Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

शिंदे गट के 35 विधायक भाजपा में शामिल होंगे, उदय सामंत के नेतृत्व में

AAABHISHEK ADEPPA
Dec 09, 2025 13:34:19
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - शिंदे गटाचे 22 नाही 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, उदय सामंत यांच्या नेतृत्वात हे नेते भाजपमध्ये जाणार - चंद्रकांत खैरे LIVE LINK (((( https://www.facebook.com/share/v/1HTuU3PqSk/ )))) शिंदे गटाचे 22 नाही 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, उदय सामंत यांच्या नेतृत्वात हे नेते भाजपमध्ये जाणार शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा मोठा दावा “मला शिंदे सेनेतील काही आमदार भेटले होते तेच मला म्हणाले होते की आम्ही 22 नाही आम्ही 35 जण तयार आहोत‘’ ‘’सामंत यांच्या नेतृत्वात आम्ही जाणार आहोत, सामंत यांचे नाव त्याच दोन आमदारांनी मला सांगितलं‘’ ऑन महाविकास आघाडी --- सोलापुरातील स्थानिक निवडणुकांसाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, माकप, तसेच समाजवादी पार्टी देखील आमच्यासोबत सोलापुरात असणार आहे कुरकुर ही प्रत्येक पक्षात असते. आडम मास्तर, शिंदे साहेब यांना विनंती करून आम्ही सोलापूरात मोठा मेळावा आगामी निवडणुकीच्या संदर्भात घेणार आहोत आगामी निवडणुकीच्या संदर्भात जो कार्यकर्ता निवडून येईल असा वाटतोय त्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा असा मी ठरवला आहे पळवा पळवी करणारे भाजपवाले म्हणायचे की ही आघाडी होणारच नाही आणि ही आघाडी आता सोलापूरला झालेली आहे आणि महाराष्ट्राने पाहिला आहे. ऑन शरद कोळी प्रणिती शिंदे विधान शरद कोळी जे म्हणाले असतील ते त्यांच व्यक्तिगत मत आहे ते पक्षाचे मत नाही. पक्षाचा नेता मी आहे म्हणून या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करतो संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना आणि मनसे एकत्र असेल भाजपने निवडणूक मध्ये एवढे पैसे वाटले याकडे राज्य निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केले ऑन आमदार महेंद्र थोरवे-तटकरे विधान त्यांचं म्हणणं म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा, त्यांच्यात आता भांडण सुरु झाली आहेत त्यांच्या भांडणमुळे देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा किती नर्व्हस झाला आहे त्यांच्यात आपसातली भांडण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेत नगरपालिका निवडणुकीत देखील त्यांच्यात पैसे कोण जास्त वाटणार यामध्ये शर्यत लागली होती एकत्रित चहा पिणे वगैरे सगळं खोटं आहे, मनातून फाटाफूट झाली आहे ऑन विरोधीपक्ष नेते पद दोन आमदार असताना देखील काँग्रेसने विरोधी पक्ष नेते पद दिले होते आता त्यांना मुद्दाम विरोधी पक्ष नेता होऊ द्यायचा नाहीये लोकशाहीचा स्तंभ असताना विरोधी पक्ष नेता होऊ द्यायचं नाही म्हणून सत्ताधारीवर आता फार मोठा मारा होणार आहे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी हे सगळं सुरु आहे आमच काय चुकतंय हे सांगणारा कोणी तरी असला पाहिजे अशी भूमिका आधीच्या सरकारची होती विरोधपक्ष नेता असेल तर राज्य करण्याची पद्धत आणखी मजबूत होईल ऑन वेगळं विदर्भ लोकसभेत ज्या वेळी हा मुद्दा आला होता त्याचं वेळी हा मुद्दा संपला होता, भाजपने असं काही करणार नाही असं उत्तरात सांगितले होत बावनकुळे यांनी आता मुद्दा पुन्हा उकरून काढलाय, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीला बावनकुळे घाबरले आहेत त्यामुळे त्यांनी हा मुद्दा काढलाय ऑन वडेट्टीवार वेगळा विदर्भ पाठिंबा त्यांचं मतं हे स्वतःच असेल, काँग्रेसची भूमिका ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना विचारतील मी तर महाराष्ट्र अभिमानी आहे, कोणी जर महाराष्ट्रचे तुकडे पडण्याची हिंमत दाखवत असेल आम्ही महाराष्ट्र अभिमनी लोकं ते कधीही सहन करणार नाही संयुक्त महाराष्ट्र व्हावं यासाठी 107 हुतात्मे झाले, हा महाराष्ट्र तोडण्याची कोणाची हिंमत आहे? शिंदे गटाच्या लोकांना विचारा आता त्यांची भूमिका काय आहे. बाईट : चंद्रकांत खैरे, माजी खासदार
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVijay1 Kumar
Dec 09, 2025 14:50:13
Noida, Uttar Pradesh:नोएडा में फेस वन थाना पुलिस ने साइबर सेल के सहयोग से ऑनलाइन गेमिंग/बैटिंग एप के माध्यम से ठगी करने वाले गिरोह का किया खुलासा। पुलिस ने कार्रवाई करते हुए 2 शातिर साइबर ठगों को किया गिरफ्तार। पुलिस ने मौके से 7 लैपटॉप, 8 मोबाइल, व अन्य सामान किया बरामद। मूल रूप से अलग अलग जनपदों के रहने वाले है आरोपी सचिन गोस्वामी व कुणाल गोस्वामी। शातिर अभियुक्त ऑनलाइन गेमिंग/बैटिंग एप के माध्यम से मोटा मुनाफा कमाने का झांसा देकर युवाओं को बनाते थे ठगी का शिकार। शातिर अभियुक्तों द्वारा अभी तक लाखों रुपए की ठगी को दिया जा चुका है अंजाम। नोएडा के फेस 1 थाना पुलिस ने थाना क्षेत्र के अंतर्गत सेक्टर 2 से किया गिरफ्तार。
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 09, 2025 13:20:37
Chendhare, Alibag, Maharashtra:अंबादास दानवे यांच्या कॅशबॉम्बवर शिवसैनिकांमध्ये संताप ...... दानवे यांच्या कृत्याचा रायगडात ठिकठिकाणी निषेध ...... अंबादास दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन ....... आमदार महेंद्र दळवी यांच्या बदनामीचे षडयंत्र ....... फेक व्हिडिओ व्हायरल केल्याचा दावा ...... दानवे यांच्या माफीनाम्याची मागणी ....... अँकर - ऐन नागपूर अधिवेशन काळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कॅशबॉम्ब टाकला. यामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. आज अलिबागसह रोहा, मुरुड या ठिकाणी शिवसैनिकांनी दानवे यांच्या कृत्याचा निषेध केला. अलिबागमध्ये जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले. आमदार महेंद्र दळवी यांना आणि शिवसेना पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले असून त्यासाठी दानवे यांनी सुपारी घेतल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय. आज अंबादास दानवे यांनी महेंद्र दळवी यांचे तीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले त्यात एक व्यक्ती रोकड मोजताना दिसते आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. मात्र हा व्हिडिओ फेक असल्याचा दावा शिवसेनेने केलाय. बाईट १ - राजा केणी, जिल्हाप्रमुख बाईट २- मानसी दळवी, महिला आघाडी
62
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 09, 2025 12:52:10
Nagpur, Maharashtra:मराठवाड्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीसंदर्भात काँग्रेस पक्ष आणि NAPM च्या तज्ज्ञांचे संयुक्त अभ्यास... * सप्टेंबरच्या पूरानंतर आम्ही ग्रामीण भागात अभ्यास दौरा केला. मेधा पाटकर आणि इतर तज्ञ त्या अभ्यास पथकात होते.. * आम्ही अहवाल तयार केला असून मराठवाड्यातील आमदारांना पाठविले आहे.. * मराठवाड्यात अद्याप पूर्ण पंचनामे झालेले नाही. * पूरग्रस्तांना नुकसानीचे पुरावे मागितले जाते.. * खरडवून गेलेली शेती पुन्हा पूर्ववत होणार नाही.. शासनाने यासाठी दिलेली मदत अत्यंत तोकडी आहे.. * Cm ने 7 ऑक्टोबर रोजी 31 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली.. आम्ही वाढीव दराने नुकसानभरपाई देऊ असे जाहीर केले गेले.. मात्र, या पॅकेजचे वाढीव दर कुठे ही मिळालेले नाही.. * मराठवाड्यात 1300 शाळांचे आतोनात नुकसान झाले आहे.. आम्हाला भीती आहे, या वाताहत झालेल्या शाळांना बंद केले जाऊ शकते... प्रा. प्रवीण पुरंदरे ( पांढरे केस, जॅकेट घातलेले / जल तज्ञ) * कालव्यांवरील अतिक्रमण काढले नव्हते.. * जलयुक्त शिवारच्या नावाखाते हजारो बंधारे बांधले.. मात्र त्यांचे डिजाइन चुकले. * आता अती जास्त पाऊस पडल्यानंतर पाणी लवकर बाहेर निघेल अशी स्थिती आवश्यक असते.. * मात्र, त्याची काळजी न घेता हजारो बंधारे बांधले.. कुठे ही बांधले.. * धरणांची निर्मिती करताना पूर परिस्थितीचा विचार करून नियोजन केलेलं नाही..महाराष्ट्रात फक्त 1.5 टक्के धरणांवर पूर परिस्थिती संदर्भात सोय आहे... * मराठवाड्यात पूर परिस्थिती निर्माण करण्यामध्ये जलयुक्त शिवारचे काम कारणीभूत आहे.. * जलयुक्त शिवार 2014 मध्ये सुरू केला.. आणि जलयुक्त शिवार मध्ये काम सुरू करताना माती संवर्धनाची कामे करण्यात यावे, ही सूचना 2017 मध्ये दिली.. * जलयुक्त शिवार योजना आवश्यक होती.. मात्र ती योजना जेसीबी पोकलेंड वाल्यांनी खिशात घातली..
85
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 09, 2025 12:51:47
114
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 09, 2025 12:49:26
Nagpur, Maharashtra:Nagpur | डि. 09 December 2025 — समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी राज्य सरकारने तत्काळ अबकड आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आज नागपूरात विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व युवा आमदार अमित गोरखे आणि आमदार जितेश अंतापूरकर, आमदार कृपाल तुमाने आणि आमदार विक्रम काळे यांनी केले. आमदारांनी वेगळा पोशाख परिधान करून आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. ५९ जातींच्या वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आरक्षणाची अंमलबजावणी विलंब न लावता तात्काळ करण्यात यावी. शिक्षण, नोकरी आणि सामाजिक न्यायाच्या संधींपासून मोठ्या प्रमाणावर समाजातील घटक वंचित राहत आहेत. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनोंनंतरही ठोस निर्णय न घेतल्याने समाजात नाराजी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अमित गोरखे यांनी स्पष्ट केले की, आरक्षण हे केवळ धोरणात्मक प्रकरण नसून वंचित समाजाच्या अस्तित्वाचा व भविष्याचा प्रश्न आहे. माझा लढा बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाला १००% न्याय मिळवून देण्याकरता आहे. माझ्या जडणघडणीनुसार जर काही बांधव वंचित राहत असतील तर मी त्यांच्या हक्कासाठी मी लढणारच. त्यांनी या लढ्याला आणखी तीव करणाचा निर्धार व्यक्त करत अबकड समाजाच्या हक्कांसाठीचा संघर्ष पुढील काळात अधिक व्यापक होईल, असे संकेत दिले.
115
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 09, 2025 12:33:25
156
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 09, 2025 11:21:07
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर ग्रोबझ गुंतवणूक आर्थिक फसवणुकीच्या बहुचर्चित प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना कोल्हापूर सर्किट बेंच न्यायालयाने चांगलेच झापले आहे. तब्बل 218 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे कागदोपत्री दिसत असतानाही, तपास यंत्रणेकडून केवळ हा घोटाळा 12 कोटींवर सीमित ठेवण्यात आला का? असा थेट सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केला. यामुळे तपासातील त्रुटी आणि पोलिसांची भूमिका गंभीर स्वरूपात चर्चेत आली आहे. ग्रोबझ आर्थिक गुंतवणूक प्रकरणात कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायाधीश शिवकुमार डीगे यांनी कशा प्रकारे तात्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि तपास अधिकारी यांची झाडाझडती कशी केली त्यावर एक नजर टाकूया...
137
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 09, 2025 10:51:15
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहराजवळील कात्यायनी–गिरगाव रस्त्यावर एका तरुणाने मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्का देणारी घटना आज उघडकीस आली. मुलीला एकटी पाहून संबंधित तरुणाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडित मुलीने प्रसंगावधानाने आरडाओराड केल्याने परिसरातील नागरिक सावध झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडले. यावेळी काही महिलांनी आरोपीला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, याच परिसरात आठवडाभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला होता. सलग दोन घटनांमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप असून परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी करवीर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
129
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 09, 2025 10:32:08
Pune, Maharashtra:अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले होते ते आता पुन्हा सुरू झाले आहे, परंतु कामगती अत्यंत संथ आहे. त्यामुळे प्रवाशांना शारीरिक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगर-मनमाड महामार्गावर शिर्डी आणि शनिशिंगणापूर हे जागतिक दर्जाचे दोन तीर्थक्षेत्र आहेत; लाखो भाविक याचा खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करतात. अनेक ठिकाणी एका बाजूने रस्त्याचे काम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने दोन्ही दिशांनी वाहतूक सुरू असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. तसेच एकेरी बाजूने सुरू असलेला रस्ता देखील खड्डेमय झाला आहे. पावसाळ्यात चिखल, तर इतर काळात उडणारी धुळ ही रस्त्याच्या कडेलाशी राहणार्या गावस्थानिक नागरिकांसाठी त्रासाचे कारण बनली आहे.
65
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 09, 2025 10:20:50
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धरणे आंदोलन अंकर सांगली शहरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थे विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आला आहे.शहरातल्या टिंबर एरिया येथील रस्ता मंजूर होऊन सहा महिने उलटले आहेत. मात्र अद्याप देखील संबंधित ठेकेदाराकडून रस्ता करण्यात आला नाही, निधी आणि कामाची मंजुरी असून देखील रस्ता करण्यात टाळाटाळ होत असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने कॉलेज कॉर्नर येथे धरणे आंदोलन करण्यात आलं,आंदोलन मध्ये काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील सहभाग घेतला,दरम्यान आंदोलन सुरू झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी काही वेळातच रस्त्याच्या कामाला सुरुवात करत असल्याचा भासवलं,यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांनी आणि येथील नागरिकांनी कामाला विरोध करत लेखी आश्वासन दिल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरुवात करू देणार नाही,अशी भूमिका घेतली आहे。
82
comment0
Report
Advertisement
Back to top