Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

पलूस नगरपालिका मतदान विवाद: कांग्रेस और NCP के कार्यकर्ताओं में भिड़ंत, पुलिस ने हस्तक्षेप किया

SMSarfaraj Musa
Dec 02, 2025 12:16:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - पलूस मध्ये बोगस मतदानावरून काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादावादी. पुण्यातून आलेल्या एका मतदारावर अजित पवारांचे राष्ट्रवादीने जोरदार आक्षेप घेतला. परंतु त्या मतदाराच्या बाजूने काँग्रेसने भूमिका घेतल्याने दोन्ही गट आमने-सामने आले. पुण्यातील एक मतदार पलूस नगर परिषदेसाठी मतदान करण्यासाठी आला होता.यावेळी त्याचे आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा जुळला नाही,त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला.तसेच सकाळपासून पलूस येथील प्रभाग क्रमांक सात मध्ये सात ते आठ बोगस मतदार आढळण्याचे देखील त्यांनी आरोप केला. यावेळी काँग्रेस आणि अजित पवारांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु यावेळी पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावरून पिटाळून लावले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Dec 02, 2025 12:16:02
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - सांगलीच्या तासगाव नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदानाचा आरोप करत आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या दोन गटात जोरदार वादावादीचा प्रकार घडला.तासगाव येथील एका बुथवर बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप रोहित पाटील यांच्या गटाच्या बूथ प्रतिनिधींनी घेतला.तसेच विरोधकांनी हातातील मतदार याद्याही हिसकावल्याचा त्यांनी आरोप केला.यानंतर तातडीने आमदार रोहित पाटील ही संबंधित मतदान केंद्रावर दाखल झाले.त्यानंतर रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला.यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्तेही एकमेकांच्या अंगावर धावले,पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गट वेगवेगळे केले असून या ठिकाणी सध्या तणावपूर्ण वातावरण आहे,कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
33
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 02, 2025 11:07:34
108
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 02, 2025 10:37:35
Shirdi, Maharashtra:निवडणुकीची गोंधळाची अवस्था झालेली आहे.... निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या म्हणजे दोष आहे..... अगोदरच Evm वर शंका आता आणखी काळजी घ्यावी लागे.... २० दिवस हे सगळं सांभाळायचं राखण बसायचं का लोकांनी?..... या सगळ्या निर्णयामुळे लोकांचा निवडणूक आयोगावर विश्वास राहिलेला नाही.... अशा प्रकारच्या निर्णयामुळे, जनतेचे, उमेदवारांचे हाल होत आहे.... शासकीय हस्तक्षेपातून निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर केले जातात ते असे असतात... नको वाटणाऱ्या गोष्टी निवडणुकीत घडताय.... निवडणूक आयोगाला सगळे अधिकार असतात न्यायालयाचे तोंडून ऐकून घेतलं तर स्वतःवरच अपवाद जातो.... सत्ताधाऱ्यांचा आणि निवडणूक आयोगाचा स्वतःची कातडी बचाव कार्यक्रम चालू...* निवडणूक आयोगाला जनतेची मानसिकता समजली पाहिजे ते समजून घेत नाही.... अधिकारी जेवण करून झोपतील येथे उमेदवारांना जनतेला झोप नाही.... लोकशाहीची प्रक्रिया निकोप असली पाहिजे मात्र दुर्दैवने तसं नाही.... निवडणूक आयोगाचे वागणं निरपेक्ष आणि स्वायत्त पाहिजे तसे दिसत नाही.... तीन तारखेलाच मतमोजणी झाली पाहिजे होती... निवडणूक कार्यक्रमाची आखणीच सदोष होती... *मंत्रालयातील एखाद्या पीएने निवडणूक कार्यक्रम काढावा आणि जनतेला द्यावा असा कार्यक्रम....* *आम्ही ईव्हीएमची काळजी घेऊ विजय आमचाच...* *राहात्याला ईव्हीएम कशाकरता बदलले असे म्हणत विखे पाटलांवर निशाणा....* अन्यायाविरुद्ध सामान्य माणूस पेटून उठतोय हे सकारात्मक...
110
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 02, 2025 10:36:30
Kalyan, Maharashtra:केडीएमसी रुग्णालयातील आयसीयुबंद मनसेचे ऑक्सिजन मास्क लावून आंदोलन.. ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क घेऊन केडीएमसी मुख्यालयात मांडला ठिय्या.. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालया मधील आय.सी.यू गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बंद आहे. आयसीयु बंद असल्याने रुग्णांना ठाणे, मुंबई येथे घेऊन जावे लागत असल्याने, येथील रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी केडीएमसी प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांनी ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन मास्क आणून केडीएमसी मुख्यालयात ठिय्या मांडला. लवकर आयसीयू सुरु न केल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. कल्याण पश्चिम विभागात असलेल्या सरकारी बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात गरजू नागरिक उपचारासाठी येतात परंतु अपूर्ण सुविधांमुळे नागरिकांना मुंबई व इतर ठिकाणी उपचार घेण्यासाठी पाठवले जाते. गेल्या दोन वर्षांपासून रुक्मिणीबाई रुग्णालयातील सुसज्ज आयसीयू असून देखील सुरु करण्यात आले नाही. ते लवकरात लवकर चालू करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. परंतु आरोग्य विभाग अधिकारी यांना कल्याण मधील नागरिकांचे काही पडले नाही. दोन महिन्यांपूर्वी डोंबिवली मधील आयसीयू नसल्यामुळे सर्पदंश मुळे दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यातून महापालिकाेने काहीही बोध घेतला नाही. काल देखील आयसीयु उपलब्ध नसल्यामुळे एक महिलेला दोन तासानंतर दुसऱ्या रुग्णालया मध्ये जाण्यास सांगितले. वाहतूक कोंडीमुळे वेळेत मुंबई येथील रुग्णालया मध्ये न पोहचल्यास एखाद्याचा जीव जाऊ शकतो. याकरिता लवकरात लवकर बाई रुक्मिणीबाई रुग्णालयामधील सुसज्ज आयसीयु चालू करावा या मागणीसाठी मनसेच्या वतीने ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क लावून ठिय्या आंदोलन करण्यात आले. लवकरात लवकर आयसीयू सुरु न केल्यास मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. Byte.. कपिल पवार विभाग अध्यक्ष मनसे
75
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 02, 2025 10:35:54
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - थेट ऑस्ट्रेलिया मधून येऊन शिरळा येथे बजावला मतदानाचा हक्क... अँकर - मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चक्क सात समुद्र पार करत एक तरुण सांगलीच्या शिरळामध्ये दाखल झाला. मतदान हे श्रेष्ठ दान असल्याचं सांगत मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्यासाठी थेट ऑस्ट्रेलिया मधून हजारो किलोमीटरचा प्रवास करत दाखल होऊन शिरळा नगरपंचायतीसाठी मतदान केलं आहे. अन्सार कासिम मुल्ला असे या तरुणाचं नाव असून तो ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न मध्ये नोकरीला असून दोन डिसेंबर रोजी शिरळा नगरपंचायतीसाठी मतदान होणार असल्याचं कळतच अन्सार याने थेट विमानाने प्रवास करत शिरळामध्ये दाखल झाला. मतदानासाठी आपला मित्र आल्याचे कळताच त्याच्या मित्रांनी फटाक्यांचं आतिशबाजी करत स्वागत केले, त्यानंतर अन्सारने मतदानाचा पवित्र हक्क बजावला, यानिमित्ताने शिरळा तहसीलदार शामला खोत यांनी त्यांचा सत्कार यावेळी केला. मतदानाला येण्यासाठी मेलबॉर्न ऑस्ट्रेलियाातून शिरळा येण्यासाठी दीड लाख रुपये ट्रॅव्हलिंग खर्च आला, असल्याचे यावेळी सांगितलेतो आज संध्याकाळी मेलबॉर्न ऑस्ट्रेलिया जाण्यासाठी रवाना होणार आहे.
137
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 02, 2025 10:35:33
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- ईव्हीएम यंत्रात बिघाड आणि संथ मतदान गती यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषदेच्या तीन वेगवेगळ्या बुथवर मतदानादरम्यान गोंधळाची स्थिती अँकर:--ईव्हीएम यंत्रात बिघाड आणि संथ मतदान गती यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषदेच्या जिल्हा परिषद शाळा, आदर्श हिंदी शाळा आदी तीन वेगवेगळ्या बुथवर मतदानादरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मतदान थांबल्याने मतदारांच्या रांगा लागल्या. कित्येक मतदार मतदानाच्या संथ गतीने कंटाळून परत गेल्याचे चित्र बघायला मिळाले. असे असले तरी बिघाड दुरुस्त झाल्यावर मात्र महिला वर्गाचा मतदानाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. एक नकाराध्यक्ष पद आणि वीस नगरसेवक पदांकरिता गडचंदुर शहरातील 25000 मतदार सकाळपासून मतदान केंद्रांवर उत्साहाने दाखल झाले आहेत दुपारनंतर मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.
183
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 02, 2025 10:19:36
118
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 02, 2025 10:02:22
Dhule, Maharashtra:निवडणूक आयोग शॉक पे शॉक देत आहे, त्यामुळे लोकांमध्ये नैराश्य निर्माण झाल्याच सांगत, निवडणूक आयोगाच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिका बद्दल, राज्याचे पणन वरात शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक प्रक्रियांमध्ये प्रचार आणि आता मतदान प्रक्रिया सुरू असताना पुन्हा आता निकालाबद्दल नवीन निर्णय आल्याने लोकांमध्ये नैराश्य आहे. लोकशाही बद्दल लोकांमध्ये उत्साह कमी झाल्याचे बघायाला मिळत आहे., अस वक्तव्य रावल यांनी केले आहे. पहिले ५० टक्के आरक्षणची चिंता होती,नंतर नगरपरिषद निवडणुकाची चिंता होती आणि आता निकाल पुढे ढकलून तिसरा शॉक दिला आहे, निवडणूक आयोग शॉक पे शॉक देत आहे. निवडणूक पारदर्शक होणे गरजेचे आहे, असं अपेक्षा रावल यांनी व्यक्त केली आहे.
101
comment0
Report
Advertisement
Back to top