Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

नंदूरबार के चार नगरपालिकाओं में AIMIM चुनावी मैदान संभाल रहा है

PPPRASHANT PARDESHI
Nov 14, 2025 11:48:00
Dhule, Maharashtra
नंदुरबार जिल्ह्यात नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी AIMIM निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून जिल्ह्यातील चार नगरपालिकेत पूर्ण ताकतीने निवडणुक लढणार असल्याचे पक्ष निरीक्षक शारिक नकशबंदी यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील मतदारांनी सत्तेचा अनुभव घेतला असून विकासाच्या दुष्काळामुळे कुठलाच ठोस विकास झालेला नाही, त्यामुळे सर्व समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. नंदूरबार आणि शहादा नगरपालिकांसाठी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिले जाणार आहेत. AIMIM निवडणुकीत उतरणार असल्याने अनेकांचे गणित बदलेल, गेल्या वर्षांपासून सत्ता भोगत असलेल्या नेत्यांनी पाण्याच्या समस्या, गटारी, रस्ते अशा विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकांना न्याय मिळण्यासाठी AIMIM सर्व समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन उमेदवारी देणार आहे, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
146
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Nov 14, 2025 12:24:16
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचा राज्यातील पहिल्या उमेदवाराचा अर्ज दाखल, उरुण ईश्वरपूर मध्ये जयंत पाटलां विरोधात महायुती एकवटली.. अँकर - महायुतीकडून नगराध्यक्ष पदाच्या राज्यातल्या पहिल्या उमेदवाराचा अर्ज सांगलीच्या उरूण ईश्वरपूरसाठी दाखल करत प्रचारांचा नारळ फोडला आहे. भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील,आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीतील भाजपाचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांचा ईश्वरपूर नगराध्यक्ष पदासाठी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केली आहे.उमेदवारी दाखल करण्याच्या आधी उरुण ईश्वरपूर मध्ये महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करत जोरदार रॅली देखील काढण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील त्यांच्या बालेकिल्ला असणाऱ्या उरूण ईश्वरपुर मध्ये एकत्रित येत जयंत पाटलांच्या विरोधात दंड थोपटलाय,या ठिकाणी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र विश्वनाथ डांगेंना नगराध्यक्ष पदाच्या मैदानात भाजपाने उतरवले,त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरपरिषदची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचा स्पष्ट झालय.. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,भाजपा.
70
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 14, 2025 12:19:14
Kalyan, Maharashtra:टॅक्स भरतो, मग रस्ता कुठे?'...संतप्त महिलांचं श्राद्ध घालत आंदोलन केडीएमसी मुख्यालयाबाहेर 'आई एकविरा महिला मंडळा'चा महापालिका अधिकाऱ्यांविरोधात एल्गार! कल्याण-डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात आज 'आई एकविरा महिला मंडळा'ने आक्रमक पवित्रा घेतला. क.डॉ.म.पा. मुख्यालयाच्या बाहेर महिला मंडळाच्या सदस्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत महापालिका अधिकाऱ्यांचे प्रतीकात्मक श्राद्ध घालून जाहीर निषेध आंदोलन केले.आडिवली परिसरातील रस्ते गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहेत. नागरिक वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने कुठलीही दखल घेत नसल्याने आई एकविरा महिला मंडळा'ने गेल्या अडीच वर्षांपासून पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुरू केला. यानंतर पालिकेने लेखी स्वरूपात पाच महिन्यांत रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. यामुळे संतापलेल्या महिला आणि नागरिकांनी "आम्ही टॅक्स भरतो, मग आमचा टॅक्स जातो कुठे?" असा संतप्त सवाल उपस्थित करत. "दंड वसूल करायला येता, पण पाणी, रस्ता आणि सुविधा मात्र देत नाही," अशी नाराजी व्यक्त करण्यात आली. बाईट... नागरिक
104
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 14, 2025 11:44:20
Akola, Maharashtra:Anchor removed: बिहार निवडणुकीच्या निकालावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विरोधकांवर तीव्र टीका केली आहे. “जे महाराष्ट्रात गोल टोपी लावून फिरतात, त्यांना आता बिहारच्या निकालावरून अक्कल येईल, अशी टोला लगावत त्यांनी ठाकरे बंधूंचा नामोल्लेख केला. “एक ठाकरे गोल टोपी लावून फिरायचे, आता दुसरे ठाकरेही तसंच करत आहेत,”अशी टीकाही त्यांनी केली. सोमय्या यांनी यावेळी बांग्लादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर गंभीर आरोप केले. “हिरव्या रंगाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवला गेला, आम्ही बांग्लादेशी घुसखोरांविरोधात युद्ध पुकारले आहे, मात्र विरोधक हिरवे झेंडे घेऊन आमचा विरोध करतात,” असा आरोप त्यांनी केला. बिहारची निवडणूक बांग्लादेशी मुद्द्यावर जिंकलो असून, आगामी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुती विजय मिळवेल, असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला. याच मुद्द्यावर बोलताना त्यांनी दावा केला की, “आज इथले काही मुस्लिम आक्रमक अतिरेकी झाले आहेत,”अशी गंभीर टिप्पणीही त्यांनी केली. विविध ठिकाणी एटीएसकडून कारवाया सुरू असल्याचे त्यांनी म्हटले तसेच अनेक भागांत मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी मतदार असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला. पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व बांग्लादेशी मतदार हद्दपार केले जातील, असा दावा करत त्यांनी विरोधकांकडून ‘मतचोरीचे आरोप’ पुन्हा लावले असल्याची टीका केली.
176
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 14, 2025 11:43:07
Vasai-Virar, Maharashtra:Slug- दो बहनो ने दिया पापा को बुलेट गिफ्ट पापाके आँखें खुशी से नम अँकर - लडकियोके की शिक्षा के लिए दिन-रात मेहनत करने वाले एक पिता को उनकी ही दो बेटियों ने ऐसा सरप्राइज़ दिया, जिसे सुनकर हर किसी की आंखें नम झाल गईं。 नायगांव में रहने वाले भाऊसाहेब दिघे अपनी दो बेटियों की पढ़ाई के लिए लगातार संघर्ष कर रहे थे। इसी बीच उनकी बेटियों—रिया और मानसी दिघे—ने पिता के लिए एक खास तोहफ़ा देने की ठानी。 पढ़ाई के लिए मिल रहे पैसों में से थोड़ा-थोड़ा बचत करते हुए मानसी और रियाने दोनों मिलकर अपने पिता के लिए बुलेट बाइक खरीदी। शेज़ारों को यह बताकर कि “हम अपने लिए गाड़ी ले रहे हैं,” दोनों ने योजना को पूरी तरह गुप्त रखा। लेकिन जैसे ही बाइक का ओपनिंग हुआ और पिता को पता चला कि यह गिफ्ट उन्हीं के लिए है… भाऊसाहेब दिघे की आंखें खुशी के आँसुओं से भर आईं। भाऊसाहेब दिघे का बाइट: “आज लेंगे, कल लेंगे कहकर रह गया… लेकिन मेरी बेटियों ने मेरा सपना पूरा कर दिया।” मानसी दिघे का बाइट: “पापा ने हमारे लिए बहुत संघर्ष किया… यह गिफ्ट उनके लिए हमारी छोटी-सी कोशिश है.”
146
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 14, 2025 11:38:13
Dhule, Maharashtra:जळगावच्या अमळनेर नगरपालिका शिवसेना स्वबळावर लढवणार असून, अंमळनेर नगरपालिकेसाठी ३७ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पूर्ण पॅनल आम्ही स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा माजी आमदार शिरीष चौधरी केली आहे. माजी आमदार शिरीष चौधी यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्यानंतर अमळनेर मध्ये शिवसेनेच्या ताकद वाढली असून, अमळनेरच्या नगरपालिकेवर शिवसेनेच्या भगवा फडकवणार असल्यासाठी पूर्ण ताकतीने निवडणुकीत उतरणार असून पूर्ण पॅनल लढवणार आहोत, असं चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्री यांनी स्थानिक पातळीवरची निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणुका लढत आहोत. अमळनेर हे शिवसेनेच्या बाले किल्ला राहिला आहे. त्यामुळे एक हाती सत्ता आमची येणार असून, आतापासूनच शिवसैनिक जोमाने कामाला लागले असल्याने पूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून येतील आणि अंमळनेरची नगरपालिकेवर भगवा फडकेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला.
203
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 14, 2025 11:32:10
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील तपसिद्धी स्कूल ऑफ भरतन नाट्यमच्या 4 मुलींनी एवरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर केलंय. एवरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासामध्ये एकूण तीन वेळेला हे भरतनाट्यम सादर करण्यात आले आहे . जमिनीपासून तब्बल 18200 फुटावर हे भरतनाट्यम सादर करण्यात आल असून या भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातून एवरेस्टला मानवंदना देण्यात आले. तपसिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या संयोगिता पाटील , दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी यांनी हे भरत नाट्य सादर केले. एवरेस्ट बेस कॅम्प सर करत असताना तापमानामध्ये चढ उतार, गोठवणारी थंडी असते. असं असतानाही अत्यंत कमी म्हणजे उणे 8 अंश तापमानामध्ये बिना बूट आणि बिना ग्लोज या चार नृत्यांगणाने भरतनाट्यम सादर केले. जगामध्ये अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असल्याचा दावा तपसिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यम च्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा रेकॉर्ड असल्याचा देखील नृत्यांगनांचा दावा आहे.
96
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 14, 2025 11:30:15
Dhule, Maharashtra:नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक बँकेची चावी घरी विसरून गेल्याने आज सकाळी तब्बल दोन तासांपर्यंत बँक बंद राहिली. यामुळे कामासाठी आलेल्या ग्राहकांना बँकेच्या बाहेरच ताटकळत बसून राहावे लागले. या प्रकाराचा व्हिडिओ काही जागरूक नागरिकांनी काढून सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ग्रामीण भागात आर्थिक सुविधांची कमतरता असल्याने कोपर्ली गावात एकच राष्ट्रीयीकृत बँक असल्याने शेतकरी, महिला, वृद्ध नागरिक आणि विविध शासकीय योजनांचे लाभार्थी दररोज मोठ्या संख्येने या शाखेत येत असतात. मात्र, व्यवस्थापकाच्या हलगर्जीपणामुळे आज ग्राहकांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागली. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, ग्रामीण भागात आधीच बँकांची संख्या कमी असून, असे प्रकार वारंवार घडल्यास सामान्य जनतेच्या कामकाजावर मोठा परिणाम होऊ शकतो. या प्रकरणाबाबत ग्राहकांनी संबंधित बँक प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
89
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 14, 2025 11:28:02
Dhule, Maharashtra:दोंडाईचा नगरपालिका नगरध्यक्ष पदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री माजी नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल उमेदवारी अर्ज दाखल केला. भ glamorous शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री जायकुमार रावल यांच्यासह भाजपचे आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे उपस्थितीत होते. दोंडाईचा-वरवाडे नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुक उमेदवार लवकरच आपले अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, नयनकुंवरताई रावल यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमासाठी भाजपकडून मोठी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक रावल गढी जवळील शिव मंदिरापासून सुरू होऊन शहीद अब्दुल हमीद चौक मार्गे राजपथ आणि राममंदिर या मार्गाने नगरपालिकेच्या इमारतीपर्यंत पोहचली. यावेळी जायकुमार रावल यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप घवघवीत यश संपादित करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
27
comment0
Report
Advertisement
Back to top