Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नंदिनी नदी किनारे एसटीपी प्लांट के विरोध में प्रदर्शन, मुख्यमंत्री नाशिक दौरे की तैयारी
SGSagar Gaikwad
Nov 12, 2025 09:17:27
Nashik, Maharashtra
नंदिनी नदीच्या परिसरात एसटीपी प्लांट च्या कामाला स्थानिक नागरिकांचा विरोध मागणी मान्य व्हावी यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा आगामी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर येणार आहे...तब्बल साडेपाच हजार कोटी रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी ते उपस्थित असणार आहे... मात्र नाशिकच्या टाकळी परिसरात असलेल्या नंदिनी नदी परिसरात नव्याने चौदाशे कोटी रुपयाचा एसटीपी प्लांट तयार करण्यात येणार आहे.. याला स्थानिक नागरिकांकडून विरोध होताना पाहायला मिळतोय... या संदर्भात नंदनी नदीच्या किनारी आंदोलकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे... एसटीपी प्लांटला विरोध नाही मात्र एसटीपी प्लांट तयार करत असताना नंदिनी नदीच्या प्रवाहाचा वापर न करता थेट पाईपलाईन द्वारे एसटीपी प्लांट ला पाणी द्यावं अशी प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन करण्यात येते. उद्या मुख्यमंत्री नाशिकला येणार असून यावेळी घेराव घालून त्यांना निवेदन देण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी केलाय.... यासंदर्भात आंदोलन करते काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल दिवे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Nov 12, 2025 10:47:56
Chendhare, Alibag, Maharashtra:तर देशाचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही ...... बच्चू कडू यांनी व्यक्त केली भीती ...... पुणे जमीन खरेदी प्रकरणी बच्चू कडू यांचे महत्त्वाचं विधान ...... मोठ्यांना वेगळा न्याय आणि लहानांना वेगळा न्याय असं चालणार नाही ...... पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन प्रकरणी प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. जर असं होत गेलं तर देशाचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही अशी भीती बच्चू कडू यांनी व्यक्त केलीय. कायदा हा सर्वांना सारखा आहे हे देशाला सांगण्याची गरज आहे आणि सरकारने तसं वागणं गरजेचं आहे. मोठ्यांना वेगळा न्याय आणि लहान लोकांना वेगळा न्याय असं झालं तर देशाचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही असं बच्चू कडू म्हणाले.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 12, 2025 10:41:11
Satara, Maharashtra:सातारा: बनावट इंस्टाग्राम अकाउंट वरून महिला असल्याचे भासवून फलटण येथील युवकाला चॅटींग द्वारे वीर धरण परिसरात बोलावून तीन जणांनी मारहाण करत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर संबंधित युवकाने शिरवळ पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली असता अवघ्या एक तासात शिरवळ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत यामधील तीनही आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी युट्युबर किरण मोरे, सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेला संशयित विशाल जाधव आणि मनसे तालुकाध्यक्ष इरफान शेख यांचा समावेश आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपींकडून याआधीही असे प्रकार घडले असल्यामुळे पोलिसांनी कोणाची तक्रार असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 12, 2025 10:31:32
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जगणं बिबट्याने केलं अवघड... आधीच जीव वाचवण्याची भीती आता त्यात लग्न जुळेना.. नोकरी निमित्ताने शहरी भागात असलेल्या नागरिकांनी बिबट्यामुळे गावाकडे फिरवली पाठ... चिमुकले हि मामाचे गाव विसरले..... पोरं करती-धरती झालीयेत, आता कधी एकदा त्यांच्या डोईवर अक्षदा पडताहेत. या आतुरतेनं एकीकडं आई-वडिलांचा - जीव व्याकुळलाय तर दुसरीकडे ही पोरंही लग्नाची स्वप्न रंगवतायेत खरः पण दुर्दैवानं लाल रक्ताला चटावलेले बिबटे तरुणांच्या या गुलाबी स्वप्नांचाही फडशा पाडताहेत तर शहरी भागात नोकरी व्यवसायानिमित्त असलेले नागरिकही आपल्या चिमुकल्यांना मुलांना गावाकडे आजी-आजोबांकडे मामाच्या गावाला पाठवायला ही नकार देऊ लागलेत त्यामुळे या भागातील नागरिकांचे बिबट्यामुळे जगणं अवघड होऊन बनलंय... पोरं करती-धरती झालीयेत... बिबट्यांच्या दहशतीचा परिणाम सामाजिक जीवनावरही झाला आहे. गावांतील शेकडो तरुण 'वेल सेटल' असूनही त्यांना केवळ बिबट्यांच्या दहशतीमुळे मुली देण्यास नकार दिला जात आहे. सोयरा मिळेना म्हणून या तरुणांचे आई-वडील चिंताग्रस्त आहेत. तर गुलाबी स्वप्नांचा चक्काचूर होत असल्याने तरुणांना निराशेने ग्रासले आहे. आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेडचे गावकरी चिंतेत मामाचे गावही नको रे बाबा! शाळेला उन्हाळा किंवा दिवाळीची सुट्टी लागली की बच्चे कंपनी मामाच्या गावाची वाट धरतात. कधी एकदा मामाचा गाव गाठतोय, असं त्यांना होतं. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे या गावांची भाचे मंडळी मामाचा गाव नको म्हणू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ही वास्तवता समोर आली. आजि बाई वन मंत्री गणेश नाईकांनी हि मान्य केलं असून बिबट्याच्या दहशतीपासून या परिसराची सुटका व्हावी यासाठी वन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी Zee 24 तास शी बोलताना सांगितलंय... गणेश नाईक (वनमंत्री). End Vo... बिबट्याच्या या सर्व भयावह परिस्थितीने लग्नाची स्वप्न रंगवणारे तरूणांच्या स्वप्नांची भविष्याची राख रांगोळी केलीय तर अनेकांचे जीव ही घेतलेत त्यामुळे बिबट्याच्या या दहशतीतून नागरिकांची सुटका कधी होतेय हे येत्या काळात पहाणं महत्त्वाच असणार आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 12, 2025 10:28:47
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 12, 2025 10:28:32
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 12, 2025 10:27:56
Thane, Maharashtra:आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर ऑन ठाणे जिल्हा रुग्णालय पाहणी दौरा ठाण्याचे सुपुत्र शिवसेनेचे मुख्य नेते , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून बघितला जातो... ठाण्यातील सिविल हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल या कामाची गती आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली, अतिऑय वेगाने हे काम सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यावर आहे. एम.एस.सी.बी चा काम आणि बाकीच्या शेवटच्या टप्प्यातील कामाची पूर्तता लवकरात लवकर व्हावी याच उद्देशाने आज भेट दिली आहे. ठाणे जिल्ह्यातून अनेक हायवे जातात, गुजरातला जाणारा ,कोकणला जोडणारा त्यासोबत लोणावळा पुण्याला जाणाऱ्या सगळ्याच रस्त्यापासून साहजिकच एक्सीडेंट च्या वेळेस हेलिपॅड उपलब्ध असावं त्यासाठी ठाणेकरांची इच्छा होती. त्यामुळे हेलिपॅड उभारण्यात आलेला आहे. येणाऱ्या काळात भविष्यात याचा सगळ्यांना उपयोग होणार आहे. मुळातच ३५० बेडच हे पूर्वीचं हॉस्पिटल होतं. आता ९०० बेड वर काम करत आहे. सगळ्या गोष्टीची पूर्तता निश्चितच होणार आहे. हे देखील साहेबांची संकल्पना आहे. सुपर स्पेशलिस्टच्या माध्यमातून शहरातले नव्हे तर जिल्ह्यातल्या लोकांना रेफरन्स जे काही सर्विसेस आहेत. त्यामुळे आज देखील सगळ्यांना मुंबईला जावं लागतं. या सगळ्या गोष्टी याच ठिकाणी येऊन इथेच थांबतील त्यामुळे सगळ्यांना चांगल्या पद्धतीने फायदा होईल. या उद्देशाने सुपर स्पेशालिस्ट सिविल हॉस्पिटलची आपण सुरुवात करतोय.. या हॉस्पिटलचा खऱ्या अर्थाने इथल्या लोकांना उपयोग होणार आहे. या ठिकाणी नरसीसचे देखील कोर्सेस आहे. आता बीएससी नरसिंगचे मान्यता मिळाली आहे. हे देखील काम जोरात सुरू आहे. ९०० बेडचं हॉस्पिटलमुळे साहजिकच आहे. मेडिकल कॉलेजच साठी प्रस्ताव दाखल करू शकतो.आवश्यक आहे ते सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत. ते सगळं पूर्ण करण्यासाठी काही हरकत नाही. ऑनआमदार अपात्र संदर्भात सुप्रीम कोर्ट सुनावणी हा विषय महत्त्वाचा नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेने कालच्या निवडणुकीमध्ये ज्याच्याबद्दलची पात्रता अपात्रता निश्चित केली पाहिजे. तांत्रिक बाजू ला ठेवूया महाराष्ट्राच्या जनतेने दिल्या कौल मोठा आहे. माननीय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली या पद्धतीने महायुतीला अबूत्वपूर्व यश मिळालं आहे. यामधून सगळ्यात पात्रता आणि अपात्रता निश्चित झालेला आहेत. ऑन कोल्हापूर दोन्ही राष्ट्रवादी निवडणुकीत एकत्र हे स्थानिक पातळीवरचे निवडणुका आहेत. त्या त्या ठिकाणी चे मतप्रवाह असतात. त्यातील एकाच वेळात युती होत असेल. स्थानिक नेते एकामेकांच्या समन्वयाने काम करतील आमची भूमिका अशी आहे की महायुतीमध्ये सर्वत्र एकत्र समन्वय असावा. महायुतीच्या माध्यमातून नगरपालिका असेल सर्व ठिकाणी होणाऱ्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असेल त ठिकाणी महायुतीचा झेंडा फडकवावा.. हा त्यांच्या अजेंडा आहे. त्यांनी ठरवलेला विषय आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही महाराष्ट्राच्या सत्तेत एकत्रित आहोत.महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या ५ ते १० वर्षात महायुतीच्या सरकार काम करत आहे. अजूनही पुढे चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी शिवसेना ,भाजप आणि राष्ट्रवादी हे पुढे देखील निश्चित सुरू राहणार आहे. स्थानिक पातळीवरती मत मतांदर असतात. युतीमध्ये सगळ्यांनी समन्वयांनी काम केलं पाहिजे. या मताने आम्ही सगळेजण ठाम आहोत. महायुतीची सत्ता आणण्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न राहील. ऑन कोल्हापूर बिबट्या प्रकरण शहरामध्ये बिबट्या घुसला आणि तीच परिस्थिती पुण्यामध्ये देखील होती. हे थोडासा चिंताजनक विषय आहे. सुप्रीम कोर्टाच्या गाइडलाईनस आणि पर्यावरण वाल्यांच सल्ला मत त्या सगळ्यांबाबत माणसांचा जीवन सुरक्षितता ठेवणं हे महत्त्वाचं आहे. हे सगळ्या गोष्टी कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊ. काही गोष्टींमध्ये आपण पुढे जाण आवश्यक आहे. अन्यथा जे प्राणी जंगलात आहे ते माननीय वस्तीत जर आले ते त्याचा उदाहरण दोन्ही ठिकाणी आपण बघितलेला आहे. अशा गोष्टी खूप त्रासदायक आहे. ऑन दिल्ली ब्लास्ट दिल्लीचा प्रकार बघितल्यानंतर साहजिकच आहे. सर्वत्र ठिकाणी अशा प्रकारची घटना घडू शकतात. या प्रकाराचे संकेत असल्याने महाराष्ट्र मध्ये देखील सुरक्षा वाढलेली आहे. सरकारने दिलेल्या सूचनाबाबत योग्य ते काम करत आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 12, 2025 09:54:38
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:भाईचा बड्डे...\n\nपोलीस अधीक्षकांनी सांगितली.. कसे घडला डबल मर्डरचा थरार\n\nस्लग - थरकाप उडवणारया डबल मर्डरचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर..\n\nअँकर - संपूर्ण सांगली शहराला हादरवून टाकणाऱ्या दलित महासंघ अध्यक्ष उत्तम मोहितेसह झालेल्या डबल मर्डरचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे. वाढदिवसाच्या दिवशीच मुळशी पॅटर्न स्टाईलने उत्तम मोहिते यांचा निर्घृण खून करण्यात आलाय.खुनाच्या वेळी नेमका काय प्रकार घडला,कशा पद्धतीने हल्लेखोरांनी उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला चढवला,या सर्व घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे.अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारीं ही घटना आहे.या घटनेमध्ये उत्तम मोहितेंवर हल्ला करणाऱ्या पैकी एका हल्लेखोराचा देखील मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,या डबल मर्डरच्या घटनेने सांगली हादरुन गेली आहे.
52
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 12, 2025 09:50:04
Shirdi, Maharashtra:पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट ऑन बिबट्या दहशत बिबट्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण... अहिल्यानगर जिल्ह्यात 1100 पेक्षा जास्त बिबटे... त्यांची उत्पत्ती वेगाने वाढत आहे.. अनेकांवर हल्ल्याच्या घटना... जिल्ह्यात रेस्क्यू सेंटर सुरू केले मात्र संख्या कमी.. फक्त रेस्क्यू सेंटर उभारून चालणार नाही.. नविन तंत्रज्ञानाच्या आधारे उपाययोजना करणार... रेस्क्यू सेटरमध्ये तीनशे बिबटे ठेवण्याची व्यवस्था करणार... जिल्ह्यात 25 बिबटे जेरबंद केलेले आहेत... पिंजऱ्याची संख्या वाढवणार... तातडीने पावलं उचलले जाणार... कायद्याच्या उडचणीमुळे वनविभागाला बंधने.. हतबल झाले अशी अवस्था आहे... शेड्युल एक मधून काढण्याचा प्रस्ताव.. वाघांची संख्या मर्यादित होती म्हणून हे केलं गेलं.. मात्र बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय... एआयच्या माध्यमातून बिबट्यावर नजर ठेवून अलार्म वाजेल अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न... शेड्युलमधून काढलं पाहीजे हि मागणी वाढत चाललीय आम्हीही त्याचा पाठपूरावा करू.... राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया... ऑन केंद्रीय जलशक्ती मंत्रालय गौरव केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जलसंपदा विभागाचा गौरव केलाय याचे अतिशय समाधान... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रलंबित प्रकल्पांना गती देऊन समोर आणलं आणि पूर्ण केलेत... जलसंपदा खात्याने फार मोठी उभारी घेतलीय... महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो मोदींजिनी केलाय त्याला या पुरस्कारामुळे अतिशय चांगल बळ मिळतंय.. मी अतिशय समाधानी , मुख्यमंत्री महोदय यांचं मनापासून अभिनंदन करतो... ऑन अंजली दमानिया अजित पवार राजीनामा मागणी राजीनामा कोणी मागावा किंव्हा मागू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न... राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः चौकशीचे आदेश दिले आहेत.. मला असं वाटतं चौकशी होऊ दिली पाहिजे... अंजली दमानिया यांच्या मागणीवर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया.. ऑन संभाजीनगर मॅप व्हायरल ही बाब अतिशय गंभीर... काही हितसंबध असणारे अधिकारी स्थानिक लोकांना हाताशी धरून अगोदरच जमीन घेणे , भूसंपादन करताना भाव वाढवून मिळणे किंवा कमी भाव देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणे अश्या तक्रारी त्यावेळी सुद्धा आल्या... मी विरोधीपक्षनेता असताना समृद्धी महामार्गाच्या कामावेळी मराठवाडा येथे अशा तक्रारी माझ्याकडे देखील आल्या होत्या , याबाबत चौकशी सुरू आहे.. पुणे संभाजीनगर महामार्ग हा विदर्भाला जोडणारा रस्ता , ट्रॅफिकची सोय गतीने व्हावी.. हा रस्ता नॅशनल हायवेकडे आहे , आणि रस्ता जरी नॅशनल हायवे करीत असले तरी भूसंपादन मात्र राज्य सरकार करत... त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना करू असे जमिनीचे व्यवहार होत असतील तर आपण चौकशी करू... पुणे संभाजीनगर महामार्गाचा मॅप वायरल होत असल्याबाबत या प्रकरणाची चौकशी करू... राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया...
41
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 12, 2025 09:46:19
Jalna, Maharashtra:जालना :ब्रेकिंग जालन्यात शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश खुद्द अंबेकरांनीच दिली माहिती महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा पक्षाला मोठा धक्का एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार आज जाहीर पक्ष प्रवेश अँकर- जालन्यात शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का बसला असून जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सायंकाळी शहरातील मामा चौकात एकनाथ शिंदेंचा मेळावा होणार असून या मेळाव्यात अंबेकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे.. भास्कर अंबेकर मागच्या 14 वर्षांपासून शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख आहेत.. जालना नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदही त्यांनी भुषवलं.. मात्र आता पक्षात वेळो वेळी अवमान केला गेला.. मान सन्मान राहिला नाही.. सुख:दु:खालाही पक्ष नेतृत्व विचारत नाही. जिल्ह्यात पक्षप्रवेशाचा दौरा असतानाही कळवलं जात नाही. त्यामुळं याची खंत अंबेकर यांनी व्यक्त केलीये. त्यामुळं आज हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अंबेकर शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत.. त्यामुळं महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना शिंदेंनी मोठा धक्का दिलाय..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 12, 2025 09:44:27
Solapur, Maharashtra:सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भीमशक्ती सामाजिक संघटना आक्रमक - सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भीमशक्ती सामाजिक संघटना आक्रमक - छत्रपती संभाजी महाराज चौक के रास्ता रोको आंदोलन करते अजित पवार यांच्या विरोधात निदर्शन - मुंढवा येथील पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरण संदर्भात भिम शक्ती सामाजिक संघटने आक्रमक भूमिका - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा देण्याची मागणी.. - भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. - छत्रपती संभाजी महाराज चौक येथे भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या आंदोलनामुळे वाहतुकीचा झाला होता खोळंबा..
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 12, 2025 09:43:37
Washim, Maharashtra:एक महिला शेतकऱ्याने खरीप हंगामात नव्या पिकाचा यशस्वी प्रयोग करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चियाची लागवड साधारणतः रब्बी हंगामात केली जाते, मात्र उकळी पेन येथील सरला देवराव अंभोरे यांनी खरीप हंगामात चिया पिकाची लागवड करून नवा आदर्श निर्माण केला आहे. आत्मा प्रकल्पाच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४-२५ मध्ये अर्ध्या एकरावर प्रायोगिक लागवड करण्यात आली होती. उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याने सरला अंभोरे यांनी यावर्षी तीन एकरांवर चिया पिकाची व्यावसायिक लागवड केली आहे. सध्या पीक चांगल्या वाढीच्या अवस्थेत असून, एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे. चिया हे प्रथिने, ओमेगा-३ फॅट ऍसिड आणि फायबरयुक्त आरोग्यदायी तेलबिय पीक आहे. साधारणपणे रब्बी हंगामात घेतले जाणारे हे पीक अंभोरे यांनी खरीप हंगामात नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर घेतले असून, कमी खर्चात अधिक उत्पादनाचा अनुभव त्यांनी मिळवला आहे. अंभोरे यांचा हा यशस्वी प्रयोग जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, कृषी विभागानेही त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. भविष्यात वाशीम जिल्ह्यात चिया लागवडीचा व्याप वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाईट: सरला देवराव अंभोरे, महिला शेतकरी
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 12, 2025 09:42:54
Akola, Maharashtra:राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीनेही आपले उमेदवार घोषित केले असून नगराध्यक्ष पदासाठी चार ठिकाणांहून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे .. १) बार्शीटाकळी नगरपंचायत - अख्तर खातून अलिमोद्दीन २) मूर्तिजापूर नगरपरिषद - शेख इम्रान शेख खलील ३)अकोट नगरपरिषद - स्वाती मंगेश चिखले ४) तेल्हारा नगरपरिषद - विद्या सिद्धार्थ शामस्कार या घोषणेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पक्षाने स्थानिक पातळीवर जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रचाराला गती देण्याची तयारी सुरू केली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top