Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

पातुर में शिक्षक पर नाबालिग के साथ दुष्कर्म जैसे आरोप; गिरफ्तार

JJJAYESH JAGAD
Nov 12, 2025 02:00:15
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील एका गावात घडलेल्या संतापजनक घटनेने शिक्षणक्षेत्राला धक्का बसला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेतच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाने वर्गातच विद्यार्थिनीशी गैरवर्तन केलं. घरी गेल्यानंतर पीडित विद्यार्थिनीने संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला. संतप्त पालकांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. संतप्त नागरिकांनी आरोपी शिक्षकाला चोप देत कठोर शिक्षेची मागणी केली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.
84
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Nov 12, 2025 03:46:29
Washim, Maharashtra:वाशिम: वाशिम जिल्ह्यातील चार नगर परिषद आणि एका नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या पාර्श्वभूमीवर निवडून प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. निवडणुकीत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून जिल्हाभरात कडक तपासणी सुरू करण्यात आली आहे. अकोला–हैदाबाद महामार्गावरील मालेगाव परिसरात स्थिर पथक (SST) तर्फे वाहनांची काटेकोर तपासणी केली जात आहे. या तपासणीदरम्यान संशयास्पद वाहनांची पाहणी करून रोख रक्कम, दारू किंवा इतर अनधिकृत साहित्याची वाहतूक होत नाही ना, याची खात्री करण्यात येत आहे. निवडणुकीचा काळ जवळ आल्याने प्रशासनाने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क केल्या असून, जिल्ह्यात शांत, पारदर्शक आणि प्रामाणिक निवडणूक पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा पूर्णपणे तयारीत आहेत.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 12, 2025 03:45:45
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर जिल्ह्यात नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आलीय. जिल्हा निवड समितीच्या सदस्यांना न जुमानता घेतलेल्या उमेदवारांची मुलाखतीची प्रक्रिया रद्द करून पुन्हा घेण्याच्या सूचना प्रदेश काँग्रेसने दिले आहेत. त्यामुळे सुनील केदार गटाला चाप दlबसलाय. आज विधानसभा प्रभारी आणि जिल्हा निवड मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक घेण्यात येणार.. या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती घेऊन 13 नोव्हेंबरला मुंबईत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र पक्षाच्या अंतर्गत मतभेदांचा थेट परिणाम उमेदवार निवड प्रक्रिवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 12, 2025 03:30:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर ते पुणे या नव्या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधीच समाज माध्यमावर व्हायरल झालाय. महामार्गा ज्या भागातून जातोय त्या भागातील जमीन खरेदी करण्यासाठी पुणे मुंबईतील व्यावसायिक आणि शहरातील बड्या श्रीमंतांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतातून महामार्ग जातेय याची कसलीच माहितीच नाही.. आपल्या शेतीला काही पट भाव मिळत असल्याने या भागात रोज अनेक व्यवहार होत आहेत. हा नकाशा व्हायरल झाला आहे..पण प्रश्न आहे की केवळ सरकार कडे असलेला मॅप व्हायरल कसा झाला. सरकार याची चौकशी करणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होताय... दरम्यान व्हायरल झालेला नकाशा खरा की खोटा माहिती नाही मात्र या नकाशाच्या आधारे कोट्यावधींचे व्यवहार मात्र ग्रामीण भागात रोज सुरू आहेत...
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 12, 2025 03:30:30
Nashik, Maharashtra:आनंदवली परिसरातील अतिक्रमण हटविले अँकर नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने काल उच्च भू वसती म्हणून ओळख असलेक्या गंगापूर रोडवरील आनंदवली, गुरुजी रुग्णालय परिसरातील मनपाच्या डीपी प्लॅनमधील असलेल्या आरक्षित जमीनिवर अनेक वर्षापासून केलेले अतिक्रमण मनपाने हटविले.... गंगापूर रोडवरील आनंद वली भागात गुरुजी हॉस्पिटल रुग्णालयालगत सर्व्हे नंबर १६ येथील जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले होते. सदर जागेसंबंधात न्यायालयात दावे दाखल करण्यात आले होते. मनपाचा डीपी प्लॅन असलेल्या या जागे संदर्भात कोर्टाकडून महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्याने सकाळी सात वाजता मनपाची अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. या जागेवर गॅरेज, हॉटेल, वेल्डिंग दुकाने, घरे अतिक्रमण करण्यात आले होते. मनपाच्या पथकाने अखेर यावर कारवाई करीत सुमारे वीस ते पंचवीस दुकाने, घरे, गॅरेज, हॉटेल आदी सारे जमीनदोस्त केले. त्याकरिता तीन जेसीबी, दोन कटर व मनपाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने सुमारे सहा - सात ट्रकद्वारे हे सर्व अतिक्रमण काढून जप्त करण्यात आले.त्याचबरोबर मनपाच्या तीनही विभागातील अतिक्रमण पथके अशा सुमारे शंभर ते सव्वाशे अधिकारी, कर्मचारी आदींच्या फौज फाट्याने हे अतिक्रमण जमीनदोस्त केले.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 12, 2025 03:19:28
Nashik, Maharashtra:शासनाचे ६७२ कोटींच्या पॅकेजने 'एनडीसीसी' बँक वाचणार शेतकरी सभासदांकडे तब्बल २३०० कोटींचे थकीत कर्ज असल्याने अडचणीत आलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला शासनाने ६७२ कोटी भाग भांडवल मंजूर केल्याने बँकेला मोठा दिलासा मिळालाय... यामुळे बँकेला मिळालेला रिझर्व्ह बँकेचा परवाना वाचणार आहे. ही रक्कम बँकेने इतरत्र गुंतविल्यास बँकेला वर्षाला ५० कोटींचे व्याज मंजूर झालेल्या या रकमेतून मिळेल. गेल्या चार वर्षापासून भाग भांडवल मंजुरीसाठी बँक प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. जिल्हा बँकेस यंदाच्या आर्थिक वर्षात ३३६ कोटी आणि पुढील आर्थिक वर्षात ३३६ कोटी वितरित करण्यास काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीये...राज्यात ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत असून त्यांपैकी २४ बँका नफ्यात आहेत. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, धाराशिव, बुलढाणा, नागपूर व वर्धा या सात ठिकाणांच्या जिल्हा बँका तोट्यात आहेत. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी नाशिक जिल्हा बँकेस भाग भांडवलाची पूर्तता करण्यासाठी अर्थसाहाय्य मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. नाशिक जिल्हा बँकेचे तत्कालीन प्रशासक प्रतापसिंग चव्हाण, विद्यमान प्रशासक संतोष बिडवई यांनी जिल्हा बँकेला अर्थसाहाय्य मंजूर करावे, अशी मागणी सातत्याने केली होती.....
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 12, 2025 03:17:43
Pune, Maharashtra:पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी डॉ. विद्या कावरे यांची निवड झाली आहे नुकताच कावरे यांनी 11 विरुद्ध 6 मतांनी विजय संपादन करत नगराध्यक्ष पदाला गवसणी घातली आहे...डॉ.कावरे या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्या निष्ठावान कार्यकर्त्या मानल्या जातात...त्यांच्या विजयाने खा. लंके यांच्या नेतृत्वावर 11 नगरसेवकांनी शिक्कामोर्तब केले आहे...नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या उपस्थितीत सोमवारी विशेष सभा पार पडली यावेळी हात वर करून झालेल्या या निवडणुकीत डॉ. कावरे यांना 11, तर विरोधी नगरसेवक अशोक चेडे यांना 6 मते मिळाली...या राजकीय घडामोडीत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मतदान करताना पक्षनिष्ठा दाखवली...दरम्यान उद्या डॉ.कावरे या खा.निलेश लंके यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारणार आहेत.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 12, 2025 03:04:21
Vasai-Virar, Maharashtra:वसईत रेती चोरांचे धाबे दणाणले खाणीवडे, वैतरणा रेती बंदरात महसूल विभागाची मोठी कारवाई सक्शन पंप, रेती साठा केला उध्वस्त अँकर- वसईत महसूल विभागाने रेती चोरांवर मोठी कारवाई केली आहे... पालघर जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांच्या आदेशाने वैतरणा व खाणीवडे बंदरात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या बोटींवर धाड टाकून कारवाई करण्यात आली आहे.... जेसीबीच्या सहाय्याने बंदरात साठा करून ठेवलेली ७० ब्रास वाळू पुन्हा खाडीत ढकलण्यात आली आहे...शिवाय बोटिंग चे सक्शन पंप कापून ही कारवाई करण्यात आली.. नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांच्या पथकाने सकाळी ७ वाजता रेती बंदरात घुसून ही कारवाई केली.. या कारवाईची चाहूल लागतच रेती चोर बोटी सोडून पळुन गेल्याने अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...महसूल विभागाच्या या कारवाईमुळे रेती चोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत....
0
comment0
Report
Advertisement
Back to top