Back
उल्हासनगरमध्ये इमारतीचा सज्जा कोसळला, कामगाराचा मृत्यू!
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 20, 2025 17:31:03
Ambernath, Maharashtra
इमारतीचा सज्जा कोसळून कामगाराचा मृत्यू
उल्हासनगरच्या फर्निचर मार्केटजवळील घटना
Bdl slab collapsed
Anchor :- उल्हासनगर फर्निचर मार्केटजवळील माया हॉटेल शेजारील जुनी आणि जर्जर झालेल्या इमारतीचा सज्जा कोसळल्याची घटना घडली. प्लास्टर आणि लादी लावण्याचे काम सुरू असताना अचानक सज्जा कोसळला आणि त्याखाली एक कामगार अडकून त्याचा जागीच मृत्यू झाला. या मृत कामगाराचे नाव रावसाहेब ननावरे आहे, अग्निशमन दल दलघटनास्थळी दाखल झाले असून ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.
Byte प्रत्यक्षदर्शी
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
13
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowJul 20, 2025 18:02:56Pune, Maharashtra:
ज्ञानोबा तुकोबा आळंदीत
alandi palakhi
kailas puri Pune 20-7-25
feed by 2c
ANCHOR - देवाच्या आळंदीत संध्याकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 वे जन्म वर्ष आणि संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या वैकुंठ गमन वर्षाचे औचित्य साधून संत तुकाराम महाराजांची पालखी आज परतीच्या प्रवासादरम्यान संत तुकाराम महाराजांची आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची संतभेट झाली आहे,सन 1685 साली संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांनी पालखी सोहळा पंढरपूर हून येताना परतीचा प्रवास हा आळंदी मार्गे होता त्या आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळालाय, दरम्यान आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची भेट संजीवन समाधी मंदिरात पार पडलीय , आज संत तुकाराम महाराजांची पालखी मंदिरातील कारंजा मंडपात मुक्कामी असणार असून, उद्या आळंदी ते देहू असा परतीचा प्रवास करणार आहे.
7
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 20, 2025 15:00:36Ambernath, Maharashtra:
बदलापुरात प्रचंड वाहतूक कोंडी
सिग्नल यंत्रणा ही कोलमडली
Bdl traffic
Anchor बदलापूर शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत महामार्गावरील कात्रप परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे , या वाहतूक कोंडीमुळे कात्रप ते शिरगाव चौकातील सिग्नल यंत्रणा ही अक्षरशः कोलमडली या परिसरात एक ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या आज रविवारचा असल्याने अनेक जण हे कर्जत नेरळ या भागात पर्यटनासाठी जात असतात संध्याकाळच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघालेले पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला ,
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
2
Share
Report
APAMOL PEDNEKAR
FollowJul 20, 2025 14:01:57Mumbai, Maharashtra:
अकरा वर्षाच्या मुलाला पिटबुल जातीच्या कुत्र्याने घेतला चावा
मानखुर्द विभागातील एका 11 वर्षाच्या मुलाला पिटबुल जातीच्या कुत्र्या द्वारे रिक्षामध्ये एका इसमाद्वारे जाणून बुजून घाबरवले जात असलेला व्हिडिओ समोर आला आहे घाबरत असताना कुत्र्याने त्या मुलाला त्याच्या मानेवर चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे त्या मुलाला चावा घेतला असता मुलाने तिथून पळ काढला असता पिटबुल त्याच्या मागे लागला असून त्या श्वानाने त्याला परत विविध ठिकाणी चावा घेतला मुलाने सर्व घडलेली घटना त्याच्या वडिलांना सांगितले असता वडिलांनी मानखुर्द पोलीस स्टेशन गाठले आणि संबंधित पिटबुल च्या मालकावर गुन्हा नोंदविला असून पुढील तपास मानखुर पोलीस स्टेशन करीत आहे
बाईट
पीडित मुलगा
मुलाचे वडील रिजवान
1
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 20, 2025 13:35:25Dhule, Maharashtra:
ANCHOR - नाशिक आणि धुळे जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले चिवटीबारी हे ठिकाण सध्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनले आहे. येथील घनदाट जंगल, डोंगरदऱ्या आणि विशेषतः 'गायका' डोंगरावरून २५० फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पावसाळ्यात पाहण्यासारखा आहे.
चिवटीबारीमध्ये काय पाहाल भव्य धबधबा: 'गायका' डोंगरावरून कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा मनाला भुरळ घालतो.हिरवीगार वनराई: चहूबाजूंनी हिरवीगार झाडी आणि निसर्गरम्य वातावरण मन शांत करते. येथे २०० वर्षे जुने गणपती मंदिर आणि परशुराम मंदिर आहे, जे भाविकांना आकर्षित करते. नवीन पर्यटन सुविधा: २०२५ पासून पर्यटकांसाठी येथे आकर्षक झोपड्या आणि कमानी तयार करण्यात आल्या आहेत. येथे अनेक वन्यपक्षी, वन्यजीव आणि विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील अनेक पर्यटक तसेच भाविक कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि देवदर्शनासाठी येथे येत आहेत. गणपती मंदिरात जाण्यासाठी जंगलातील वाटेचा वापर करावा लागतो, तर धबधबा आणि परशुराम मंदिर रस्त्यावरूनच दिसतात.हा खांदेशचा पश्चिम पट्टा पावसाळ्यात आणि हिवाळ्यातही कोकणासारखाच सुंदर दिसतो.
BYTE - पर्यटक
BYTE - पर्यटक
प्रशांत परदेशी, धुळे.
13
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 20, 2025 13:35:14Dhule, Maharashtra:
Anchor कडू कारल्यामुळे सागर पाटील या तरुण शेतकऱ्याच्या आयुष्यात गोडवा निर्माण झाला आहे.पारंपारिक शेतीपेक्षा कारल्याची शेती फलदाजी असल्याचे शेतकरी सागरी पाटील यांनी सांगितले.गेल्या तीन वर्षांपासून सागर पाटील लाखो रुपये कारले उत्पादनातून घेत आहे.यंदा देखील सहा एकरात ८ ते १० लाखांचे उत्पन्न सागर पाटील यांना अपेक्षित आहे. कापूस ,मका या पिकांना लागणारा खर्च आणि त्यापेक्षाही पारंपरिक शेतीतून सहा महिन्यांच्या कालावधीत मिळणारे उत्पन्नामुळे आर्थिक उत्पन्न गणितं कोलमडत. पारंपरिक पिकांमध्ये लागवडी पासून तर त्याला लागणारे खत, फवारणी यासह अनेक खर्चीक बाबींनतर सहा महिन्यांच्या कालावधी नंतर उत्पादनात येणारी घट व मिळणारे उत्पनाचा ताळमेळ बसत नसल्याने आर्थिकदृष्ट्या संकटात येत असल्यामुळे शेतकरी सागर पाटील यांनी नगदी पिक म्हणून तिन वर्षांपूर्वी शेतात कारल्याचे उत्पादन घेण्याचे ठरवले. आणि पहिल्या वर्षापासून कारल्यांनी लाखोंचा नफा कमवून दिला असून विशेष म्हणजे दर दोन ते तीन दिवसाआड पैसा खेळता राहत असल्याने आर्थिक विवंचनेतून दूर होत असल्याचे शेतकरी सागर पाटील यांनी सांगितले. कारलेची सगळ्यात जास्त मागणी वसई किंवा गुजरात मधील सुरत येथील बाजारात आहे.सुरत वाहतूकीला जवळ पडत असल्याने २० ते २५ किलो पिशवीत कारल्या गडे करून शेतातूनच कारले वाहनात टाकून गुजरातच्या सुरत येथे विक्रीसाठी पाठविले जातात. कारल्याला सध्या स्थितीत,५० ते ६० रुपये किलोचा भाव असल्याने पहिल्या दोन तेड्यातच यांना ५० हजारांचे उत्पन्न मिळाल्याचे शेतकरी सागर पाटील यांनी सांगितले.अशाच पध्दतीने भाव मिळाला तर यंदा १० लाखांचे उत्पन्न सागर पाटील यांना अपेक्षित आहे.
Byte सागर पाटील,शेतकरी
प्रशांत परदेशी, धुळे.
13
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 20, 2025 13:32:52Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे जिल्ह्यातील १२ मध्यम प्रकल्पांपैकी सहा मध्यम प्रकल्पांमध्ये अद्याप ५० टक्क्यां पेक्षा कमी जलसाठा आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर पाण्याचे संकट उभे राहू शकते. शिरपूर तालुक्यासाठी महत्वाचा ठरणारा करवंद मध्यम प्रकल्पात फक्त २५ टक्के जलसाठा शिल्लक आहे तर अनेर मध्यम प्रकल्पात २९ टक्के जलसाठा आहे.धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस नसल्याने जलस्रोतांमध्ये पाण्याची पातळी वाढलेली नाही.अशीच परिस्थिती राहीली तर पाण्याचे मोठे संकट निर्माण होऊ शकते अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
1
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 20, 2025 13:32:45Dhule, Maharashtra:
ANCHOR - शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीत चोरुन लपून सुरु असलेल्या गावठी हातभट्टी चालकांवर शिदखेडा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांना गोपनीय बातमीदारा मार्फत या संदर्भात बातमी मिळाली होती. शिंदखेडा हद्दीतील कब्रस्तान च्या पाठीमागे तसेच चिमठाणे पोलीस दुरक्षेत्र हद्दीतील दराने गाव शिवारात शिव रस्त्यालगत अवैधरीत्या गावठी दारु गाळण्याची हातभट्टी बांधुन गावठी हातभट्टीची दारु तयार करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार अशांची वेगवेगळी पथके तयार करुन ही कारवाई केली. गावठी दारू सह अन्य मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे.
बाईट - हनुमान गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदखेडा
प्रशांत परदेशी, धुळे.
2
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 20, 2025 13:32:06Pandharpur, Maharashtra:
20072025
slug - PPR_KARMALA_ACCIDENT
feed on 2c
file 01
-----
Anchor - करमाळा जातेगाव रस्त्यावर वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या पीकअप गाडीचा अपघात
वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा तसेच स्थानिक गाडीतून माशांसाठी खाद्य घेऊन जाणाऱ्या पीकअपचा समोरासमोर अपघात झाल्याने आठ ते दहा वारकरी जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना करमाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
सदरची घटना जातेगाव रस्त्यावर कामोणे फाटा परिसरात घडली आहे
2
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 20, 2025 13:30:27Dhule, Maharashtra:
Anchor - धुळे शहरात युतीतील दोन पक्षांमधील नेत्यांमध्ये वाक युद्ध रंगल आहे. भाजप आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मांध वृत्तीला रोखण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसं अजित पवार गटात दखल झालो असून, आमदार अग्रवाल यांच्या धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नाला हाणून पाडू अस खुलं आव्हान एम आय एम मधून नुकतेच राष्ट्रवादीत आलेले माजी आमदार फारुख शाह यांनी दिले आहे. शाह यांचं हे आव्हान आमदार अग्रवाल यांना चांगलेच जिव्हारी लागले असून, त्यांनीही जाहीर सभेत शाह यांचा एकेरी उल्लेख करीत शाह यांच्या बापाचा बाप आला तरी आपले खच्चीकारण करू शकत नाही असं वक्तव्य केले आहे. माजी आजी आमदारत पहिल्याच काही दिवसात संघर्षाची ठिणगी पडली आहे. यां दोन्हीमधील वैर सर्वश्रुत असतांना अजित पवार यांनी भाजपाला खिजवण्यासाठी शाह यांचा प्रवेश करून घेतल्याची चर्चा आहे. एकाहती सत्तेच स्वप्न पाहणाऱ्या भाजपाला शह देण्यासाठी फारुख शाह यांचा पक्ष प्रवेश केला गेला. येणाऱ्या काळात यां दोघांमधील संघर्षा अधिक तीव्र होताना दिसणार आहे.
Byte - फारुख शाह, माजी आमदार
Byte - अनुप अग्रवाल, आमदार, भाजप
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 20, 2025 13:09:51Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2007ZT_INDAPURBHRNE
BYTE 1
युवक कल्याण खाते हे शासनाला कळलंच नाही ! मंत्री दत्तात्रय भरणेंच्या विधानाने खळबळ…
Anchor_ युवक कल्याण खाते हे इतके दिवस शासनाला काय कळलेच नाही असं खळबळजण विधान राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर मधील एका कार्यक्रमात केले आहे.
इंदापूर शहरातील दहीहंडी पथकाच्या गोविंदाना मंत्री भरणे यांच्या हस्ते मॅट वाटप करण्यात आल्या.या कार्यक्रमात बोलताना भरणे म्हणाले, की माझ्याकडे युवक कल्याण खातं आहे, इतके दिवस शासनाला हे खात कळालं नाही.आता मामा हे खाते जोरात सुरू करणार आहे.या खात्याच्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन शिबिरे, नोकरी महोत्सव आयोजित केले जाणार असून याचा फायदा इंदापूर तालुक्यातील तरुणांना होणार आहे. आपल्याला जी संधी मिळते त्याचं सोनं करायचं असतं हे सांगायलाही भरणे विसरले नाहीत.
मात्र भरणे यांच्या या विधानामुळे यापूर्वीच्या सरकारने दुर्लक्ष केल्याचं अधोरेखित होतं आहे.
बाईट _ दत्तात्रय भरणे कॅबिनेट मंत्री
10
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 20, 2025 13:05:29Raigad, Maharashtra:
रायगड ब्रेकिंग :
अँकर - किल्ले रायगड ते माणगाव मार्गावर पर्यटकांच्या मिनीबसला अपघात
घरोशीवाडी येथील अवघड वळणावर मिनीबस उलटली
एक पर्यटक गंभिर तर 10 पर्यटकांना किरकोळ दुखापत
जखमी पर्यटकांवर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु
बाईट - बसमधील प्रवासी पर्यटक
2
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 20, 2025 13:03:33Raigad, Maharashtra:
स्लग - अलिबाग वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी .....
अँकर - अलिबाग वडखळ मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तिनविरा धरण ते धरमतर दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. धरम तर पुलाजवळील खड्डे आणि बेशिस्त वाहन चालक यामुळे वाहतूक कोंडी होते आहे. 10 किलोमीटर अंतर पार करायला एक ते दीड तास लागतो आहे.
3
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 20, 2025 12:35:00Kalyan, Maharashtra:
कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार
कल्याणमधील एका नामांकित शोरूममधून युवतीने घेतला लेहंगा घागरा परत न घेण्यावरून दुकानात चुकू दाखून धमकी
खरेदी केलेल्या लेहंगा घागरा घ्यायचा नाही, पैसे परत द्या, युवतीच्या मित्राने केली मागणी..
लेहंगा घागरा ऐवजी काही दुसरे कपडे खरेदी करा
मात्र दुकानदाराने पैसे परत करण्यास केला नकार
दुकानदाराने नकार केल्यानंतर सुमित सयानी नावाच्या या संतापलेला तरुणाने चाकू काढून आधी लेहंगा घागरा फाडला आणि नंतर दुकानदाराला धमकी दिली तुम्हाला पण असाच फाडणार माझे पैसे परत द्या
घटना सीसीटीव्हीत कैद
गुंडगिरी करणारा सुमित सयानीला याला पोलिसांनी केली अटक
10
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 20, 2025 12:34:28Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2007ZT_INDAPURHOLKR
FILE 2
इंदापुरात पार पडली राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती.....क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती....
Anchor_पुण्याच्या इंदापूर मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती साजरी करण्यात आलीय.या सोहळ्याला राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती होती. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं...
14
Share
Report