Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

अंबरनाथच्या अल्पवयीन मुलांची गुंडगिरी: इन्स्टाग्रामवर चाकूचा फोटो!

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 19, 2025 10:33:05
Ambernath, Maharashtra
अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलं गुंडगिरीच्या मार्गावर! इन्स्टाग्रामवर रील अन स्टोरी टाकत गुन्हेगारीचं समर्थन पोलिसांनी युवकांना 'योग्य दिशा' दाखवण्याची आवश्यकता Amb reel Anchor : अंबरनाथमध्ये १५ ते १८ वयोगटातली अल्पवयीन मुलं गुन्हेगारीच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळतंय. अशाच एका मुलाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या रील अन स्टोरीवर चाकूच्या फोटोमुळे या मुलांना पोलिसांनी योग्य दिशा दाखवून त्यांची गुन्हेगारीची नशा उतरवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जातेय. Vo : इन्स्टाग्रामवर बद्री यादव नावाने एक अकाउंट तयार करण्यात आलं असून त्यावर एक रील शेअर करण्यात आलीये. यात आम्हाला पोलीस स्टेशनची केस आवडत असल्याचं या तरुणांचं म्हणणं आहे. याच अकाउंटवर स्टेटसला स्टोरी ठेवण्यात आली असून त्यात चाकूचा फोटो ठेवण्यात आलाय, आणि बॅकग्राऊंडला सरकार चित्रपटातील गाणं ठेवण्यात आलंय. हे पाहिल्यानंतर अंबरनाथ शहरातली तरुणाई कोणत्या दिशेनं चाललीये, असा प्रश्न उपस्थित झालाय. शहरात सोल्युशन, व्हाईटनर हुंगत फिरणारी अल्पवयीन मुलं सर्रास पाहायला मिळतात. हीच मुलं गुन्हेगारीकडेही वळू लागली असून पोलिसांनी या मुलांना समजेल, अशा भाषेत पोलिसांनी त्यांना समजवावं, अशी मागणी नागरिकांमधून केली जातेय. चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top