Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

दिल्ली ब्लास्ट के बाद अमरावती में हाई अलर्ट, शहर में पुलिस नाकाबंदी

ADANIRUDHA DAWALE
Nov 12, 2025 04:34:57
Amravati, Maharashtra
दिल्ली ब्लास्ट प्रकरणानंतर अमरावतीत हाय अलर्ट जारी; शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी अँकर :– दिल्ली ब्लास्ट प्रकरणानंतर अमरावतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर आणि चौकात अमरावती शहर पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरू आहे. दिल्लीमधील घटनेनंतर राज्यात मोठ्या शहरांमध्ये वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीत देखील वाहनांची तपासणी आणि वाहन चालकांची चौकशी केली जात आहे. दरम्यान कोणी संशयित आढळल्यास त्यांची कसून चौकशी पोलीस करत असून रात्री उशिरापर्यंत ही नाकीबंदी सुरू होती.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Nov 12, 2025 06:20:51
Nagpur, Maharashtra:नागपूर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर महायुतीच्या स्थानिक नेत्यांची महत्त्वाची बैठक झालीय. अर्ज भरण्याच्या अखेरचे दिवस अवघे काही दिवस राहिले असताना अजूनही महायुटीची निश्चिती झालेली नाही. त्या दृष्टीने स्थानिक नेत्यांची ही बैठक महत्त्वाची मांडण्यात येत आहे. यानंतर मुंबईत होणाऱ्या बैठकीत महायुतीच चित्र स्पष्ट होणार आहे. नागपूरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची ही बैठक झाली. शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर जिल्हा निरीक्षक राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊतसह महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 12, 2025 06:20:38
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 12, 2025 06:02:14
Amravati, Maharashtra:दर्यापूर नगर पालिकेत जावू विरुद्ध जावू लढत होण्याची शक्यता; आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे रिंगणात उतरण्याची शक्यता अँकर :– सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून प्रत्येक जण निवडणुकीसाठी कामाला लागत आहे अशातच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर पालिकेमध्ये जावू विरुद्ध जावू अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस कडून मंदाकिनी सुधाकर भारसाकडे रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी जावु विरुद्ध जावू अशी एकाच कुटुंबात लढत होणार आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 12, 2025 06:01:55
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची शेतकरी लागवड करीत असतात.. येथील केळीला आजपर्यंत मोठी मागणी होती,त्यामुळे केळीच्या लागवडीत वाढ झालीय, मात्र यावर्षी अचानक केळीचे भाव व्यापाऱ्यांनी पाडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत, या केळीला 22 रुपये प्रति क्विंटलचा दर होता,त्याच केळीला आता दोन ते तीनशे रुपये क्विंटलचा दर मिळू लागलाय. त्यामुळे केळी शेतातून बाहेर काढायला ही परवडत नसल्याने केळी आता झाडालाच पिकून सडून जात आहेत. लाखो रुपयांचा खर्च करून हातात लावलेला ही खर्च येत नसल्याने या केळी उत्पादक मेटाकुटीला आलाय, खऱ्या अर्थाने आज या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या पाठीमागे शासनाने उभे राहण्याची गरज निर्माण झालीय...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 12, 2025 06:00:48
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 12, 2025 05:35:33
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 12, 2025 05:16:55
Washim, Maharashtra:रात्री शेतकऱ्याच्या कोठ्यात लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले आहे. भगवान गंगाराम भारती या शेतकऱ्याच्या कोठ्यात लागलेल्या आगीत जनावरांचा चारा, शेतीसाठीचे साहित्य, मोटर पंप, केबल, टिनपत्रे इत्यादी साहित्य जळून खाक झाले. या आगीत एका वासराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन बैल ६० टक्के भाजले आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने आणि रिसोड नगरपालिका 的 अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 12, 2025 05:16:27
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील नवेगाव जंगलातील चंदा आणि चांदणी या दोन वाघिणींना राज्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला आहे. प्रजनन काळ असलेल्या या 2 वाघिणीपेक्षा हल्लेखोर आणि समस्याग्रस्त वाघांना इतरत्र हलवण्याचा वन्यजीवप्रेमींचा आग्रह आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात शंभरहून अधिक वाघ आहेत. याशिवाय जिल्ह्यातील प्रादेशिक व राखीव जंगलांमध्ये वाघांची संख्या 100 व त्याहून अधिक आहे. उत्तम वनव्यवस्थापन आणि अधिवासासाठी लागणारी अनूकूल वातावरण निर्मिती वाघ संख्येच्या वृद्धीचे मुख्य कारण आहे. मात्र वाढते वाघ प्रादेशिक व राखीव जंगलांच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये शिरकाव करत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात मानव- वन्यजीव संघर्षाने परिसिमा गाठली आहे. पीक पेरणी व कापणीच्या काळात मोठ्या संख्येत वाघांच्या हल्ल्यात ग्रामस्थांचे मृत्यू होत आहेत. हे टाळण्यासाठी वनविभागाने सातत्याने हल्लेखोर व समस्याग्रस्त वाघांना जेरबंद करण्याची मोहीम चालविली आहे. याचाच दुसरा उपाय म्हणजे काही वाघांना राज्यातील अन्य व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित केले जात आहे. मात्र हल्लेखोर व समस्याग्रस्त वाघांना इतरत्र हलवण्यापेक्षा ज्या वाघिणीनी कुठलेही हल्ले केले नाहीत व समस्याग्रस्त नाहीत अशा वाघिणींना हलवले जात आहे त्यामुळेच हा विरोध केला जात आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 12, 2025 05:04:47
Beed, Maharashtra:बीड:वाळू माफीयांची दहशत; सीना नदी पात्रातील वाळू उपसा थांबविल्याने वाळू माफियांकडून शेतकऱ्यावर हल्ला आष्टी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी परिसरात वाळू माफियांची दहशत पहायला मिळाली. नऊ जणांच्या टोळक्याकडून शेतकऱ्यावर तसेच घरावर आणि वाहनांवर हल्ला करण्यात आला. वाकी परिसरात असलेल्या सीना नदी पात्रात अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू होती. याच दरम्यान नदी शेजारील असलेल्या एका शेतकऱ्याने हा प्रकार रोखला. त्यामुळे संतप्त झालेल्या टोळक्याने दोघा शेतकऱ्यांवर हल्ला चढवला. हल्लेखोर यावरच थांबले नसून शेतकऱ्याच्या घरावर पाण्याच्या प्लांटवर आणि वाहनांवर लाठ्या काठ्याने हल्ला चढविण्यात आला. या प्रकरणात एकूण नऊ जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाळू माफियांच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील आरोपींना अटक करून न्याय द्यावा अशी मागणी हल्ला झालेल्या शेतकऱ्याने केली. बाईट: दीपक आस्वार फिर्यादी शेतकरी
110
comment0
Report
Advertisement
Back to top