Back
शिरूर-आंबेगांव क्षेत्र में बिबटों ने शादी की खुशियों पर डाला भारी संकट
HCHEMANT CHAPUDE
Nov 12, 2025 10:31:32
Shirur, Maharashtra
उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जगणं बिबट्याने केलं अवघड... आधीच जीव वाचवण्याची भीती आता त्यात लग्न जुळेना.. नोकरी निमित्ताने शहरी भागात असलेल्या नागरिकांनी बिबट्यामुळे गावाकडे फिरवली पाठ... चिमुकले हि मामाचे गाव विसरले..... पोरं करती-धरती झालीयेत, आता कधी एकदा त्यांच्या डोईवर अक्षदा पडताहेत. या आतुरतेनं एकीकडं आई-वडिलांचा - जीव व्याकुळलाय तर दुसरीकडे ही पोरंही लग्नाची स्वप्न रंगवतायेत खरः पण दुर्दैवानं लाल रक्ताला चटावलेले बिबटे तरुणांच्या या गुलाबी स्वप्नांचाही फडशा पाडताहेत तर शहरी भागात नोकरी व्यवसायानिमित्त असलेले नागरिकही आपल्या चिमुकल्यांना मुलांना गावाकडे आजी-आजोबांकडे मामाच्या गावाला पाठवायला ही नकार देऊ लागलेत त्यामुळे या भागातील नागरिकांचे बिबट्यामुळे जगणं अवघड होऊन बनलंय... पोरं करती-धरती झालीयेत... बिबट्यांच्या दहशतीचा परिणाम सामाजिक जीवनावरही झाला आहे. गावांतील शेकडो तरुण 'वेल सेटल' असूनही त्यांना केवळ बिबट्यांच्या दहशतीमुळे मुली देण्यास नकार दिला जात आहे. सोयरा मिळेना म्हणून या तरुणांचे आई-वडील चिंताग्रस्त आहेत. तर गुलाबी स्वप्नांचा चक्काचूर होत असल्याने तरुणांना निराशेने ग्रासले आहे. आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेडचे गावकरी चिंतेत मामाचे गावही नको रे बाबा! शाळेला उन्हाळा किंवा दिवाळीची सुट्टी लागली की बच्चे कंपनी मामाच्या गावाची वाट धरतात. कधी एकदा मामाचा गाव गाठतोय, असं त्यांना होतं. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे या गावांची भाचे मंडळी मामाचा गाव नको म्हणू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ही वास्तवता समोर आली. आजि बाई वन मंत्री गणेश नाईकांनी हि मान्य केलं असून बिबट्याच्या दहशतीपासून या परिसराची सुटका व्हावी यासाठी वन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी Zee 24 तास शी बोलताना सांगितलंय... गणेश नाईक (वनमंत्री). End Vo... बिबट्याच्या या सर्व भयावह परिस्थितीने लग्नाची स्वप्न रंगवणारे तरूणांच्या स्वप्नांची भविष्याची राख रांगोळी केलीय तर अनेकांचे जीव ही घेतलेत त्यामुळे बिबट्याच्या या दहशतीतून नागरिकांची सुटका कधी होतेय हे येत्या काळात पहाणं महत्त्वाच असणार आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowNov 12, 2025 12:04:120
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 12, 2025 12:03:370
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 12, 2025 11:55:5395
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 12, 2025 11:50:5941
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 12, 2025 11:49:4890
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 12, 2025 11:37:450
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 12, 2025 11:36:140
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 12, 2025 11:32:040
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 12, 2025 11:06:100
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 12, 2025 10:47:560
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 12, 2025 10:41:110
Report
KJKunal Jamdade
FollowNov 12, 2025 10:33:060
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 12, 2025 10:32:090
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 12, 2025 10:28:470
Report