Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली के मोबाईल शॉप में सिनेमाई चोरी, दीवार तोड़कर 11 लाख की मोबाइल लूट

SMSarfaraj Musa
Nov 14, 2025 01:16:44
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
शहरातल्या एका मोबाईल शॉपीमध्ये सिनेम स्टाईल चोरी करण्यात आली आहे. मोबाईल शॉपीच्या भिंतीला भगदाड पाडून दुकानातील लाखो रुपये किमतीचे नवीन मोबाईल लंपास करण्यात आले आहेत. शहरातल्या जुना स्टेशन रोडवरील असणारया मोबाईल शॉपी मध्ये ही धाडसी चोरी करण्यात आली आहे. दुकानाच्या मागील बाजूने भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी 11 लाखांच्या मोबाईलवर डल्ला मारला आहे, तसेच यावेळी चोरी केल्यानंतर याठिकाणी असणारा सीसीटीव्ही डिव्हीआर देखील लंपास केला आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आधीक तपास शहर पोलीस करत आहेत.
305
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 14, 2025 03:01:57
Dhule, Maharashtra:धुले शहरासह जिल्ह्याचा तापमानाचा पारा दिवसागणिक कमी होत आहे. जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद होत आहे. विशेष म्हणजे आता तापमानाचा पारा हा आठ अंश सेल्सिअस कडून पाच अंश सेल्सिअस कडे वाटचाल करीत आहे. वाढत्या थंडीचा कडाका हा शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मात्र त्रासदायक ठरत आहे. शाळांचे वेळ बदलावी अशी मागणी पालकांनी केलेली आहे. मात्र शिक्षण विभागाने त्याची दखल घेतलेली नाही. कडाक्याच्या थंडीचा जनजीवनावर प्रचंड परिणाम दिसून येत आहेत. रस्ते निर्मनुष्य होत आहेत. तर अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या देखील कमी झालेली आहे. शाळकरी विद्यार्थी आणि व्यायाम करणारी मंडळी आणि बाजार समितीमध्ये येणारे शेतकरीच सध्या रस्त्यांवर दिसून येत आहे. जिल्ह्यातील थंडीचा प्रवास हा शीतलहरीकडे होत है. उत्तर भारतामध्ये गार वाऱ्यांचा परिणाम हा धुळे जिल्ह्यातही दिसून येत आहे.
50
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 14, 2025 02:50:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील वाढते वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि हरित वातावरण निर्मितीसाठी महापालिकेने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत महापालिकेला मिळालेल्या ६२ कोटी रुपयांच्या निधीपैकी दुसऱ्या टप्यात ३० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीचा वापर शहरात १२ पर्किट गार्डन उभारण्याचे तसेच प्रमुख ६ प्रवेशद्वारांचे सौंदर्याकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या निधीचा वापर 'हरित आणि स्वच्छ शहर' या संकल्पनेनुसार करण्याचे निर्देश दिले आहेत. घनकचरा विभाग आणि उद्यान विभाग यांच्या संयुक्त नियोजनाने या कामांना गती देण्यात येणार आहे. चार वर्षांपूर्वी केंद्र शासनाने छत्रपती संभाजीनगरला राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमात समाविष्ट केले होते.
130
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 14, 2025 02:50:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या महापालिकेची अतिक्रमण कारवाई पुन्हा सुरू होत आहे.. पैठण गेट परिसरात मनपाच्या नगररचना आणि अतिक्रमण पथकांनी टोटल स्टेशन सव्र्व्हे पूर्ण झाला आहे. पैठण गेट सर्कलच्या बाजूने १५ मीटर, पैठण गेटपासून नूतन कॉलनीकडे जाणारा मुख्य रस्ता ३० मीटर, तर सब्जीमंडी परिसरातील गेल्या आठवड्यात खून झालेल्या अंतर्गत रस्त्यावर ९ मीटर रस्त्यांचे मोजमाप पूर्ण झाले. सुपर इम्पोज करून आज या मालमत्तांवर मार्किंग होणार आहे. १५ नोव्हेंबरपासून कारवाईला सुरुवात होणार आहे. शहरातील रस्ते रुंदीकरण आणि वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी मनपाने अतिक्रमण मोहीम राबवली. यामध्ये ५००० मालमत्ता जमीनदोस्त केल्या. त्यानंतर मनपाने ९ मोठे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम आखली आहे. या ठिकाणी टोटल स्टेशन सर्व्हे पूर्ण झाला असून मार्किंग करून अतिक्रमणाची कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे १२५ मालमत्ता बाधित होत आहेत
154
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 14, 2025 02:49:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पॅलेस्टाइन व गाझामधील नागरिकांना मदतीसाठी ९० लाख ९९ हजार रुपये जमवणाऱ्या महाभागाने त्यातील फक्त १० लाख रुपये पुढे पाठवले, तर उर्वरित रक्कम लाटली असल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये हा प्रकार पुढं आला आहे... केवळ ९० दिवसांच्या कालावधीतच हा प्रकार केला आहे. आरोपीच्याच खात्यातून 'गो फंड मी डॉट कॉम' या पोर्टलवर 14 व्यवहार द्वारे 10 लाख 24 हजार परदेशात पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र आता उर्वरित रकमेचा कुठलाही हिशेब त्याच्याकडे नाही. त्यामुळे ही रक्कम हवाल्याच्या माध्यमातून पाठवण्यात आली की, टेरर फंडिंगसाठी वापरण्यात आली याचा तपास सुरू आहे. सय्यद बाबर अली सय्यद महेमूद अली ऊर्फ सय्यद बाबर अली रजवी कादरी असे आरोपीचे नाव असून एटीएस पथकातील कर्मचाऱ्याच्या फिर्यादीनुसार त्याच्यावर सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.. आरोपी करत असलेल्या व्यवहारावर दहशतवाद विरोधी पथकाचे गेल्या काही दिवसांपासून नजर होती , एटीएस ना त्याला पैसेही पाठवले आणि त्याच्यानंतर ट्रॅक करून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.. कुठल्या दहशतवादी संघटनेला तर हा पैसा गेला नाही ना या दृष्टीने हा तपास वेगाने सुरू आहे..
136
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 14, 2025 02:46:33
87
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 14, 2025 02:34:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उस्मानपुरा भागात गुरुवारी गुरुवारी रेखा राजू जाधव या 50 वर्षीय महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर नागरिकांनी मृतदेह पोलीस थेट ठाण्यात आणत रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत ठिय्या मांडला. यामुळे उस्मानपुरा पोलिस ठाण्यासमोर तणाव निर्माण झाला. या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा विजय राजू जाधव याच्या फिर्यादीवरून आठ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांची २१ वर्षांची विवाहित मुलगी ८ नोव्हेंबर रोजी घरातून निघून गेल्यापासून घरात तणावाचे वातावरण होते. बेपत्ता तरुणीच्या पतीने उस्मानपुरा ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, मुलगी बुलढाण्यात असल्याची माहिती ९ नोव्हेंबर रोजी पोलिसांना मिळाली. गल्लीतील एका व्यक्तीने तिला पळून नेल्याचे समोर आले, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. परंतु रात्री उशीर झाल्याने पोलिसांनी दुसऱ्या दिवशी जाण्याचे सांगितले. याच वेळी मुलीने जागा बदलावल्याने ती सापडू शकली नाही. या सर्व घटनांमुळे रेखा या तणावात असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. आणि त्यामुळं महिलेने आत्महत्या केली
119
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 14, 2025 02:32:22
Akola, Maharashtra:अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील भगतवाडी परिसरात नाल्यांचा अडथळा निर्माण झाल्याने घाण पाणी रस्त्यावर साचू लागले आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांना त्वचारोग आणि संसर्गाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. महिला, वृद्ध, लहानमुलं सर्वांनाच या अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मशिदीत जाणाऱ्या भाविकांनाही या पाण्यामुळे प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. मनपा फक्त कर वसुलीपुरती सक्रिय असून मूलभूत सुविधांकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तातडीने स्वच्छता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
107
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 14, 2025 02:31:41
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. मुलाखतीसाठी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेस आणि उबाटा गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. सातारा शहरातील नगरपालिकेतील इच्छुक उमेदवारांची मुलाखत शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात घेण्यात आली. महाविकास आघाडीकडून भाजप पक्ष सोडला तर सर्व पक्षांसोबत युतीबाबत चर्चा होणार असे ते म्हणाले. मुलाखतीसाठी सातारा शहरासह जिल्ह्यातून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 15 तारखेला महत्त्वाची बैठक झाल्यानंतर 16 तारखेला महाविकास आघाडीतर्फे निवडणुकीसाठी सज्ज असणार असल्याचे सांगण्यात आले. सातारा शहरामध्ये तीन पक्षांनी आणि सामाजिक संघटना यांनी विविध समस्यांबाबत आंदोलन केले असल्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेच्या मतदानात सातारा शहरात चांगले मतदान झाले असून ओबीसी व मागासवर्ग यांनी आत्मविश्वासाने उमेदवारी मागितली आहे. या तरुणांना राजकीय क्षेत्रात काम करण्याची धाडस देण्यासाठी आम्ही संधी देऊ. नऊ नगरपालिका व एक नगरपंचायतीसाठी आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. काही ठिकाणी भाजप सोडून महाविकास आघाडी करण्याची तयारी आहे. महायुती बद्दल नाही तर महाविकास आघाडीबाबत मागील दोन दिवसांपासून ठिय्या मांडल्याचे सांगितले. सातारा शहर परिसरातून सुशिक्षित नागरिक व महिलांनी मुलाखती दिल्या असल्याचे सांगितले. सामाजिक चळवळीतील तरुण-तरुणी मुलाखती दिल्या असून पुढील घडामोडी पाहून ते आमच्याकडे येतील; नगराध्यक्षपदापासून नगरसेवक पदासाठीही शक्यता असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागातील 36 कोटींची बोगस बिलं असल्याच्या मुद्द्यावर अधिवेशनात आवाज उठवला गेला; खाते कबूल करणार असेल तर आवाज उठवला जाईल, अन्यथा पुढील अधिवेशनात यावर चर्चा केली जाईल.
118
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 14, 2025 02:30:55
Nashik, Maharashtra:- नाशिकच्या सिन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट - ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे सख्खे काका भाजपच्या गळाला - ठाकरेंच्या शिवसेनेचे सिन्नर नगरपरिषदेचे थेट नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार असलेले हेमंत वाजे करणार उद्या भाजपामध्ये प्रवेश - हेमंत वाजे यांचा भाजप प्रवेशाने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का - हेमंत वाजे यांनी यापूर्वी सिन्नर नगराध्यक्ष गटनेता अशी पदे भूषवली आहे - हेमंत वाजे यांना गळाला लावत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी खेळली मोठी खेळी - एकाच वेळी ठाकरेंची शिवसेना आणि मित्रपक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी यांना दणका - अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे थेट नगराध्यक्ष पदासाठी हेमंत वाजे यांच्या इतका तुल्यबळ उमेदवार नसल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि पर्यायाने माणिकराव कोकाटे यांची होणार कोंडी
179
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 14, 2025 02:30:44
Jalna, Maharashtra:जालना :चंदनझिरा भागातील रस्त्यावरून नवा वाद! 50 फुटी रस्त्याच्या मोजमापात 'तोंड पाहून मापा' घेतल्याचा नागरिकांचा आरोप सेंटर लाईन बदलल्यामुळे गोरगरिबांच्या घरांवर हातोडा पडण्याची भीती; मनपा कारभारावर प्रश्नचिन्ह जालना शहरातील चंदनझिरा परिसरात महानगरपालिकेने 50 फुटी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असून, गेल्या दोन दिवसांपासून मनपा कर्मचाऱ्यांकडून रस्त्यासाठी मोजमाप करण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे मोजमाप करताना 'तोंड पाहून रस्त्याचे माप' घेतले जात असल्याचा आणि 'दुजाभाव' केला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रस्त्यासाठी सेंटरलाईन वारंवार बदलल्या जात असल्याचा नागरीकांचा आरोप आहे. या विकासकामांमुळे ज्यांच्या घरांवर हातोडा पडणार आहे, अशा नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सेंटरलाईन अचूक घेण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरीकांनी केली आहे。
143
comment0
Report
Advertisement
Back to top