Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

दरियापूर नगर पालिका में जावू बनाम जावू: एक ही परिवार के दो उम्मीदवार भिड़ेंगे

ADANIRUDHA DAWALE
Nov 12, 2025 06:02:14
Amravati, Maharashtra
दर्यापूर नगर पालिकेत जावू विरुद्ध जावू लढत होण्याची शक्यता; आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे रिंगणात उतरण्याची शक्यता अँकर :– सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून प्रत्येक जण निवडणुकीसाठी कामाला लागत आहे अशातच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर पालिकेमध्ये जावू विरुद्ध जावू अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस कडून मंदाकिनी सुधाकर भारसाकडे रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी जावु विरुद्ध जावू अशी एकाच कुटुंबात लढत होणार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Nov 12, 2025 07:38:21
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 12, 2025 07:16:00
Shirur, Maharashtra:मी मंत्री म्हणुन नाही तर माणुस म्हणुन इथं आलो आंदोलनातील गुन्ह्यांवर कारवाई करु नका या घटनेची खंत व्यक्त करत ऊस तुम्ही लावला त्या ऊसात ससे लांडगे कोल्हे असल्याने बिबट्याला शिकार आयती मिळतेय हा दोष कुनाचा हतबल वनमंत्र्यांचा माध्यमांना सवाल दोष कुनाचा हि परिस्थिती सर्व ठिकाणी उद्धभवली पण यातुन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असुन हिंसक बिबट लोकांसमोर येत असेल तर त्यावा शुट करा अशी आक्रमक भुमिका वनमंत्री गणेश नाईकांनी घेतली वनमंत्री गणेश नाईक यांनी पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी गणेश नाईक माध्यमांशी बोलत होते
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 12, 2025 06:55:10
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकांना येणार्‍या जानेवारी महिन्यात पार पडणार असल्याची माहिती आली आहे. डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने तयारी सुरू केली असून महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देणार असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. पक्षाकडे निवडणुकेसाठी तीन प्लॅन तयार असल्याचे मिटकरी यांनी नमूद केले. प्लॅन ए: महायुतीसोबत निवडणूक लढवणे. प्लॅन बी: शिंदे गटासोबत युती करून निवडणूक रिंगणात उतरणे. प्लॅन सी: स्वबळावर निवडणूक लढवणे. अकोल्यात राष्ट्रवादीला मजबूत भूमिका मिळू शकते आणि मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आमदार मिटकरी यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 12, 2025 06:53:38
Navi Mumbai, Maharashtra:कुत्रीम तलावात विसर्जित केलेल्या हजारो मुर्त्या मनपाच्या वाहनतळात धुळखात पडून. नवी मुंबई मनपाने गणेशोत्सव जल प्रदूषण थांबविण्यासाठी कुत्रीम तलावांची निर्मिती केली होती. नागरिकांनी या कुत्रीम तलावांमध्येच गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचा आग्रह केला होता. नागरिकांनी देखील या आवाहनाला प्रतिसाद देत कुत्रीम तलावात गणेश मूर्तिशे विसर्जन केले. मात्र कुत्रीम तलावात विसर्जित केलेल्या गणेश मुर्त्यांची आता 2 महिने झाले तरी अद्याप विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. कुत्रीम तलावात विसर्जित केलेल्या 6 ते 7 हजार मुर्त्या बेलापूर मधील मनपाच्या बहुमजलीय वाहनतळा मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. गणेश मुर्त्यांची विल्हेवाट न लावता मुर्त्या अश्याच ठेवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तात्काळ विल्हेवाट लावण्याची मागणी करण्यात आली आहे。
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 12, 2025 06:52:52
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 12, 2025 06:36:10
Ratnagiri, Maharashtra:नेतेच जर बायका नाचवून पैसे जमा करत असतील तर कार्यकर्ते काय करणार ? लोटे MIDC मधील प्रकरणावर भास्कर जाधवांची रामदास कदम यांच्यावर टीका. रामदास कदम यांचा भाऊ अण्णा कदम आणि जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण हॉटेलमध्ये बसून भुरट्या चोरांना पाठवून माझ्या मुलाकडून दहा लाखाची खंडणी आणायला सांगतात......यात त्यांची चूक नाही. नेताच बाया नाचवून पैसे जमा करणारा असेल तर ते तरी काय करणार. - भास्कर जाधव विक्रांत माझ्याही दोन पावले पुढे, जिथे गरज लागेल तिथे स्वतःहून येईल - भास्कर जाधव विक्रांत शांत आहे असे अनेकांना वाटत होते... तो कसा आहे ते त्याने दाखवून दिले. घाबरून जाऊ नका, दापोली असो नाहीतर खेड. तशीच वेळ आली तर आम्ही तयार आहोत....... भास्कर जाधव यांचा दापोली मतदार संघात रामदम कदमांना इशारा.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 12, 2025 06:32:33
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात धक्कादायक घुसखोरी, भरमसाठ शुल्क घेत खाजगी कोचेस करत आहेत मैदान- ट्रॅकचा अनिर्बंध वापर, पोलीस भरतीसाठी शेकडोंच्या संख्येत युवक- युवती करत आहेत खाजगी कोचेसच्या मार्गदर्शनावाखाली सराव अँकर:--चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात धक्कादायक घुसखोरी बघायला मिळत आहे. भरमसाठ शुल्क घेत खाजगी कोचेस मैदान- ट्रॅकचा अनिर्बंध वापर करत आहेत. चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलात सर्वोत्तम दर्जाचे मैदान, सिंथेटिक ट्रॅक आणि इतर सुविधा गेल्या काही काळात उभारल्या गेल्या आहेत. मात्र सध्या याच ठिकाणी आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी शेकडोंच्या संख्येत युवक- युवती खाजगी कोचेसच्या मार्गदर्शनावाखाली सराव करत आहेत. परिणामी जिल्हा क्रीडा संकुलाचे मैदान एखाद्या जाहीर सभेप्रमाणे भासत आहे. हे खाजगी कोचेस कुठेही नोंदणीकृत नाहीत.  शासनाला कुठलेही शुल्क न देता हे कोचेस नियमित खेळाडूंवर मात्र दादागिरी करत आहेत. याच हिवाळ्याच्या काळात सर्व प्रकारच्या जिल्हास्तरीय- विभाग स्तरीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होऊ घातल्या आहेत. या क्रीडा स्पर्धांच्या सरावासाठी नियमित खेळाडूंना हे मैदान उपलब्ध होणे गरजेचे आहे. असे असले तरी खाजगी कोचेसच्या मैदानावरील दादागिरी आणि उद्दामपणावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुकदर्शक बनले आहे.  सकाळ-संध्याकाळ सत्रात या संकुलात वॉकिंगसाठी येणारे ज्येष्ठ नागरिक देखील या प्रचंड गर्दीने त्रस्त आहेत. खाजगी कोचेसची अमर्याद दादागिरी संपुष्टात आणण्याची मागणी केली जात आहे. बाईट १) शासनमान्य क्रीडा कोच बाईट २) ज्येष्ठ नागरिक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 12, 2025 06:31:26
Ambernath, Maharashtra:वांगणीत लवकरच रेल्वे क्रॉसिंगवर उभारला जाणार उड्डाणपूल लेटलतिफ कारभार सुधारण्यासाठी रेल्वे क्रॉसिंग बंद होणार कंत्राटदारांची नेमणूक, डिसेंबरपासून कामाला सुरूवात होणार? त्याठिकाणी लवकरच रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार आहे. त्यानुसार वांगणी आणि लगतच्या गावांमधील रेल्वे फाटक बंद होणार असून सोयीसाठी रेल्वे उड्डाणपुलांची निर्मिती केली जाईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. रेल्वे फाटक उघडल्यानंतर ते बंद होण्यासाठी 3 ते 7 मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे लोकल तसेच एक्स्प्रेसचा वेग मंदावतो. त्यामुळे रेल्वेने कल्याण ते कर्जत दरम्यान असलेले 10 रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या 10 फाटकांपैकीच एक असलेलं वांगणी रेल्वे फाटकही बंद होईल. नागरिकांच्या सोयीसाठी नवीन आरओबी बांधण्यात येईल. त्यासाठी कंत्राटदारांची नेमणुक करण्यात आली असून डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलीय.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 12, 2025 06:20:51
Nagpur, Maharashtra:नागपूर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर महायुतीच्या स्थानिक नेत्यांची महत्त्वाची बैठक झालीय. अर्ज भरण्याच्या अखेरचे दिवस अवघे काही दिवस राहिले असताना अजूनही महायुटीची निश्चिती झालेली नाही. त्या दृष्टीने स्थानिक नेत्यांची ही बैठक महत्त्वाची मांडण्यात येत आहे. यानंतर मुंबईत होणाऱ्या बैठकीत महायुतीच चित्र स्पष्ट होणार आहे. नागपूरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची ही बैठक झाली. शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर जिल्हा निरीक्षक राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊतसह महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 12, 2025 06:20:38
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 12, 2025 06:01:55
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची शेतकरी लागवड करीत असतात.. येथील केळीला आजपर्यंत मोठी मागणी होती,त्यामुळे केळीच्या लागवडीत वाढ झालीय, मात्र यावर्षी अचानक केळीचे भाव व्यापाऱ्यांनी पाडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत, या केळीला 22 रुपये प्रति क्विंटलचा दर होता,त्याच केळीला आता दोन ते तीनशे रुपये क्विंटलचा दर मिळू लागलाय. त्यामुळे केळी शेतातून बाहेर काढायला ही परवडत नसल्याने केळी आता झाडालाच पिकून सडून जात आहेत. लाखो रुपयांचा खर्च करून हातात लावलेला ही खर्च येत नसल्याने या केळी उत्पादक मेटाकुटीला आलाय, खऱ्या अर्थाने आज या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या पाठीमागे शासनाने उभे राहण्याची गरज निर्माण झालीय...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 12, 2025 06:00:48
0
comment0
Report
Advertisement
Back to top