Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

शिर्डी में कार्तिकी एकादशी: साईं समाधी पर आभूषणमालाओं के साथ भक्तों की भीड़

KJKunal Jamdade
Nov 02, 2025 05:51:41
Shirdi, Maharashtra
साईबाबांच्या शिर्डीतही कार्तिकी एकादशीचा उत्साह बघायला मिळतोय.. साई समाधीवर विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आली असून साई मूर्तीला सुवर्ण आभूषणासह तुळशी पत्रांची माळ परिधान परिधान करण्यात आली आहे.. साईबाबांचे विठ्ठलरूपी दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे.. साई मंदिरात दररोज 'शिर्डी माझे पंढरपूर' ही आरती संपन्न होत असल्याने विठुरायाचे आणि साईबाबांचे आध्यात्मिक नाते जपण्याचे काम आजही साई संस्थानकडून केले जाते आहे..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 02, 2025 14:00:23
Dhule, Maharashtra:शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर न टाकणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे. निसर्गाचा लहरीपणा हा शेतकऱ्यांसह महाराष्ट्राला अडचणीत आणत असून ज्या ज्या ठिकाणी अवकाळी मुळे नुकसान होते त्या त्या ठिकाणी पंचनामा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याऋंही मंत्री रावल यावेळी म्हणाले. रोजच पाऊस पडत असून या पावसामुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झाल्याचाही ते यावेळी म्हणाले. दरम्यान धुळे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश आपण प्रशासनाला दिले असून पंचणण्यांचे प्रस्ताव राज्य शासनाला पाठवून तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याचंही मंत्री रावल यांनी यावेळी स्पष्ट केला आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 02, 2025 13:54:03
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 02, 2025 13:49:41
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जत में भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे डिजिटल फलक आले फाडण्यात,आक्रमक पडळकर समर्थकांनी केला रस्ता रोको आंदोलन. जत शहरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून करण्यात आलेले विकास कामांची माहिती देण्यात येणारे डिजिटल फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.दरम्यान अज्ञातांकडून हे डिजिटल पोस्टर फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.या घटनेनंतर आक्रमक झालेल्या पडळकर समर्थकांनी जत शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन करत निषेध नोंदवला आहे. विजापूर-गुहागर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केला.त्यामुळे काही काळ या ठikाणी वाहतूक ठप्प झाली होती.पोलिसांना निवेदन देत डिजिटल फलक फाडणारेच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी जत मधील राजारामबापू साखर कारखान्याचा नाव फलक बदलण्याची घटना घडली होती.यामुळे जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर असा नवा संघर्ष निर्माण झालेला असताना पडळकरांचे डिजिटल फलक फाडण्यात आल्याने आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 02, 2025 13:32:19
Chendhare, Alibag, Maharashtra:ते केवळ दिवाळी सणासाठी एकत्र आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा खुलासात.... कर्जत मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र... सोशल मीडियावर फोटो व्हायरल... अँकर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कर्जत तालुक्यात शिवसेना ठाकरे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरे गटाचे नितीन सावंत यांची एकत्रित बैठकही झाली त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र हे लोक दिवाळी सणानिमित्त एकत्र आल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केलाय. दिवाळी साठी सगळे एकत्र येतात तसे ते एकत्र आल्याचं तटकरेने सांगितलं. या मुद्द्यावर अधिक बोलणे त्यांनी टाळलं.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 02, 2025 13:16:37
Beed, Maharashtra:बीड:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंडे-धस संघर्ष Anc: मंत्री पंकजा मुंडे यांनी आष्टी मतदारसंघात लक्ष देण्याची भूमिका जाहीर करून आमदार सुरेश धस यांना आव्हान दिले. दरम्यान यालाच आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या राज्याच्या मंत्री आहेत. त्यांना काय लक्ष घालायचं ते घालू द्या. आम्ही कुठे काय म्हणतो. अस म्हणत मुंडे धस संघर्षावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी मध्ये दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात आष्टी मतदारसंघात मी स्वतः लक्ष घालणार असे जाहीर केले. मुंडेंच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा मुंडे धस संघर्ष दिसून आला. केज आणि आष्टी मतदार संघात आमचे जिल्हा परिषदेचे जास्त सदस्य आहे. मला कुणाचीही एलर्जी नाही. मात्र आष्टीत आमच्याच माणसावर अटॅक केला जातो. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धस यांना लक्ष केले. साऊंड बाईट: पंकजा मुंडे दरम्यान पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाष्य करत आमदार धस यांनी त्या राज्याच्या मंत्री आहेत. त्यांना काय लक्ष घालायचं ते घालू द्या.. आम्ही कुठे काय म्हणतो.. असा टोला लगावला. आष्टी मध्ये आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान धस यांनी मुंडेंना हे प्रत्युत्तर दिले. बाईट:सुरेश धस
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 02, 2025 13:02:36
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 02, 2025 13:01:04
Dhule, Maharashtra:नंदूरबार शहरातील उपनगरच्या परिसरात असलेल्या गणेश नगर येथे रिजवान पिंजारी अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा काळा बाजार होत असते याची माहिती नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा मिळाली असता सापळा रचत २० सिलेंडर, एक इलेक्ट्रिक मोटर, दोन वजन काटे यासह इतर साहित्य असा सुमारे ८५ हजार दोन रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी एका संशयितांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील प्रकाश रोडवर मशिदीसमोरील गल्लीतील रिजवन पिंजारी यांच्या राहत्या घरात घरगुती गॅस रिपेरिंग केला जात होता, विना परवाना घरगुती वापराचा गॅस हा रबरी नळी जोडून त्या रबरी नडीच्या दोन्ही बाजूस गॅस रेग्यूलेटर जोडून त्याचे एक टोक उलटे ठेवलेल्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जात होता त्यामुळे पोलिसांनी त्याठिकाणी धाळ टाकत मोठ्या प्रमाणावर सिलेंडर जप्त केले आहेत.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 02, 2025 13:00:21
Dhule, Maharashtra:माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाजपा प्रवेश केल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात आले असल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून हिना गावित यांच्या सत्कार केला जात आहे. डॉ. हिना गावित यांच्यामुळे भाजपला बळ मिळणार असून, कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्ते येऊन डॉ. हिना गावित यांच्या सत्कार करत असल्याने हिना गावित यांच्या सत्कारामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलाच तापायला सुरुवात झाली असून, या सत्कारामुळे येणारे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील भाजपाला चांगला फायदा होणार आहे. हिना गावित यांच्या भाजपा पक्षप्रवेश झाल्यामुळे भाजपाची ताकद वाढल्या असल्यामुळे जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता आणण्यासाठी हिना गावित यांच्या मोठा वाटा राहणार असल्याने कार्यकर्त्यांकडून देखील हिना गावित यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात झाले आहेत।
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 02, 2025 12:48:43
Dhule, Maharashtra:शहादा पोलिसांनी मोठी कारवाई करत केली असून, विदेशी बनावट दारूच्या गाईच्या गोठ्यावर छापा टाकत पाच लाख ७६ हजार रुपयांची विदेशी बनावटी दारू जप्त केली आहे. शहादा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराच्या आधारावर शहादा तालुक्यातील चिखली बुद्रुक या गावातील सोमेश्वर क्रमसिंग नाईक यांच्या घराजवळील असलेल्या गाईच्या गोठ्यात अवैद्य दारू साठा साठवणूक केलेल्या असल्याची माहिती मिळाली असता, पोलिसांकडून तपासणी केल्यानंतर या ठिकाणी १०० खोके विदेशी बनावट दारू मिळून आले असून, अंदाजे पाच लाख ७६ हजाराच्या मुद्देमाल पोलिसांना घटनास्थळी मिळून आला आहे. घटनास्थळावरून आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपीची चौकशी केली जात आहे हा अवैद्य दारू साठा कुठे पाठवला जात होता याच्या सखोल तपास करून यात जो कोणी दोष असेल त्यावर कारवाई केली जाणार आहे मात्र या कारवाईमुळे अवैद्य दारू बाळगणारे आणि तयार करणाऱ्यांवर चांगलीच चपराक बसली आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 02, 2025 12:48:27
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 02, 2025 12:45:52
Dhule, Maharashtra:तुळशी विवाह निमित्ताने नंदुरबार शहरात पर्यावरण पूरक उपक्रम रबविण्यात आला. शहरातील पटेल वाडी येथे 2 हजार तुळशी रोपांचे वाटप कारण्यात आले. तुळशी विवाह या पवित्र सण असूम, तुलसीचे आयुर्वेदिक महत्व आणण्य साधारण आहे. तुलसी विभाचा हा मुहूर्त पाहून, नंदुरबार शहरात तुलसी रोप वाटपाचा कार्यक्रमाचे हाती घेण्यात आला. पटेल वाडी परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांच्या वतीने २ हजार तुळसीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने नागरिकांमध्ये तुळशीचे महत्त्व रुजवून वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तसेच परिसरातील नागरिकांना प्रत्येकी एक याप्रमाणे तुळशीचे रोपटे विनामूल्य वाटप करण्यात आले.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 02, 2025 12:43:37
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 02, 2025 12:42:44
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगड़मध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्का गोगावले समर्थक सुशांत जाबरे शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेचे दासगाव खाडी पट्टा जिल्हा परिषद मतदार संघातील संभाव्य उमेदवार सुशांत जाबरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. खा. सुनिल तटकरे, स्नेहल जगताप यांच्या प्रमुख उपस्थिती हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. सुशांत जाबरे हे महाडच्या दासगाव खाडी पट्टा विभागातुन रायगड जिल्हा परिषदेसाठी संभाव्य निश्चित उमेदवार होते तर मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे निकटवर्तीय होते. सुशांत जाबरे यांच्या या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे तर मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top