Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

यवला शहर पुलिस ने लक्जरी बस से चार किलो गांजे के साथ दो तस्कर गिरफ्तार

SKSudarshan Khillare
Nov 14, 2025 07:18:11
Yeola, Maharashtra
नाशिक ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या येवला शहर पोलिसांनी मिळाल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवसृष्टी येवला समोर सापळा रचून लक्झरी बसच्या माध्यमातून गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना चार किलो गांजा सह ताब्यात घेतले आहे या कारवाईमुळे शहरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गांजाची तस्करी, गांजा विक्री तसेच अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली आहे.
136
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Nov 14, 2025 08:32:11
Nagpur, Maharashtra:बिहार निकाल -- सर्व गोलमाल है. 90% और 95% जनता यांच्या पाठीशी आहे का?? पराभव झाल्यानंतर हे म्हणतील की आम्हाला कारणे लागतात. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ होता. एस आय आर लागू केले, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि स्वच्छ नव्हतीच आणि एवढीच लोकप्रियता होती तर दहा दहा हजार महिलांच्या खात्यात का पाठवले. सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकांमध्ये वाटून जर निवडणुकांचा निकाल असा फिरवला जात असेल, तर 90% निकाल येणारच. हे जे काही देशात चाललेला आहे, हे पारदर्शी नाही, हे लोकशाहीला धोका पोहोचवणारी बाब आहे, देश संविधाना वर चालणार की नाही यावर प्रश्नचिन्ह लावणारे हे निकाल आहे... राहुल गांधी आणि तेजस्वी यादव च्या सभेमध्ये लाख लाख लोक येत होते. जनसागर लोटत होता. मग असे निकाल कसे लागू शकतात? मोदी शहाच्या सभांसाठी लोकांना आणावे लागत होते. त्यांच्या सभामध्ये रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या. तरी असे निकाल येणार असतील तर देशाचा भविष्य येणाऱ्या काळात लोकशाहीवर टिकणार आहे की नाही अशी चिंता निर्माण होत आहे. निकाल आम्ही निकाल स्वीकारतो... अंबादास दानवे (काँग्रेस आघाडीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री चेहरा.) दानवेंना माहित नाही का बिहार मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांना उमेदवार म्हणून जाहीर केलं होतं. दानवे यांनी पहिले माहिती घ्यावी, अन्यथा काहीही बोलायचे असेल तर बोला... महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकाल बद्दल बोलायचे असेल, तर सर्वच जबाबदार आहे, घोळ कोणी घातला असेल, तर सर्वांनीच घातला. जागा वाटपात समस्या निर्माण झाली होती. आता पुढे जाण्याची गरज आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित होण्याची गरज आहे... बिहार काँग्रेस जागा - बिहारमध्ये आम्ही कुठे जास्त जागा घेतल्या.. RJD ने 150 जागा लढवल्या आम्ही 56 जागा लढवल्या.. दानवे यांच्या सल्ल्याची गरज वाटली तर आम्ही नक्कीच घेऊ... अंबादास दानवे ( आता तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीने योग्य वेळी जागा वाटप करावा) ते स्वतःवरही खापर फोडले आहे, वेळेवर जागा वाटप करणे तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे. आचारसंहितेची वाट न पाहता जागा वाटप निश्चित केलं पाहिजे. तेव्हा (विधानसभा निवडणुकीच्या वेळेला) अनेक लोक बैठकांमधून उठून गेले होते. आम्हाला त्यांचे नाव जाहीर करायचे नाही.. आता स्वतंत्र लढत आहे, अनेक ठिकाणी निकाल येतील.. अंबादास दानवे यांनी जुनं काढण्यापेक्षा नव्याने सुरुवात करावी. जर जुना काढायचं असेल तर तिन्ही पक्षाचे नेते त्यासाठी जबाबदार आहे.. निवडणुकीतून काँग्रेस काय धडा घेणार - काय धडा घेणार आम्ही?? प्रचंड पैशाचा वापर केला जात आहे. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा आणि पुन्हा पैशातून सत्ता, असं समीकरण निर्माण केला गेला आहे... निवडणूक जिंकण्यासाठी ते वाटेल ते करतात आणि निवडणुकांजिंकतात...
92
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 14, 2025 08:30:40
141
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 14, 2025 07:48:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पत्रकार परिषद काँग्रेसने मोठ्या चुका केल्या काँग्रेसने आपल्या पराभवातून शिकायला हवे, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची उमेदवार ठरवले असते तर परिस्थिती वेगळी असती ती चुकी बिहारमध्ये केली भाजप ने सत्तेचा गैरवापर केलाय, तेजस्वी यादव मुख्यमंत्री पद चेहरा घोषित करायला वेळ लावला त्यामुळं खूप उशीर झाला. काँग्रेस आणि आर जे डी ने चुका केल्या मतदार यादी घोळ कायम आहेच... काँग्रेस जागावाटप मध्ये मोठा वाटा मागते, विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, माझं मत स्पष्ट आहे...यामुळं नुकसान होते... बिहार चे गणित महाराष्ट्राचे गणित वेगळे आहे राज्यात महाविकास आघाडी व्हावी आमची इच्छा आहे मात्र जागावाटप अखेरच्या दिवशी पर्यंत होत असेल तर गंभीर आहे, याचे परिणाम निकालावर होतो... महाराष्ट्र निवडणूक वेळी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री चेहरा घोषित केले असते जागावाटप आधी केले असते तर राज्यात चित्र वेगळे असते, जी चूक महाराष्ट्र मध्ये झाली तीच बिहार मध्ये झाली, काँग्रेस ने आता ही वृत्ती बदलावी...
143
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 14, 2025 07:33:51
84
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 14, 2025 07:00:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... पालकमंत्री संजय शिरसाट प्रतिक्रिया *ऑन बिहार निकाल* बिहार चा विजय निश्चित होता, विकासाची ही पावती आहे.. तिथला गुन्हेगारी कमी केली. बिहारी कामाला इतरत्र जायचे ते आता तिथं थंबतात, मतदान यादीत अडचणी होतात तिथं ही झालं असेल मात्र तो मुद्दा वेगळा होता, हे मूळ मतदार आहेत. भाजप नितीश कुमार सत्तेचे योग्य विभाजन करतील रामविलास पासवान यांच्या मुलाला ही सत्ता मिळेल, पराभव झाला की ईव्हीएम बाबत टिमकी मिरवणार... *ऑन दानवे मतदार यादी घोळ आरोप* मतदार नोंदणी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, माहिती नसेल तर जिल्ह्याधिकारी ला विचारावे, माझं नाव घेतले की बातमी होते. *ऑन विरोधक आरोप* निवडणूक आयोगाने योग्य पद्धतीने निवडणूक घेतल्या त्याबद्दल अभिनंदन केले असेल *ऑन टोल शिफ्टिंग* तो स्थानिक स्तरावरला त्या भागातील मुद्दा आहे त्याठिकाणावरील नेते निर्णय घेतील *ऑन नाईक स्वबळ* युती सन्मान पूर्वक झाली तर युती करावी, असे कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे.. फडणवीस पण तेच म्हणाले होते त्यामुळं युती चे युती चे वेळी ठरेल... *ऑन इंदुरीकर* मुलीचा विवाह कसा करावा हे पालकांच्या मतावर असते, बाप म्हणून त्याच्या निर्णयाला कुणी विरोध करू नये असे माझे मत आहे... इंदुरीकर महाराजांनी कीर्तन सोडू नये...
110
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 14, 2025 04:46:51
Washim, Maharashtra:व washim जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेची अंतिम मुदत तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात वंचित बहुजन आघाडीने मालेगाव नगर पंचायतसह कारंजा आणि रिसोड नगर परिषद या तीन ठिकाणच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काल उशिरा जाहिर केले. मालेगाव नगरपंचायतीसाठी रहेमान अहमद शाह, रिसोड नगरपरिषदेसाठी शेख सलीम शेख फरीद, तर कारंजा नगर परिषदेसाठी फिरदोस अनम सैय्यद नसिरोद्दिन या उमेदवारांची घोषणा वंचितचे जिल्हाध्यक्ष दत्तराव गोटे यांनी या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. दुसरीकडे मात्र प्रमुख पक्षांकडून अद्याप नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे गूढ अधिकच वाढत चालले असून, इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे मागील दोन दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसच्या वतीने बैठका घेऊन निवडणुकीतील रणनीतीसंदर्भात चर्चा करण्यात येत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील गटबाजी आणि स्थानिक समीकरणांमुळे स्थिती किचकट झाली आहे.
167
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 14, 2025 04:31:40
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पुन्हा एकदा दणका बसलाय. विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर शिरोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या माजी आमदार उल्हास पाटील यांनी शिंदे गटाची कास पकडली आहे. येत्या काही दिवसात उल्हास पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काही दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूरमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत पत्रकार बैठक घेऊन महाविकास आघाडी सोबत नगरपरिषद निवडणूक लढवणार असं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता उल्हास पाटील यांनी आपली भूमिका बदलून शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश करण्यासंदर्भात भूमिका मांडली आहे.
159
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 14, 2025 04:30:44
Akola, Maharashtra:राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. घराघरातील शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यापासून ते मतदानाच्या दिवशीच्या नियोजनापर्यंत सर्व बाबींसाठी पक्षातील एकनिष्ठ आणि अनुभवी पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केल्यानंतर मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही आपली 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असून, त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराची दिशा आणि वेग अधिक वाढणार असल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, अकोल्याचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनाही स्टार प्रचारक म्हणून या यादीत स्थान देण्यात आले आहे. मागील निवडणुकीत रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात भाजपने उत्तम कामगिरी केली होती. हीच कामगिरी आणि त्यांच्या संघटनशैलीचा विचार करून यंदाही पक्षाने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी निवडणुकांमध्ये या स्टार प्रचारकांच्या माध्यमातून पक्ष आपला प्रचार अधिक प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवणार असून सर्वच पक्षांनी मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरायची तयारी केली आहे.
171
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 14, 2025 04:23:36
171
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 14, 2025 04:17:06
Beed, Maharashtra:बीड बस स्थानकात चोरी करताना चोर महिला पकडली.. नागरिकांनी दिला चोप. - अनेक वेळा चोरीच्या घटन घडूनही सुरक्षा उपायोजनाकडे दुर्लक्ष. - बीड बस स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर. ANC- बीड बस स्थानकावर चोरी करताना एका महिला चोरट्याला पकडून नागरिकांनी चांगला चोप दिला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा बस स्थानकात चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे हात साफ करताना दिसत आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने बस स्थानकातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सुरक्षेचे कर्मचारी, सीसीटीव्ही यंत्रणा फक्त नावालाच आहे का? असा सवाल देखील प्रवासी विचारत आहेत. अनेक प्रवाशांच्या गळ्यातील सोने चोरीला जाणे, खिशातील पैसे, मोबाईल मौल्यवान दाग दागिने अशा चोरीचे शेकडो प्रकार उघडकीस आले. मात्र काहीच कारवाई होत नसल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
122
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 14, 2025 04:16:15
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग – सोलापुरात बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, दोन वर्षांत लागला निकाल. सोलापुरात बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, दोन वर्षांनी लागला निकाल. सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धनाजी सोपान इंगळे असं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव. शाळेत गेलेल्या पीडितेवर 14 एप्रिल 2023 रोजी शिक्षक आरोपी इंगळे यांने केला होता अत्याचार. सदर प्रकरणात चार ते पाच पीडित विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची तक्रार.. शाळेजवळील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्व प्रकार पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. दुसऱ्या दिवशीही पीडित विद्यार्थिनीवर आरोपी शिक्षक इंगळे यांने अत्याचार केल्यानंतर सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरे झाला होता कैद. याप्रकरणी पीडित आणि नातेवाईकांनी जबाब दिला नाही मात्र घटनेच्या वेळी लावलेल्या व्हिडिओमुळे आरोपीला झाली शिक्षा. याबद्दल मोहोळ पोलीस ठाण्यात पिडितीने तक्रार दाखल केली होती त्याच तक्रारीवरून प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता.
291
comment0
Report
Advertisement
Back to top