Back
संजय राऊत का धमाकेदार आरोप: महाराष्ट्र का 10 लाख करोड़ कर्ज राज?
APAMOL PEDNEKAR
Sept 16, 2025 06:17:16
Mumbai, Maharashtra
संजय राऊत
*ऑन राज्य सरकार कर्ज*
* गेल्या तीन महिन्यातच जे राज्य 24 हजार कोटीचे कर्ज घेत आहे राज्य चालवायला त्या राज्याची अवस्था ही मी म्हणेन नेपाळ सारखी झाली बेरोजगारी आहे विकासाची काम ठप्प आहेत फक्त मुख्यमंत्री यांच्या जवळच्या लोकांकडे एसआरएची काम सुरू आहेत त्यांना काम मिळत आहेत एफएसआय विकला जात आहे त्यातून पैसे मिळत आहेत कबुतरांना दाणे टाकण्याचे काम सुरू आहे नागरी वस्तीमध्ये या पलीकडे महाराष्ट्रात कोणतेही काम चालू नाही
* जात विरुद्ध जात असे भांडण लावून लोकांचे लक्ष विचलित केले जात आहे फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणले जात आहे शिक्षणापासून रोजगारापर्यंत या महाराष्ट्राने या सरकारच्या काळात काय प्रगती केली हा विषय मुख्यमंत्री यांना एकदा जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधला पाहिजे
* इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर दहा लाख कोटींचा वर कर्जाचा डोंगर झाला
* राज्याचे आर्थिक दुरावस्था मी कधीच झाली नव्हती आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार यांच्यावर ते काय भाष्य करणार आहेत का त्यांना आर्थिक सृष्टीचे फार काळजी असते पण स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा हे धोरण आहे मग *देवेंद्र फडणवीस यांचा असेल मुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून अजित पवार असतील आणि दुसरे ते डाकू मानसिंग बसलेले आहेत अमित शहा यांच्या कृपेने हे डाकू मानसिंग ची स्टोरी आहे चंबळ खोऱ्यातून बहुतेक आले आहेत येथे महाराष्ट्र लुटायला*
* काय होणार या महाराष्ट्राचं या महाराष्ट्रातल्या पुढल्या पिढीचं नऊ लाख कोटीचा कर्ज कोणी केलं का झालं तुमच्या योजनांमुळे झालं चारही बाजूने महाराष्ट्र ओरबडला जातो जो पैसा राज्याच्या तिजोरीत त्याला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जात आहे तीन-तीन हजार कोटीचे टेंडर करून हा पैसा लुटला जातो समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग अशा अनेक योजनांची दोन लाख कोटींची काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आली त्याचा कुठे आता नाही कागदावर आहे ठेकेदारांकडून कमिशन घेतलं 25% ही लूट आहे
* एस आर ए मध्ये जाऊन बघा मुंबईच्या एस आर ए मध्ये महिंद्रा कल्याणकर नावाचे अधिकारी बसले आहेत त्यांच्याविषयी रोज एवढी माहिती येते काय करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री एस आर ए प्रकल्प कोणत्या पद्धतीने गरिबांच्या हक्कांवर गदा आणून हा पैसा कुठे जात आहे कोणत्या राजकीय पक्षाकडे जात आहे कोणत्या नेत्याच्या किंवा त्या नेत्याच्या गटाकडे जात आहे याबाबत महाराष्ट्राला आता चिंता लागून राहिली
* आम्ही नेपाळचा संदर्भ दिला की यांना मिरच्या झोपतात मग ते आम्हाला माओवादी आणि नक्षलवादी शरदच नेपाळ असं लुटला राज्यकर्त्यांनी आणि त्यातून तो उद्रेक झाला तो अत्यंत धक्कादायक होता मी त्याचा समर्थन करत नाही पण लोकांच्या संयमांचा बाण इथे तुटत आहे दहा लाख कोटींचं कर्ज या राज्यावर आणि या राज्याला तुम्ही प्रगती पथावरच राज्य म्हणतात अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी आणल्या
* अनेक योजना शेतकरी कर्जमाफी करा म्हणत आहोत पण हे करत नाही आहेत अधिक कर्ज घ्या आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा दहा लाख कोटी कर्ज आहे मग ते 11 लाख कोटी करा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या आहेत एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजाराच्या वरती आत्महत्या होत आहेत मग हे कर्ज आहे दहा लाख कोटीचा कोणाच्या खिशात गेलं शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव तुम्ही देत नाही शेतकऱ्याला हमीभाव देत नाही शेतकरी नुकसान भरपाई देत नाही मग हे कर्ज झालं का कोणासाठी कर्ज घेतलं फक्त लाडक्या बहीण योजनेसाठी कर्ज झाला असेल ते तुमच्या खिशातून द्या मग कारण याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला लाखो असे खातेदार आहेत जे बेकायदेशीर आणि बोगस आहेत जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत हा सगळ्यात जास्त मोठा भ्रष्टाचार मंगल प्रभात लोढा यांच्या कौशल्य खात्याच्या विभागात होत आहे हे माहिती आहे का तुम्हाला बोगस नाव आहेत हजारो आणि लाखो त्यांना या कौशल्य विकास योजनेतून महिन्याच्या महिन्याला पैसे दिले जात आहेत हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत सी लिस्ट मी आजच पाठवली आहे लोढा कडे कोण आहेत आणि सगळ्यात जास्त ओरबाडंन नागपूर आणि विदर्भ मध्ये सुरू आहे आणि हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना हे कौशल्य विकास योजनांचा भ्रष्ट मार्गाने लाभ दिला जातो जसे तुम्ही बोगस स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन द्यायचे स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे झाली तरी पेन्शन लाभ चालू आहे त्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आणि कौशल्य विकास योजना आणि तिसरी एस आर ए योजना याच्यामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार सुरू आहे महाराष्ट्रावर दहा लाख कोटींचं कर्ज झालं याचं कोणाला आश्चर्य वाटणार नाही याला जबाबदार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थात मानसिंग
*ऑन नेपाळ शरद पवार विधान*
* मी तेच सांगत आहे तुम्ही शरद पवार साहेबांना नक्षलवादी किंवा माओवादी ठरवाल का आम्ही जेव्हा असा इशारा देतो जेव्हा बाजूच्या देशात किंवा बाजूच्या राज्यात काय चाललं आहे ते पहा त्यांची लोक आमच्या वरती जाऊन गुन्हे दाखल करा असा आग्रह भारतात हे माओवादी विचारांचे आहेत नक्षलवादी विचारांची आहेत आम्ही कोणत्याही विचाराचे नाही आम्ही महाराष्ट्र धर्माचे पालन करणारे मराठी माणस आहोत आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही शिवसैनिक आहोत पण शरद पवार यांनी जो काही विचार मांडला तो आमचा विचार आहे बाजूला काय चाललं आहे ते पहा मग तुम्ही शरद पवार यांना माओवादी म्हणाल का किंवा नक्षलवादी सांगा ना
* अत्यंत योग्य भूमिका पवार साहेबांची आहे जी आमची आहे महाराष्ट्राचा लुटला जात असेल अशा प्रकारे आम्ही शेतकऱ्या आणि कष्टकरी यांची लूट होणार असेल सरकारी पेजवली लुटालाही शिल्लक नाही कर्ज काढले जातात ते ही लोकं जात आहे राज्य प्रगतीपथावर हे या राज्यात गुंतवणूक येत आहे कुठे आहे गुंतवणूक
* उद्या नरेंद्र मोदी 75 वा वाढदिवस साजरा करत आहे कर्जाच्या पैशातून सरकार साजरा करत आहे अनेक योजनांच्या माध्यमातून काय गरज काय
* देशभरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे करण्याची गरज काय जनता साजरा करेल ना जनतेला हवा असेल तर पंडित नेहरूंचा वाढदिवस जनता साजरी करते महात्मा गांधींचा वाढदिवस जनता साजरी करते बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस जनता साजरी करते अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवस जनता साजरी करते मग नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सरकारने का साजरा करावा सरकारच्या पैशाने मोदींनी हे थांबवलं पाहिजे महाराष्ट्र कर्जबाजारी असताना हे करू नये कर्जबाजारी असताना मोदींच्या वाढदिवसाचा केक कापून हा आर्थिक अपराध आहे आर्थिक गुन्हा आहे
*ऑन मोदी 75*
* मोदींच्या अस्तित्वाची दखल सध्या देश घेत नाही आहे सुरुवातीला मोदी काहीतरी करतील किंवा मोदींच्या रूपाने आशाची किरण दिसले म्हणून लोकांनी मतदान केलं नंतर बोट चोरी करून निवडणुका जिंकला बसच्या मार्गाने जिंकल्या त्याच्यामुळे मोदी हे काय लोकांच्या मताने निवडून झालेल्या पंतप्रधान नाही मोदी हे लोकनेते नाही मोदी हे भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने फुगवलेल्या फुगा आहे अनेक नेते त्यांचे भाजपचे त्याच्यामुळे मोदी यांनी कोणती घोषणा केली मोदींनी घोषणा केली पाकिस्तान ताब्यात घेऊ घेतला का ट्रम्प देतो तरी मोदी बोलत नाही ट्रम्प रोज दम देतो असा पंतप्रधान या देशाला लाभला हे देशाचा दुर्भाग्य एवढेच मी सांगेन
* 26 महिलांचा सिंदूर पुसला गेला आणि नरेंद्र मोदी पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायला लावतात आमच्या क्रिकेटपटूंना अशा पंतप्रधान विषयी आम्हाला असता का असावी आणि कोणालाही असू नये भारतीय जनता पक्षाचा हा एक व्यापारी डाव आणि व्यापारी खेळ आहे आणि त्या खेळातले सीओ हे नरेंद्र मोदी आहेत
*ऑन भारत-पाक सामना*
* एक लक्षात घ्या पाकिस्तानच्या कप्तान यांच्याबरोबर आमच्या लोकांनी हस्तालोंदन केलं नाही म्हणून पापक शालन होत नाही तुम्ही त्या मैदानावर खेळलात तुम्ही पाकिस्तानच्या इतर पदाधिकाऱ्यांची हात मिळवणे करताना आम्ही पाहिलं हे ढोंग कसली करत आहात मोदींसारखी हे ढोंग मोदींना शोभतात सूर्यकुमार यादव जो कोन कॅप्टन आहे तुम्ही म्हणताना खेळ आहे खेळण्यासारखा मग का खेळला नाही तुमच्यावर कोणता दबाव होता एक तर तुम्हाला खेळायचं नव्हतं तुम्ही मैदानातून बाहेर पडला पाहिजे होतं
* तुमचे त्या सामन्याचे पैसे गेले असते भारतीय संघाच्या नोकरदार जय शहा यांचा नोकरदार संघ आहे त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची थोडी तरी ठिणगी असती तर ते मैदानात गेले नसते हात नाही मिळाला मी पाहिलं नाही ही असे उदाहरण कारणे देऊ नका तुम्ही शेण खाल्ला आहे आणि तुमच्या तोंडाला शेणाचा वास येत आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 07, 2025 08:54:070
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 08:38:33109
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 08:38:0343
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 07, 2025 08:31:0743
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 08:19:36107
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 07, 2025 08:19:13139
Report
ABATISH BHOIR
FollowDec 07, 2025 08:01:1795
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 07:50:49170
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 07, 2025 07:30:11114
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 07, 2025 07:02:56183
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 07:02:36170
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 07, 2025 07:02:15209
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 07, 2025 06:31:35153
Report
JMJAVED MULANI
FollowDec 07, 2025 06:31:12159
Report
JMJAVED MULANI
FollowDec 07, 2025 06:16:22133
Report