Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला के वाशीम बायपास पर बस पर पथराव, नकद लूट कर के आरोपी ने बस चालक से पैसा छीना

JJJAYESH JAGAD
Dec 09, 2025 03:47:14
Akola, Maharashtra
अकोला शहरातील वाशीम बायपास परिसरात सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. नाशिकहून अकोल्याकडे येणारी एसटी महामंडळाची बस सिग्नलवर थांबलेली असताना एका अज्ञात युवकाने अचानक बसच्या काचेला दगड मारत काच फोडली. दगडफेक झाल्यानंतर आरोपी युवकाने चालकासोबत वाद घातला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहक मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला मात्र त्याच क्षणी आरोपीने वाहकाजवळील रोख रक्कम हिसकावून घेत पलायन केले. या प्रकरणी एसटी वाहकाच्या तक्रारीवरून जुनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Dec 09, 2025 04:51:08
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच इतर पिकांची वाढ सध्या उत्तम अवस्थेत झाली असून थंडीही अनुकूल आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी pिकांना वेळेवर सिंचन देण्यावर भर देत आहेत. मात्र, वारंवार रोहित्रात होत असलेल्या बिघाडांमुळे सिंचनाचे मोठे संकट निर्माण झाले आहे.मागील काही वर्षांपासून अनिश्चित हवामान, कमी उत्पादन आणि वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांवरचे कर्जाचे ओझे सतत वाढत आहे.त्यातच रोहित्राच्या वारंवार बिघाडामुळे शेतकऱ्यांची अधिकच गैरसोय होत आहे. त्यामुळे महावितरणने या समस्येची दखल घेऊन रोहित्र तातडीने दुरुस्त करून कृषी पंपांना नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरू लागली आहे.
77
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 09, 2025 04:39:11
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाबुळगाव येथे प्रदीप नंद यांच्या पुढाकारातून “नंद तारांगण” या अत्याधुनिक खगोल अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेले हे केंद्र विदर्भातील एकमेव असे खगोल निरीक्षण केंद्र ठरणार आहे. या केंद्रात बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक तीन दुर्बिणींमुळे खगोलप्रेमी, विद्यार्थी आणि अभ्यासकांना अंतराळातील विस्मयकारक दृश्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळणार आहे. चंद्रावरील विवर, दऱ्याखोऱ्या, विविध ग्रह-उपग्रह, तसेच गुरू ग्रहावरील सुरू असलेली महाकाय वादळे आणि त्याचे अक्षाभोवतीचचे परिवलन यांसारख्या घटनांचे थेट निरीक्षण पाहता येणार आहे. याशिवाय, हॉर्स हेड नेब्युला, अँड्रोमेडा गॅलॅक्सी, कॅब नेब्युला यांसारखी अतिदूर असलेली आकर्षक आकाशगंगा आणि नेब्युलाची दृश्येसुद्धा येथे पाहण्याची संधी उपलब्ध आहे. या दुर्बिणींमधून गुणवत्ता असलेली खगोल फोटोग्राफी करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. “नंद तारांगण” केंद्रामुळे अकोल्यातील नागरिकांना आणि परिसरातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आणि अंतराळाचा अनोखा चमत्कार अनुभवण्यासाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
140
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 09, 2025 04:38:27
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यात ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनांची कामे सध्या निधीअभावी ठप्प पडली आहेत.जिल्ह्यात मंजूर झालेल्या ७४१ नळ योजनांपैकी फक्त २९७ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित सर्व कामे मागील दीड वर्षांपासून आवश्यक निधी न मिळाल्याने अडथळ्यात आहेत.पूर्ण झालेल्या योजनांसाठी कंत्राटदारांना ५६ कोटी रुपयांची देयकं बाकी असून देयकांचा प्रश्न सुटल्याशिवाय नव्या कामांना सुरुवातच होऊ शकत नाही.याचा थेट परिणाम म्हणजे अनेक गावांमधील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.शासनाकडून आवश्यक निधी कधी उपलब्ध होणार, याकडे जिल्हा प्रशासनासह ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
158
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 09, 2025 04:37:44
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर के ताडोबा-अन्हारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये असलेल्या पांढरपौनी भागातून एका वाघिणीला जेरबंद करण्यात आले. ताडोबाच्या कोर भागातून वाघीण जेरबंद करण्यात आल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या वनविभागाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जेरबंद झालेली वाघीण अडीच ते तीन वर्षांची पूर्ण वाढ झालेली सुदृढ वाघीण असून छोटी तारा या प्रसिद्ध वाघिणीचा हा मादी बछडा आहे. जेरबंद झालेली वाघीण कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे रवाना केली गेली आहे. ताडोबातून एकूण 8 वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी हा विशेष स्थानांतरण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मात्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेण्यासाठी याआधी जेरबंद करण्यात आलेली चंदा आणि आज पांढरपौनी भागातून जेरबंद करण्यात आलेली वाघीण या दोन्ही ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मानव-वन्यजीव संघर्ष नसलेल्या भागातून जेरबंद करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा हा देशातील सर्वाधिक मानव-वन्यजीव संघर्ष असलेला जिल्हा असताना ज्या भागात संघर्ष नाही त्या भागातील वाघ जेरबंद करून वनविभाग काय साध्य करणार याबाबत मात्र सवाल उपस्थित झाले आहेत.
186
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 09, 2025 04:37:21
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... गंभीर २३ घरफोड्या उघड.... आंतरजिल्हा कुख्यात टोळीतील ४ आरोपी जेरबंद.... लातूर जिल्हा पोलीस दलाने घरफोड्या करणाऱ्या एका आंतरजिल्हा कुख्यात टोळीचा पर्दाफाश करत, गेल्या तीन वर्षांपासून सक्रिय असलेल्या या टोळीतील चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे लातूरसह धाराशिव आणि बिदर जिल्ह्यातील तब्बल २३ गंभीर घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि दोन मोटारसायकली असा एकूण ४ लाख ३७ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांची मालिका सुरू होती. या अनुषंगाने पोलीसांनी हि कार्यवाही केली आहे...
100
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 09, 2025 04:20:44
108
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 09, 2025 04:20:31
Dhule, Maharashtra:शिंदखेड्यात स्ट्रॉंगरुम बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जागता पहारा देत आहेत. अंथरूण पांघरूणसह राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्तेंकडून पहारा दिला जातं आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानांतर मतपेट्या स्ट्रॉंग रुममध्ये ठेवण्यात आले. ३ डिसेंबर ऐवजी २१ डिसेंबर पर्यंत मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. प्रशासनाकडून स्ट्रॉंग रुम बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत स्ट्रॉंग रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी शिंदखेडा तहसील कार्यालयात शासकीय इमारतीत ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रुम बाहेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते २४ तास जागता पहारा देत आहेत. अंथरूण पांघरूण आणून याठिकाणी पहारा दिला जात आहे. शिंदखेडा नगरपंचायतीसाठी महायुती मधील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमनेसामने रिंगणात उतरले होते. शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत चुरश बघायला मिळाली होती. २ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर मतपेट्या या शिंदखेडा तहसील कार्यालयातील शासकीय इमारतीत स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले. मतमोजणी ३ डिसेंबर ऐवजी २१ डिसेंबर वर लांबल्याने निकाल १८ दिवस लांबल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रुम बाहेर जागता पहारा ठेवला जात आहे. मतपेट्या ठेवलेल्या जागी कोणताही अनुचित प्रकार आणि मतपेट्यांशी छेडछाड होवू नये म्हणून चोवीस तास कार्यकर्ते या स्ट्रॉंग रुमवर लक्ष ठेवत आहेत. रात्री दोन आणि सकाळी दोन जण याठिकाणी चार चार तासांच्या पाळीने लक्ष देत असतात. रात्री याच ठिकाणी अंथरूण पांघरूण टाकून चार चार तासांच्या वेळेत खडा पहारा देण्यात येत आहे. स्ट्रोंग रुम बाहेर प्रशासनाकडून कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत स्ट्रॉंग रूम असून सीसीटीव्हीचे प्रक्षेपण बाहेर दिसेल अशी व्यवस्था करण्यात आली असून, पोलिसांना देखील स्ट्रॉंग रुमच्या बाहेर तैनात करण्यात आले आहे.
104
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 09, 2025 04:20:10
Mumbai, Maharashtra:मीरा भाईंदर पोलिसाचा धाक उरला नसल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे मीरा-भाईंदर काशिमीरा परिसरात मध्यरात्री तरुणांचा दारू पिऊन धिंगाणा विडिओ सोशल मीडियावर वायरल काशिमिरा परिसरात मध्यरात्रीनंतर बारबाहेर तरुणांनी जोरात ओरडत शिवीगाळ करत धिंगणा घातला.तसेच बारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला ते तरुण ऐकत नसल्याने काही स्थानिक नागरिकांनी त्या तरुणांना पकडून दिला चोप स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेत संबंधित तरुणाला अटक केली. कायद्याचा धाक दाखवण्यासाठी पोलिसांनी त्याची मिरवणूक काढत सार्वजनिकरीत्या माफी मागायला लावली. मीरा भाईंदर मध्ये रात्रीचे गस्त घालणारे पोलीस तसेच पेट्रोलिंग करणारे पोलीस नेमके काय करत होते असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे
199
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 09, 2025 04:01:52
Washim, Maharashtra:वाशीम:\n\nयंदा नावीन्यपूर्ण चिया पिकाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून कृषी विभागाच्या नियोजनापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात हरभरा आणि गहू ऐवजी मोहरी, मसूर आणि चिया यांसारख्या पर्यायी पिकांकडे शेतकरी वळत आहेत. कमी पाणी, कमी खर्च आणि चांगले दर यामुळे चिया पिकाची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. जिल्ह्यात एकूण ४,१५१ हेक्टर क्षेत्रावर चियाची पेरणी झाली आहे, जे ३,६५० हेक्टर नियोजनापेक्षा अधिक आहे. त्यात रिसोड तालुका सर्वाधिक १,४५१ हेक्टर तर मालेगाव तालुका १,३२० हेक्टर क्षेत्रासह आघाडीवर आहेत. कमी पाणी, कमी खत, अल्प फवारणी खर्च आणि वन्यप्राण्यांचा त्रास नसल्याने चिया फायदेशीर ठरत आहे. सध्या बाजारात १८ ते २० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा चियाकडे वाढता कल कायम आहे.
179
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 09, 2025 04:01:02
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पत्नीची पतीकडून गळा चिरून हत्या - दक्षिण सोलापूर तालुक्यात अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पत्नीची पतीकडून गळा चिरून हत्या - दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर गावात घडली घटना - सविता जकप्पा पुजारी असे खून झालेल्या पत्नीचे नाव - ऊसतोड कामगार जकप्पा मणगेरी पुजारी असे हत्या केलेल्या आरोपी पतीचे नाव - जकप्पा पुजारी यांचे कर्नाटकातील विजयपूर येथील महिलेचे अनैतिक संबंध होते - सविता आणि जकप्पा या दोन्हा पती-पत्नीत नेहमी भांडण होत होते - रागात जकप्पा यांनी पत्नी सविता हिच्या डोक्यात, गळ्यावर कोयत्याने वार करून तिचा खून केला - आरोपी पती जकप्पा पुजारी याला पोलिसांनी घेतले ताब्यात - मंद्रूप पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत
99
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 09, 2025 03:47:32
Nanded, Maharashtra:नांदेड शहरातील एक तेल व्यापाऱ्याची 30 लाख रुपये असलेली बॅग चोरट्यानी कार मधून पळवली. जुना मोंढा येथील तेल व्यापारी विनायक पारसेवार काल रात्री आपले दुकान बंद करून जात होते. आपल्या कारमध्ये ते बसले पण पंक्चर असल्याचे त्यांना समजले. पारसेवार कारमधून उतरतच तिथे अगोदरच संधी पाहत उभ्या असलेल्या चोरट्याने कारमधून पैश्यांची बॅग काढली. त्याचा साथीदार दुचाकी घेऊन तयारच होता. काही कळण्यापूर्वी बॅग घेऊन दोघे पसार झाले. पारसेवार यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण चोरटे धूम स्टाईल पसार झाले. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा शोध लावणे पोलीसांसमोर आव्हान आहे.
153
comment0
Report
Advertisement
Back to top