Back
शिंदखेडा नगरपंचायत: स्ट्रांग रूम में 24x7 सुरक्षा, मतगणना 21 दिसम्बर तक टली
PPPRASHANT PARDESHI
Dec 09, 2025 04:20:31
Dhule, Maharashtra
शिंदखेड्यात स्ट्रॉंगरुम बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जागता पहारा देत आहेत. अंथरूण पांघरूणसह राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्तेंकडून पहारा दिला जातं आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानांतर मतपेट्या स्ट्रॉंग रुममध्ये ठेवण्यात आले. ३ डिसेंबर ऐवजी २१ डिसेंबर पर्यंत मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. प्रशासनाकडून स्ट्रॉंग रुम बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत स्ट्रॉंग रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी शिंदखेडा तहसील कार्यालयात शासकीय इमारतीत ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रुम बाहेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते २४ तास जागता पहारा देत आहेत. अंथरूण पांघरूण आणून याठिकाणी पहारा दिला जात आहे. शिंदखेडा नगरपंचायतीसाठी महायुती मधील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमनेसामने रिंगणात उतरले होते. शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत चुरश बघायला मिळाली होती. २ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर मतपेट्या या शिंदखेडा तहसील कार्यालयातील शासकीय इमारतीत स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले. मतमोजणी ३ डिसेंबर ऐवजी २१ डिसेंबर वर लांबल्याने निकाल १८ दिवस लांबल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रुम बाहेर जागता पहारा ठेवला जात आहे. मतपेट्या ठेवलेल्या जागी कोणताही अनुचित प्रकार आणि मतपेट्यांशी छेडछाड होवू नये म्हणून चोवीस तास कार्यकर्ते या स्ट्रॉंग रुमवर लक्ष ठेवत आहेत. रात्री दोन आणि सकाळी दोन जण याठिकाणी चार चार तासांच्या पाळीने लक्ष देत असतात. रात्री याच ठिकाणी अंथरूण पांघरूण टाकून चार चार तासांच्या वेळेत खडा पहारा देण्यात येत आहे. स्ट्रोंग रुम बाहेर प्रशासनाकडून कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत स्ट्रॉंग रूम असून सीसीटीव्हीचे प्रक्षेपण बाहेर दिसेल अशी व्यवस्था करण्यात आली असून, पोलिसांना देखील स्ट्रॉंग रुमच्या बाहेर तैनात करण्यात आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowDec 09, 2025 05:48:39103
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 09, 2025 04:51:0896
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 09, 2025 04:49:42222
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 09, 2025 04:39:11140
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 09, 2025 04:38:27158
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 09, 2025 04:37:44186
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 09, 2025 04:37:21100
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 09, 2025 04:20:44182
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 09, 2025 04:20:10199
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 09, 2025 04:03:38131
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 09, 2025 04:01:52179
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 09, 2025 04:01:02158
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 09, 2025 03:47:32153
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 09, 2025 03:47:14141
Report