Back
ताडोबा-अंधारी बफर क्षेत्र से दो बाघिनों के स्थानांतरण पर ग्रामीणों का भारी विरोध
AAASHISH AMBADE
Nov 12, 2025 05:16:27
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील नवेगाव जंगलातील चंदा आणि चांदणी या दोन वाघिणींना राज्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला आहे. प्रजनन काळ असलेल्या या 2 वाघिणीपेक्षा हल्लेखोर आणि समस्याग्रस्त वाघांना इतरत्र हलवण्याचा वन्यजीवप्रेमींचा आग्रह आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात शंभरहून अधिक वाघ आहेत. याशिवाय जिल्ह्यातील प्रादेशिक व राखीव जंगलांमध्ये वाघांची संख्या 100 व त्याहून अधिक आहे. उत्तम वनव्यवस्थापन आणि अधिवासासाठी लागणारी अनूकूल वातावरण निर्मिती वाघ संख्येच्या वृद्धीचे मुख्य कारण आहे. मात्र वाढते वाघ प्रादेशिक व राखीव जंगलांच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये शिरकाव करत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात मानव- वन्यजीव संघर्षाने परिसिमा गाठली आहे. पीक पेरणी व कापणीच्या काळात मोठ्या संख्येत वाघांच्या हल्ल्यात ग्रामस्थांचे मृत्यू होत आहेत. हे टाळण्यासाठी वनविभागाने सातत्याने हल्लेखोर व समस्याग्रस्त वाघांना जेरबंद करण्याची मोहीम चालविली आहे. याचाच दुसरा उपाय म्हणजे काही वाघांना राज्यातील अन्य व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित केले जात आहे. मात्र हल्लेखोर व समस्याग्रस्त वाघांना इतरत्र हलवण्यापेक्षा ज्या वाघिणीनी कुठलेही हल्ले केले नाहीत व समस्याग्रस्त नाहीत अशा वाघिणींना हलवले जात आहे त्यामुळेच हा विरोध केला जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowNov 12, 2025 06:55:100
Report
SNSWATI NAIK
FollowNov 12, 2025 06:53:380
Report
KPKAILAS PURI
FollowNov 12, 2025 06:52:520
Report
KJKunal Jamdade
FollowNov 12, 2025 06:39:570
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 12, 2025 06:36:100
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 12, 2025 06:32:330
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 12, 2025 06:31:260
Report
AKAMAR KANE
FollowNov 12, 2025 06:20:510
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 12, 2025 06:20:380
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 12, 2025 06:02:140
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 12, 2025 06:01:550
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 12, 2025 06:00:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 12, 2025 05:45:200
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 12, 2025 05:35:330
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 12, 2025 05:16:550
Report