Back
अमरावती के विवाह मंच पर नवरदेव पर धारदार चाकू हमला; हड़कंप
ADANIRUDHA DAWALE
Nov 12, 2025 08:07:29
Amravati, Maharashtra
लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर जीवघेणा हल्ला; बडनेरा येथील धक्कादायक घटना
अँकर : अमरावतीच्या बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्नसमारंभात काल रात्री अचानक गोंधळ उडाला. साहिल लॉन येथे बडनेरा येथील सुजलराम समुद्रे याचा विवाह समारंभ सुरू असताना दोन युवकांनी नवरदेव सुजलराम समुद्रे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्याचे ड्रोन व्हिडिओ zee 24 तासच्या हाती आले आले. नवरदेव सुजलराम हा जखमी झाल्यावर, नववधू हीच त्या ठिकाणी चक्कर येऊन पडली, नवरदेवाचे वडील आरोपींना पकडायला गेले असता त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपी कडून करण्यात आला. आरोपी दुचाकी वाहनावर बसून पळून गेल्याचा संपूर्ण व्हिडिओ ड्रोन कॅमेरात कैद झाला. या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच बडनेरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे. प्राप्त माहितीनुसार जखमी सुजल समुद्रे हा तिलक नगर परिसरातील रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या आरोपीचा शोध आता बडनेरा पोलीस घेतो असून यापूर्वी देखील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही आरोपींनी धाब्यावर महिलेस मारहाण केली होती त्यामुळे बडनेरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा गुन्हेगारावर वचक राहिला नाही का असा प्रश्न निर्माण होतो.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 12, 2025 09:54:380
Report
KJKunal Jamdade
FollowNov 12, 2025 09:50:040
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 12, 2025 09:46:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 12, 2025 09:44:270
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 12, 2025 09:43:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 12, 2025 09:43:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 12, 2025 09:42:540
Report
AKAMAR KANE
FollowNov 12, 2025 09:20:150
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 12, 2025 09:17:270
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 12, 2025 09:10:440
Report
PNPratap Naik1
FollowNov 12, 2025 09:06:150
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 12, 2025 08:58:130
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 12, 2025 08:57:540
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 12, 2025 08:33:5373
Report
SNSWATI NAIK
FollowNov 12, 2025 08:28:280
Report