Back
इगतपुरीत संततधार पावसामुळे गोदावरी नदीने घेतला वेढा!
SKSudarshan Khillare
FollowJul 07, 2025 03:01:29
Niphad, Maharashtra
अँकर:-
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर, दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आहे हे पावसाचे पूर पाणी निफाड तालुक्यातील चांदोरी येथे गोदावरी नदीपात्रा बाहेर आल्याने खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे गोदावरी नदीकाठी न जाण्याचा प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.
4
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 10, 2025 04:35:33Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट मधून श्री स्वामी समर्थ मंदिराची थेट दृश्ये ( LIVE )
- गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरीमध्ये स्वामी भक्तांची मोठी गर्दी
- मंदिर दर्शनासाठी 22 तास खुले ठेवल्यामुळे भक्तांची चांगली सोय
- गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत
- अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने स्वामींच्या दर्शनाला सुरुवात
याविषयी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरातून आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा...( LIVE )
1
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 10, 2025 04:32:32Nashik, Maharashtra:
nsk_tribalissue
feed by 2C
vdioe 3
- खैरेवाडी येथील महिलेला दवाखान्यात झोळीतून नेण्याची वेळ
- तीन ओहळ, गुडघाभर पाणी, चढ उतार, सुनसान जंगलातून चार किमी पायपीट करत दवाखान्यात नेण्याची वेळ
- तत्कालीन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी येथे पूल रस्ता बनविण्यासाठी पाठवला होता प्रस्ताव
- जिल्हाधिकारी यांनीही या ठिकाणी भेट दिली होती
- मात्र अजूनही या भागात रस्ते व पूल न झाल्याने आलीय वेळ
- नाशिकसाठी पावसाळी अधिवेशनात उड्डाणपुलाची मागणी करणाऱ्या आमदार हिरामण खोसकर यांना आपल्या मतदार संघातील ही समस्या दिसत नाही का नागरिकांचा आरोप
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 10, 2025 04:32:25Nashik, Maharashtra:
*Breaking -*
- उदयपूर फाइल्स चित्रपटाला प्रदर्शणापूर्वीच वाढता विरोध
- *चित्रपटाला मुस्लिम संघटनांचा तिव्र विरोध*
- चित्रपटात एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्यात आल्याचा तसेच इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा संघटनांचा आरोप
- चित्रपटावर बंदीच्या मागणीसाठी मुस्लिम संघर्ष समितीकडून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले निवेदन
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 10, 2025 04:31:42Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल रात्री अपपघात करुन पळून जात असलेल्या कारचालक युवकाला पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून पकडले. या युवकाने नो एन्ट्री असलेल्या रस्त्यावर वाहन टाकून एका घरा समोरील ओट्याला जोरदार धडक दिली. भेदरलेला वाहनधारक युवक पोलिसांना बघून घटना स्थळावरून पळ काढला, पोलिसांच्या समोरूनच त्याने पळ काढल्याने उपस्थितांनी गोंधळ घातला तसेच पोलिसांनी अर्धा किलोमीटर अपघात केलेल्या युवकाचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. या युवकाला पोलिसांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात धरून नेले, पण त्या तरुणावर नेमकी पोलिसांनी काय कारवाई केली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे...
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 10, 2025 04:31:34Ambernath, Maharashtra:
मोरिवली नाका परिसरातील शौचालयाची दुरावस्था
महिलांची होत आहे कुचंबना ,
शौचालय खुले करून देण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
Amb toilet
Anchor अंबरनाथ शहरातील मोरिवल्री नाका परिसरात नगरपालिकेचे एकमेव शौचालय आहे, मात्र आज या शौचालयाची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. या परिसरात मोठी बाजारपेठ असल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. मात्र या शौचालयाची झालेल्या टुर्व्यवस्थेमुळे नागरिकांची तसेच महिलांची मोठी कुचुंबना होत आहे .त्यामुळे तात्काळ या शौचालयाची दुरुस्ती करून नागरिकांसाठी खुले करण्यात यावी अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते योगेश चलवादी यांनी नगरपालिकेला पत्राद्वारे केली आहे.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report
KPKAILAS PURI
FollowJul 10, 2025 04:31:23Pune, Maharashtra:
लाड-पागे समिती आणि अनुंकपा धोरणानुसार ४० वारसांना महापालिकेत मिळाली नोकरी...!
pimpri job
kailas puri Pune 10-7-25
feed by 2c
Anchor - पिंपरी चिंचवड महापालिकेत लाड-पागे वारस नियुक्ती आणि अनुकंपा वारस नियुक्ती नुसार ४० जणांना नियुक्ती देण्यात आली आहे..महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत,महानगरपालिकामधील सफाई आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एखाद्या सफाई किंवा ड वर्गातील कर्मचाऱ्यांने स्वेच्छा निवृत्ती घेतल्यास, वैद्यकीय अपात्रता किंवा एखादा कर्मचारी सेवेत असताना मयत झाल्यास त्याच्या वारसांना वारसाहक्काने नियुक्ती देण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. त्या नुसार ४० जणांना ही नोकरी देण्यात आली आहे...!
1
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 10, 2025 04:31:12Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज
स्किप्ट ::- बांधकाम कामगार कल्याण योजनेत मोठा घोटाळा उघडकीस.... उदगीर तालुक्यात घोटाळा उघडकीस... अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावाने ९० फेक सर्टिफिकेट...अनुदान, शिष्यवृत्ती, साहित्य... योजनांचा गैरवापर... तिघांविरुद्ध गुन्हा दाखल...
AC ::- बांधकाम कामगार कल्याण योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. हा सर्व घोटाळा उदगीर तालुक्यात उघडकीस आला आहे. शासनाकडून कामगारांना मिळणाऱ्या सवलती, शिष्यवृत्ती आणि अनुदान यांचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रांद्वारे तब्बल ९० बनावट कामगार नोंदणी प्रमाणपत्रांचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे ही सर्व नोंदणी एका अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावाने करण्यात आली होती.तक्रारी वाढत गेल्याने संपूर्ण चौकशी नांदेडचे सहायक कामगार आयुक्तांनी उदगीरच्या गटविकास अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली. त्यात फक्त एका गावात ९० पेक्षा जास्त प्रमाणपत्र बनावट असल्याचं उघड झालं. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात एजंट, बांधकाम ठेकेदार आणि मल्टिसर्व्हिस चालका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 10, 2025 04:30:36Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_aropi_arest
पेट्रोल पंपावर दहशत वाजवून दगडफेक करणाऱ्या संशयताला पोलिसांनी केली अटक
अँकर
पेट्रोलपंपावर दगडफेक करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केलीये... नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या टीमने ही कारवाई केली आहे.. सुमित खरे असं या अटक केलेल्या संशयीता च नाव आहे...नाशिक शहरातील पेट्रोमाईन पेट्रोलपंप, बिटको, नाशिकरोड येथे ही घटना घडली होती. आरोपीने आपल्या साथीदारांसह पेट्रोलपंपावर येऊन बेकायदेशीर जमाव जमवत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच मारहाण करत, पेट्रोलपंप जाळण्याची धमकी देत चॉपरने जीव घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर आरोपीने पंपावर दगडफेक करून पळ काढला होता... या संशयतावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत....
2
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 10, 2025 04:30:13Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - आज गुरु पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात भक्तांची गर्दी ( WKT)
आज गुरु पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात भक्तांची गर्दी
स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायला पहाटेपासून मंदिर परिसरात भक्तांच्या लागल्या आहेत रांगा
महाराष्ट्रासह,तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकमधून मोठ्या संख्येने स्वामी भक्त अक्कलकोट नगरीत झाले आहेत दाखल
त्यामुळे पहाटेपासून अक्कलकोट परिसरात अतिशय भक्तीमय वातावरणात स्वामी भक्तांना लागली आहे दर्शनाची आस..
याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी...( WKT)
0
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 10, 2025 04:04:13Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव/परंडा
DHARA_SCHOL
चार वर्षांपासून शिक्षक मिळेना, शाळेला ठोकले टाळे
शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने संतप्त पालकांनी सोनारी येथिल जिल्हा परिषद शाळेला लावले कुलूप
जोपर्यंत शिक्षक भरत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणार नसल्याचा इशारा
शाळेला टाळे ठोकताच शिक्षण विभागाकडून मलमपट्टी करण्याचा हालचाली
९ वी १० वी वर्गाला शिकवन्याची पात्रता नसलेल्या शिक्षकाची केली नियुक्ती
नियूक्त केलेल्या शिक्षकानेच १० वी वर्गाला शिकवन्यास दिला नकार , पदवीधर शिक्षकावर पालक ठाम
तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील शाळांची दुरावस्था
Anc: धाराशिव मधील परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद प्रशालेत चार वर्षांपासून गणित व विज्ञान या दोन्ही विषयांसाठी नियमित शिक्षक नाहीत; त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त पालकांनी शाळेला टाळे ठोकले. शाळेला शिक्षक मिळेपर्यंत हे टाळे कायम राहील, असा पवित्रा पालक व ग्रामस्थांनी घेतला आहे. पालकांनी शाळेला कुलूप ठोकतात गट शिक्षण कार्यालया कडून तात्पुरती मलम पट्टी करण्यासाठी प्राथमीक शाळेचे शिक्षकाची सोनारी येथे आर्डर काढली मात्र शिक्षण विभागातील भोंगळ कारभार समोर आला. नियुक्त केलेले शिक्षकांनी ९ वी १० वी वर्गाला शिकवण्यात माझी पात्रता नाही या मुळे त्यांनी लेखी पत्र देऊन ९ वी १० वी वर्गाला शिकवन्यास नकार दिला आहे.
Byt: विद्यार्थिनी
0
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 10, 2025 04:03:57Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या वाघापूर परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून तिची निर्घृण हत्या केली.
इंद्रकला जयस्वाल असे मृत महिलेचे नाव आहे. मारेकरी पती विजय जयस्वाल हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून दोघांमध्ये नेहमी वादाचे खटके उडत होते. दरम्यान, पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने संतप्त झालेल्या विजयने पत्नी इंद्रकलाच्या डोक्यात सिलेंडर घातले. यात ती जागेवरच कोसळली. प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला
1
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 10, 2025 04:03:50Kolhapur, Maharashtra:
Kop Gava Halla
Feed:- 2C
Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील बाजार भोगाव परिसरात गव्याच्या हल्ल्यात पाच शेतकरी जखमी झालेत. पाटपन्हाळा इथल्या शेतामध्ये ही घटना घडली आहे. दत्तात्रेय गुरव आणि बंडोपंत पाटील हे गोव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी आहेत. दत्तात्रेय गुरव, बंडोपंत पाटील, जितेंद्र कांबळे, नामदेव पाटील आणि कोंडीराम पाटील हे नेहमीप्रमाणे शेतामध्ये वैरण आणण्यासाठी गेले होते. शेतातील वैरण कापत असताना नव्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे पंचक्रोशीत शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
1
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 10, 2025 04:03:44Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर साईदरबारी...
गुरुपोर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी रूपाली चाकणकरांनी घेतलं शिर्डीला येत साई दर्शन...
बाईट ऑन साईदर्शन
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने मी दरवर्षी कुटुंबासह साई दरबारी दर्शनाला येत असते...
गुरु पौर्णिमेला साकडं घालण्यापेक्षा गुरूंनी जे दिल आहे त्यामध्ये आपण यश मिळवत असतो..
गुरूंच्या आशीर्वादाने चांगलं काम करून कर्तृत्व सिद्ध करता येतं...
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आजचा हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्यामुळे मी साईंच्या चरणी लिन होण्यासाठी साईदरबारी आले..
रूपाली चाकणकरांची शिर्डीत प्रतिक्रिया...
शिर्डीला येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होवो...
वर्षातून कित्येक वेळा साईबाबांच्या दर्शनाचा योग येतच असतो...
महाराष्ट्राचा बळीराजा सुखी व्हावा आणि महिलांना सुरक्षेचे बळ प्रदान करत असताना ताकद मिळावी हे साकडं साईंच्या चरणी घातल असल्याची प्रतिक्रिया देखील रूपाली चाकणकरांनी व्यक्त केलीय..
Bite - रूपाली चाकणकर , अध्यक्षा राज्य महिला आयोग
0
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 10, 2025 04:03:33Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_water_line
305 कोटींतून जलवाहिन्या, जलकुंभ कामांचा प्रश्न मार्गी
अँकर
नाशिक शहरात तीस वर्षापूर्वी टाकलेल्या जलवाहिन्या जीर्ण बदलास पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महत्वाच्या असलेल्या अमृत २ अभियानांतर्गत ३०५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला सुधारीत प्रस्तावाला स्थायी समितीने काल मान्यता दिलीये... आयुक्त मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे सिंहस्थापूर्वी पाणीपुरवठ्याच्या कामांना वेग येणार आहे. शहराची हद्दही वाढत असून सन २०५० पर्यंत लोकसंख्या ५५ लाखांच्या घरात पोहचणार आहे.... तिची तहान भागविणे मनपासाठी मोठे आव्हान असून शहरात तीस वर्षापूर्वी टाकलेल्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत.... त्यामुळे मनपाने केंद्राच्या अमृत दोन योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी निधीची मागणी केली होती. या योजने अंतर्गत मनपाला या योजनेला मंजुरी मिळालीये....
1
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 10, 2025 04:03:25Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातल्या धानोरा येथील सतीश दुर्गावर हे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. सततधार पावसामुळे झरी जामणीत नाल्यांना आणि खुनी नदी क्षेत्रात पूर परिस्थिती निर्माण झाली.
सतीश दुर्गावर हे शेतातून परत येत असताना नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले, कालपासून त्यांचा शोध सुरू आहे.
1
Share
Report