Back
शिंदे का आह्वान: अर्बन फॉरेस्ट और बांबू से महाराष्ट्र का पर्यावरण सुधरेगा
SKSACHIN KASABE
Nov 02, 2025 05:17:20
Pandharpur, Maharashtra
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या माध्यमातून पंढरपुरात कार्तिकी वारी निमित्ताने जन जागृती कार्यक्रम उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, MPCB चे अध्यक्ष सिद्धेश कदम , ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने वातावरणात अनेक अनिष्ट बदल होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती सह प्रदूषणीय आपत्ती मध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. नगर विकास विभागाच्या मार्फत राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, नगरपालिका व नगरपंचायती मध्ये "अर्बन फॉरेस्ट" हा उपक्रम राबवण्यात येणार असून यात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उपमुख्यमंत्री श्री शिंदे पुढे म्हणाले की, ग्लोबल वार्मिंग, क्लायमेट चेंज मुळे मे महिन्यात, नोव्हेंबर मध्ये पाऊस पडणे तसेच पावसाळ्यात ढगफुटी होऊन अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी सर्व नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती महत्वाची आहे. त्याप्रमाणेच ठाणे महापालिकेने चार ठिकाणी अर्बन फॉरेस्ट अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केलेली आहे. तरी राज्यातील सर्व शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून अर्बन फॉरेस्ट अंतर्गत वृक्ष लागवड करावी. त्याप्रमाणेच राज्यात बांबू लागवडीचे क्षेत्र किमान एक लाख हेक्टर पर्यंत वाढवावे, यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रयत्न करावेत. बांबू ही बहुपर्यायी तसेच पर्यावरण पूरक वृक्ष लागवड आहे असे त्यांनी सांगितले. राज्यातील शेतकऱ्यावर अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे मोठे संकट आलेले आहे, शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकरी कर्जमाफीसाठी शासनाने समिती गठीत केलेली आहे. या संकटाच्या काळात जी तातडीची मदत करावयाची होती ते शासन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करत असल्याचेही माहिती उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली. पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून लहान मुलांमध्ये पर्यावरण जागृती करण्यासाठी त्यांना शालेय जीवनापासूनच वृक्ष संवर्धनाचे महत्त्व याबाबत जागृत केले पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती शिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच आषाढी व कार्तिकी वारी पुरते पर्यावरण जागृतीचा संदेश देण्याशिवाय संपूर्ण वर्षभर सातत्याने असे उपक्रम राज्यभरात घेण्यासाठी प्रदूषण मंडळ व पर्यावरण विभागाने नियोजन करावे, यासाठी आवश्यक सर्व प्रकारचे सहाय्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील सर्व गड किल्ले ही खूप मोठी संपत्ती असून हे गड किल्ले स्वच्छ करण्याची मोहीम लवकरच रायगड किल्ल्यापासून करावी. प्रदूषण मंडळाने पर्यावरण समतोल तसेच जनजागृतीसाठी अद्यावत तंत्रज्ञान चा वापर करावा. सध्याचे कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत कुशल पद्धतीने करावा. पर्यावरण संवर्धनासाठी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी असेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. पर्यावरण पूरक विकासासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा तसेच प्रत्येकाने राज्याच्या सर्वांगीण विकासाचे वारकरी व्हावे असेही आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक असलेल्या बांबू लागवडीचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आल्याचे सांगून पर्यावरण संवर्धनासाठी संपूर्ण राज्यभरात जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. Yावेळी उपमुख्यमंत्री महोदय तसेच सर्व मान्यवरांनी टाळ मृदंगाच्या गजरात पावली केली. यावेळी उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी या पर्यावरण शिक्षण उपक्रमाचा समारोप झाला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MKManoj Kulkarni
FollowNov 02, 2025 10:50:190
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 02, 2025 10:49:250
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 02, 2025 10:48:200
Report
ABATISH BHOIR
FollowNov 02, 2025 10:48:040
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 02, 2025 10:34:440
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 02, 2025 10:23:110
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 02, 2025 10:04:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 02, 2025 10:02:230
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 10:01:570
Report
जिजाऊ ब्रिगेड का महाराष्ट्र Maha अधिवेशन चंद्रपूर में 21-23 नवंबर: विशेषज्ञों के साथ वैचारिक मेजवानी
AAASHISH AMBADE
FollowNov 02, 2025 09:49:320
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 02, 2025 09:49:100
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 02, 2025 09:48:460
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 02, 2025 09:02:340
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 02, 2025 08:32:420
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 02, 2025 08:19:460
Report