Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण में चेन स्नैचिंग के इरानी आरोपी को पुलिस ने गिरफ्तार किया

ABATISH BHOIR
Nov 02, 2025 10:48:04
Kalyan, Maharashtra
चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत इराणी गुन्हेगाराला कल्याण झोन 3 पोलिसांनी ठोकल्या बेड्या! अर्धा किलोमीटर पाठलागानंतर फिल्मी स्टाईलमध्ये पकडला आरोपी! घटना सीसीटीव्हीत कैद. आरोपी जुल्फेकार इराणी हा मुंबईतील अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असून.. याला पकडताना घरच्यांनी ही पोलिसा सोबत घातला गोंधळ. आरोपीला जुल्फेकार इराणीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले असून तपासात मुंबईतील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता! राज्यात महिलांच्या चेन स्नॅचिंगच्या मालिकेनं डोकेदुखी ठरलेल्या सराईत इराणी टोळीच्या सदस्याला अखेर कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत! अर्धा किलोमीटर गल्लीबोळातून पाठलाग करत कल्याण परिमंडळ 3 च्या पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराला पकडलं. विशेष म्हणजे, आरोपीला पकडताना त्याच्या घरच्यांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला — पण तरीही पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आरोपीला ताब्यात घेतलं! जुल्फेकार इराणी असे या इराणी आरोपीचे नाव असून हा मुंबईतील अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी होता.. सध्या कल्याण पोलिसांनी या आरोपीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले असून तपासात मुंबईतील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MKManoj Kulkarni
Nov 02, 2025 16:47:17
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 02, 2025 16:47:09
Shirur, Maharashtra:बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाची गाडी जाळीत वनविभागाचं कार्यालय पेटवून देत संतप्त ग्रामस्थांकडून बेल्हे जेजुरी महामार्गावरील पंचतळे आणि अष्टविनायक महामार्गावरील रोडेवाडी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आला असून गेली तीन तासापासून महामार्ग रोखल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीय, यावेळी आंदोलकांनी जोपर्यंत वनमंत्रित घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देत घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी आंदोलकांनी केलीय。
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 02, 2025 15:52:55
Washim, Maharashtra:अँकर:इतिहासात वत्सगुल्म म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाशिममध्ये असंख्य पुरातन मंदिरे आहेत, ज्यामध्ये भगवान पद्मेश्वर मंदिर विशेष महत्त्वाचे आहे.कार्तिकी एकादशीच्या पवित्र दिवशी येथे श्रद्धेने हजेरी लावणाऱ्या भाविकांची मोठी उपस्थिती अनुभवायला मिळत आहे. मंदिराच्या सभोवताली आणि पद्मतीर्थ तलावाजवळ आकर्षक रोषणाई आणि दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे.प्रबोधिनी भागवत एकादशीच्या निमित्ताने महादेवाच्या मंदिरावर विविध सजावटीने सुंदर आरास करण्यात आली आहे. दीपोत्सव आणि महाआरतीच्या भव्य सोहळ्यामुळे वातावरण भक्तिमय झाले असून, हजारो भाविकांनी या दिव्य क्षणांचा आनंद घेतला आहे. विविध सजावट आणि रोषणाईमुळे भगवान महादेवाच्या मूर्तीला एक आगळं वेगळं रूप प्राप्त झालं आहे, ज्याचे दर्शन घेण्यासाठी भक्तांचा ओघ मंदिराकडे वाढत होती.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 02, 2025 15:30:20
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीत पोहताना 2 मुलं बुडाली तर 2 मुलांना वाचवण्यात यश आले आहे. वरोरा शहराजवळ असलेल्या वर्धा नदीच्या तुराणा घाटावरील ही घटना उजेडात आली. बुडालेल्या मुलांचा शोध सुरू आहे मात्र संध्याकाळ झाल्याने शोध कार्य थांबवण्यात आले असून उद्या सकाळी पुन्हा शोध सुरू होणार आहे. वरोरा शहरातील कर्मवीर वार्डमधील रुपेश विजेंद्र खूळसंगे (वय १३ वर्ष) आणि प्रणय विनोद भोयर (वय १५ वर्ष) ही दोन मुले त्यांच्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी सायकलने वर्धा नदीच्या तुराणा घाटावर गेली होती. नदीपात्रात खोल पाणी असल्याने तिथे पोहत असताना चारही मित्र बुडू लागले. मुलांचा आवाज ऐकल्यावर जवळच असलेल्या एका गुराख्याने त्वरित त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. गुराख्याने उमंग धर्मेंद्र आत्राम आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे या दोन मुलांना यशस्वीरित्या किनाऱ्यावर काढले. मात्र दुर्दैवाने रुपेश आणि प्रणय ही दोन मुले खोल पाण्यात वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर येथील बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 02, 2025 15:00:34
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 02, 2025 14:35:58
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 02, 2025 14:29:14
Pandharpur, Maharashtra:स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनावों के बीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने सोलापुर जिले में भाजपा के विधायक को एक प्रकार से धक्का देते हुए चुलत भाव के हाथ धनुष-बाण देने की चाल चली है। सोलापुर जिले में शिवसेना के कुछ पदाधिकारी अब भाजपा में आए हैं और कुछ के आने की राह पर हैं। इन घटनाक्रमों के बीच उपमुख्यमंत्री शिंदे ने भाजपा विधायक समाधान आवताडे के चचेरे भाई के साथ निकटता बढ़ाने की कोशिश की है, जिससे संकेत मिल रहे हैं कि वह भी अपनी योजना को अंजाम देने के लिए तैयार हैं। कल पंढरपूर से पूर्व मंगळवेढा के भाजपा विधायक समाधान आवताडे के चाचा और मंगळवेढा तालुक्य के एक प्रमुख नेता बाबनराव आवताडे के पुत्र सिद्धेश्वर आवताडे के दफ्तर में जाकर उनका सम्मान स्वीकार किया गया। भाजपा विधायक के चाचा और भांजे के शिवसेना में प्रवेश की तैयारी की चर्चा चल रही है। इस क्रम में शिवसेना की ताकत भी बढ़ रही है। भाजपा ने पिछले कुछ दिनों में शिवसेना के सोलापुर और मोहोळ जिलों के कुछ नेताओं को भाजपा में प्रवेश दिया है, और माढा के शिवाजीराव सावंत के प्रवेश की भी संभावनाएं बताई जा रही हैं। इस प्रकार अब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने पंढरपूर में कार्तिकी एकादशी महापूजन के अवसर पर स्वयं भाजपा विधायक आवताडे के घर धनुष-बाण मारकर उनके शिवसेना में प्रवेश की संभावना के संकेत दे दिए हैं।
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 02, 2025 14:00:23
Dhule, Maharashtra:शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर न टाकणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे. निसर्गाचा लहरीपणा हा शेतकऱ्यांसह महाराष्ट्राला अडचणीत आणत असून ज्या ज्या ठिकाणी अवकाळी मुळे नुकसान होते त्या त्या ठिकाणी पंचनामा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याऋंही मंत्री रावल यावेळी म्हणाले. रोजच पाऊस पडत असून या पावसामुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झाल्याचाही ते यावेळी म्हणाले. दरम्यान धुळे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश आपण प्रशासनाला दिले असून पंचणण्यांचे प्रस्ताव राज्य शासनाला पाठवून तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याचंही मंत्री रावल यांनी यावेळी स्पष्ट केला आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 02, 2025 13:54:03
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 02, 2025 13:49:41
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जत में भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे डिजिटल फलक आले फाडण्यात,आक्रमक पडळकर समर्थकांनी केला रस्ता रोको आंदोलन. जत शहरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून करण्यात आलेले विकास कामांची माहिती देण्यात येणारे डिजिटल फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.दरम्यान अज्ञातांकडून हे डिजिटल पोस्टर फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.या घटनेनंतर आक्रमक झालेल्या पडळकर समर्थकांनी जत शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन करत निषेध नोंदवला आहे. विजापूर-गुहागर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केला.त्यामुळे काही काळ या ठikाणी वाहतूक ठप्प झाली होती.पोलिसांना निवेदन देत डिजिटल फलक फाडणारेच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी जत मधील राजारामबापू साखर कारखान्याचा नाव फलक बदलण्याची घटना घडली होती.यामुळे जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर असा नवा संघर्ष निर्माण झालेला असताना पडळकरांचे डिजिटल फलक फाडण्यात आल्याने आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 02, 2025 13:32:19
Chendhare, Alibag, Maharashtra:ते केवळ दिवाळी सणासाठी एकत्र आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा खुलासात.... कर्जत मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र... सोशल मीडियावर फोटो व्हायरल... अँकर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कर्जत तालुक्यात शिवसेना ठाकरे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरे गटाचे नितीन सावंत यांची एकत्रित बैठकही झाली त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र हे लोक दिवाळी सणानिमित्त एकत्र आल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केलाय. दिवाळी साठी सगळे एकत्र येतात तसे ते एकत्र आल्याचं तटकरेने सांगितलं. या मुद्द्यावर अधिक बोलणे त्यांनी टाळलं.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 02, 2025 13:16:37
Beed, Maharashtra:बीड:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंडे-धस संघर्ष Anc: मंत्री पंकजा मुंडे यांनी आष्टी मतदारसंघात लक्ष देण्याची भूमिका जाहीर करून आमदार सुरेश धस यांना आव्हान दिले. दरम्यान यालाच आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या राज्याच्या मंत्री आहेत. त्यांना काय लक्ष घालायचं ते घालू द्या. आम्ही कुठे काय म्हणतो. अस म्हणत मुंडे धस संघर्षावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी मध्ये दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात आष्टी मतदारसंघात मी स्वतः लक्ष घालणार असे जाहीर केले. मुंडेंच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा मुंडे धस संघर्ष दिसून आला. केज आणि आष्टी मतदार संघात आमचे जिल्हा परिषदेचे जास्त सदस्य आहे. मला कुणाचीही एलर्जी नाही. मात्र आष्टीत आमच्याच माणसावर अटॅक केला जातो. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धस यांना लक्ष केले. साऊंड बाईट: पंकजा मुंडे दरम्यान पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाष्य करत आमदार धस यांनी त्या राज्याच्या मंत्री आहेत. त्यांना काय लक्ष घालायचं ते घालू द्या.. आम्ही कुठे काय म्हणतो.. असा टोला लगावला. आष्टी मध्ये आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान धस यांनी मुंडेंना हे प्रत्युत्तर दिले. बाईट:सुरेश धस
0
comment0
Report
Advertisement
Back to top