Back
चुनावों में पैसे बाँटने के आरोप: निलेश राणे पर घेराबंदी तेज
UPUmesh Parab
Dec 02, 2025 16:18:28
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग --- दिपक केसरकर
ऑन वैभव नाईक आरोप --- *अत्यंत चुकीचा आणि बेजबाबदार पद्धतीचा हा आरोप आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौरा आटोपून ते सोलापूर दौऱ्याला रवाना झाले. तुम्ही जेव्हा दौऱ्यावर असता तेव्हा कपड्याच्या बॅगा तुमच्या सोबत असणारच.. त्याला पैशाची बाब बोलणं ह्याच्या सारखी चुकीची बाब दुसरी नाही.
*चुकीच बोलून एखाद्याची बदनामी करण अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब आहे*
ऑन एवढ्या बॅग का --- सलग दौरा असल्याने त्यांच्या आणि पीएच्या बॅगा सोबत असणारच..
ऑन मालवण ( निलेश राणे) -- हा प्रकार सगळीकडे सुरू आहे. इकडे सुद्धा काही माणसं बूथ वर पैशाच वाटप करत आहेत. आपल्या प्रकार निवडणुकीत करण चुकीच आहे. ह्याच्यावर नियंत्रण पोलिसांनी केलं पाहिजे मात्र ते निलेश राणेंना कराव लागलं. जेव्हा त्यांनी केलं तेव्हा उलटा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ह्यावर यंत्रणेने नियंत्रण ठेवले पाहिजे..
ऑन आमदार निलेश राणे ठिय्या --- पैसे वाटपाच्या प्रकारावर जलद गतीने ॲक्शन घेतली तर आमदारांना ठिय्या करावा लागणार नाही. ताबडतोब ॲक्शन झाली असती तर हे प्रकार थांबले असते.
ऑन नवनाथ बन --- हा चुकीचा आरोप आहे आम्ही युतीसाठी सर्वतोपरी तयारी दर्शवली होती. भाजपकडून काही रिस्पॉन्स मिळाला नाही. आणि त्यामुळेच युती तुटली.
ऑन भाजपा पैसे वाटप -- ही प्रथा सुरू करणे चुकीचे आहे ही लोकशाहीला घातक आहे
ऑन निलेश राणेंचा वापर केला जातोय ( नितेश राणे) -- वापर केला जातो अस म्हणणं चुकीच आहे. निलेश राणे आपल्या पद्धतीने निवडणूक लढवत आहेत आणि भाजप आपल्या पद्धतीने निवडणूक लढवत आहे यात वापर केल्याचा काही प्रश्न उद्भवत नाही
ऑन मतदार प्रतिसाद -- मतदानाचा टक्का वाढतोय ही चांगली बाब आहे एवढा जास्तीत जास्त मतदान होईल तेवढं लोकशाहीला पूरक होईल
ऑन पैसे वाटप -- आम्ही हतबल होण्यापेक्षा या सगळ्याला कसं तोंड द्यायचं हा प्रश्न आहे. त्यामुळे निवडणुकांचं खरं चित्र रिफ्लेक्ट होत नाही.
ऑन भाजपा प्रवेश -- हा आरोप चुकीचा आहे चांगले संबंध असणे याचा अर्थ त्या पक्षात जाणं असा होत नाही
ऑन उद्धव ठाकरे ( शाहजी बापू ) -- शहाजी बापू पाटील आजारी आहेत आजारी माणसावर अशा पद्धतीने बोलणं चुकीचं आहे
निलेश राणे ( ठाकरे गट कौतुक ) --- ज्यांनी पकडून दिलं त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं हे चुकीचं आहे असं सगळेच म्हणतात.
ऑन उद्धव ठाकरे आवाहन --- ते किती काळ चुकीचं बोलत राहणार याला सुद्धा मर्यादा आहेत खरी शिवसेना कोणती हे महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिला आहे. आमचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत त्याचा त्यांनी बोध घ्यावा आणि आपलं असलं बोलणं थांबवावं
ऑन भाजपा छोटे पक्ष संपवन --- यावर आता बोलणं उचित नाही मुंबईची निवडणूक झाली त्यानंतर त्या वर बोलणं उचित ठरेल.
ऑन नितेश राणे -- आता सुद्धा भूत वर पैसे वाटले जात आहेत पोलिसांना आम्ही कळवला आहे आता त्यांनी येऊन हे थांबवलं पाहिजे.
ऑन पैसे वाटप का केलं जातं -- निवडणुका जिंकण्यासाठी केलेला हा प्रकार आहे. भाजपचा उद्देश काय आहे हे सर्वांना माहीत आहे काही नेतृत्व संपवण्यासाठी वारे माप पैशाचं वाटप केले जात आहे.
ऑन आशिष शेलार -- मी आरोप केलेले नाहीत आरोप केलेले असतील तर योग्य ती उत्तर दिली पाहिजेत
ऑन सावंतवाडी प्रतिष्ठा -- लोकप्रियतेप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजेत पैसे वाटून निकाल तयार करणे हे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे खरा निकाल असं म्हणता येणार नाही लोकांनी निर्भयपणे मतदान करावे
देवाची कृपा असेल तर निश्चित आमचाच गुलाल उडेल
एवढे पैसे वाटल्यानंतर मनात धाकधूक निर्माण होतेय
आता जो बदल होतोय तो लोकशाही दृष्टीने पूरक नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 16:30:420
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 16:30:290
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 16:30:140
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 16:19:0670
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 16:18:44107
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 16:04:20136
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 16:04:0927
Report
MNMAYUR NIKAM
FollowDec 02, 2025 16:03:0632
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 02, 2025 15:45:16133
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 02, 2025 15:05:11137
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 02, 2025 14:36:19163
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 02, 2025 14:21:50Nandgaon Rural, Uttar Pradesh:नांदगाव ( नाशिक ) : - नांदगाव शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये उशिरा पर्यंत मतदान सुरू... - मतदानासाठी अजूनही गर्दी सुरू...
95
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 02, 2025 14:09:22143
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 13:33:01138
Report