्यार्थ्यांची पदभरती करण्याच्या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे मागील चार दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष सूनिल तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर,धनंजय मुंडे यांनी उपोषण स्थळी भेट देत आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत शासन स्तरावर योग्य पाठपुरावा करण्याच आश्वासन दिल आहे,
0
Share
Report