Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur444001
नागपुर विश्वविद्यालय में पहली महिला कुलगुरु नियुक्ति: डॉ. मनाली क्षीरसागर
AKAMAR KANE
Dec 02, 2025 02:01:09
Nagpur, Maharashtra
नागपुर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची नियुक्ती झालीय. नागपूर विद्यापीठाच्या 102 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला कुलगुरू पदाचा मान मिळाला आहे. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संचालिका व सल्लागार डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची निवड राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांनी केली. कुलगुरू पदासाठी आलेल्या अर्जापैकी 26 जणांची मुलाखती झाल्यानंतर पाच जणांची निवड करण्यात आली होती.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Dec 02, 2025 02:32:22
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:आठ नगर परिषद,नगरपंचायतीसाठी आज पार पडणाऱ मतदान ... अँकर - सांगली जिल्ह्यातल्या सहा नगरपरिषदाने दोन नगरपंचायतीसाठी आज मतदान पार पडत आहे.आठ नगराध्यक्ष पदांसाठी 49 उमेदवार तर 181 नगरसेवक पदाच्या जागेसाठी 514 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.आज या निवडणुकीसाठी पार पडणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.291 ठिकाणी मतदान केंद्र नियुक्त करण्यात आली असून जवळपास 1 हजार 780 कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. प्रामुख्याने ईश्वरपूर,तासगाव आणि जत नगरपरिषद ही संवेदनशील ठिकाण मानले जातात.आष्टा,विटा,पलूस शिराळा आणि आटपाडी नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे.
36
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 02, 2025 02:32:11
93
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 02, 2025 02:31:48
Pandharpur, Maharashtra:Anchor - सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत 11 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी लढत आहेत. 23 पैकी 2 जागांची निवडणूक पुढे ढकलल्याने आज 21 जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी 92 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.33 हजार 698 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. सांगोला नगरपालिका निवडणुकीत सुरुवाती पासूनच चुरस निर्माण झाली. भाजप शेकाप राष्ट्रवादीने एकटे पाडल्याचा आरोप करत करत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी टीका केली. त्याला भाजप नेत्यांनी सडेतोड उत्तर दिले. उप मुख्यमंत्रि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी सभा घेतली. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले. यानंतर सांगोला शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांसाठी थेट मुख्यमंत्री मैदानात उतरले त्यांनी कोणावरही टीका करण्यापेक्षा विकासाचे मुद्दे मांडले. यानंतर मतदानाला एक दिवस शिल्लक असताना माजी आमदार शहाजी बापू पाटील, सांगोल्या शहर विकास आघाडीच्या कार्यालयावर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी केली. यामुळे सांगोल्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. आरोप प्रत्यारोप झाले. आता आज मतदार कोणत्या पक्षाला सांगोल्याची नगरपालिकेची सत्ता देणार हे आज मतदान यंत्रावर बोट दाबून ठरवणार आहेत
90
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 02, 2025 02:00:19
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष, भाजप उमेदवाराच्या घराच्या मागील भागातून पैसे वाटतांनाचा व्हिडीओ व्हायरल, निवडणूक यंत्रणेकडे तक्रार अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष देत घराच्या मागील भागातून पैसे वाटतांना व्हिडीओ व्हायरल झालाय. राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ चे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील आणि भाजप नेते पांडूरंग चिल्लावार हे निवडणूकीत ५०० रूपयांच्या नोटा मतदारांना वाटत असल्याचा विडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बाबत निवडणूक विभागाकडे काँग्रेस नेते सुरज ठाकरे यांनी तक्रार केली आहे.  चिल्लावार यांचे घराचे मागे असलेल्या पिठाच्या गिरणीच्या शेड मधून हे वाटप होत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या व्हिडीओ मध्ये चिल्लावार यांचे हातात पाचशे रूपयांची गड्डी दिसत आहे. रक्कमेचे वाटप सुरू असल्याची तक्रार आली असल्याचं आणि ही तक्रार व व्हिडीओ आचारसंहिता प्रमुख यांचेकडे पाठवल्याचं राजुऱ्याचे तहसीलदार आणि नगर नगरपरिषद निवडणूक प्रमुख ओमप्रकाश गोंड यांनी सांगितलं आहे.
223
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 01, 2025 17:32:32
Satara, Maharashtra:सातारा - एपस्टाईन फाईल्स वरून अमेरिकेत गेल्या ६ महिन्यांपासून मोठा गदारोळ सुरू आहे. अमेरिकन संसद जेव्हा एपस्टाईन फाईल्सची माहिती जाहीर करेल तेव्हा त्याचे भारतीय राजकारणावर काय परिणाम होतील? असे ट्विट काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले आहे. यावर पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही फाईल ओपन झाल्यास महिना-खेरपर्यंत भारताला नवीन मराठी माणूस पंतप्रधान मिळू शकतो असे धक्कादायक विधान केले आहे. तसेच हे ट्विट नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केल्याने मराठी पंतप्रधान म्हणून यांची वर्णी लागू शकते असे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. एपस्टाईन फाईल्स हा विषय आंतरराष्ट्रीय आहे. अमेरिकेतील एका उद्योगपतीने अनेक बेकायदेशीर गोष्टी करत अनेक राजकीय लोकांना त्यात गुंतवले आहे. त्यामध्ये अनेक देशातील मोठ्या लोकांची नावे आहेत. त्यामध्ये आपल्या देशातील कोणाची नावे आहेत हाेणार आहे का हे पहावे लागेल असेही एका प्रश्नावर चव्हाण म्हणाले. सुमारे १० हजार पानांची ती फाईल अमेरिकेच्या संसदेने ताब्यात घेतली आहे. ती फाईल खुली करावी यासाठी ट्रम्प यांच्यावरती दबाव वाढत आहे. ती फाईल प्रकाशित झाली तर बरंच काही समोर येईल.
169
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 01, 2025 16:32:09
Bhandara, Maharashtra:भाजप साठी कोणी जे केलं मग तो मुसलमान असो किंवा कर्मचारी असो ते पवित्र होतात. ते करायला लावला असेल अंगणवाडी सेविकांना सांगितलं असेल की तुम्ही बाया गोळा करून आणा, त्यांना पैसे दिले असतील. आणि तुला मग म्हटलं असेल तुम्ही भाषण करून टाका आम्ही खूप सारे काही दिलं. मग या मोर्चा काढतात तर ज्यांनी हे भाषण केलं असेल त्यांनी नेतागिरी करावी अंगणवाडी सेविका पद सोडावा. आणि दुसऱ्या महिलेला संधी द्यावी.... मला सांगा ना.... मी आता भंडारा शहरात आहे. दहा वर्षे आधी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून या शहराला जे वचन दिले ते पूर्ण केले का? बोलण्यामध्ये माझ्या मित्र एक्सपर्ट आहे. त्यामध्ये दुमत नाही. ही देवेंद्र फडणवीस यांची स्टाईल आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाला काही लोक सिरीयस घेत नाही. त्यामुळे कितीही भाषण केलं तरी लोक एक्सेप्ट करायला तयार नाही. ते दाखवू नको आहेत जनतेचे पैसे लुटत आहे त्यांचे मतही चोरत आहेत. त्यामुळे हे सगळे करत असताना दुसऱ्या पक्षातले एकनाथ शिंदे तुला पक्ष असो किंवा अजित पवारांचा असो त्यांचेही लोक फोडायला लागलेले आहेत. यांना लोक विकत घेण्याची सवय लागली आहे. त्यामुळे बावनकुळेंनी केलेलं आहे. वैचारिक व्यवस्था संपलेली आहे त्यामुळे अशा लोकांना बोलण्यासारखं काहीच नाही. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी हे सत्तेतील पक्षांबद्दल तीव्र चीड आहे, नाराजी आहे. महाराष्ट्राला पुढे नेऊ शकते ते फक्त काँग्रेसचे असा विश्वास जनतेच्या मनात आहे. त्यामुळे परिवर्तनाची लाट आज महाराष्ट्र मध्ये पाहायला मिळते आहे. भंडारा गोंदिया दोन्ही जिल्ह्यांमध्ये आठही नगरपरिषदेत काँग्रेसच्या विजय पाहायला मिळेल.
150
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 01, 2025 15:07:54
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोली शहरांमध्ये शेतकरी भवन परिसरामध्ये हिंगोली पोलिसांच्या वतीने चार चाकी गाडीमध्ये एक कोटी रुपयांची रोकड जप्त केलीय. पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या चार चाकी गाडीतील संपूर्ण रोकड घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. ही रोकड एका खाजगी व्यापाऱ्याची असल्याची माहिती मिळत असून संबंधित व्यक्ती आमच्याकडे कॅश बाळगण्याबाबत परवानगी असल्याच सांगतोय तरी मात्र निवडणूक विभागाच्या वतीने संबंधित रोकड पडताळणी आणि प्राथमिक चौकशीच्या अनुषंगाने ताब्यात घेतलीय आणि ही संपूर्ण रोकड ची मोजणी करण्याचं काम सुरू करण्यात येत आहे. या संपूर्ण रोकडची तपासणी व प्राथमिक चौकशी निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत.
165
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 01, 2025 14:32:22
134
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 01, 2025 14:18:34
Parbhani, Maharashtra:अँकर- राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे परभणीच्या गंगाखेड येथे आले होते,यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारा दरम्यान सभा घेतली होती. या सभे दरम्यान धनंजय मुंडे यांनी महायुतीमधील आमदार रत्नाकर गुट्टे याच्यावर टीका केली होती,त्यानंतर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, मी शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज भरलं आहे. तो कारखाना विक्रीला निघाला,सगळे पैसे फेकल्याची मी जाहिरात सुद्धा दिलीय,धनंजय मुंडे यांचा जगतमित्र कारखान्याच्या नावावर 100 कोटी रुपयांचे शेअर घेतले आणि तेथील ट्रस्टची जमीन सुद्धा हडप केली. तेथील ट्रस्ट वाला कुठं आहे, तुम्ही मारून टाकलाय की काय,ते शेअर्सचे 100 कोटी आहेत, धंनजय मुंडे हा लबाड माणूस आहे,शंभर नाहटर हजार लबाड आणि धूर्त माणसं मेल्यानंतर जन्मलेली अवलाद आहे असा गंभीर आरोप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलाय. विशेष बाब म्हणजे या आरोपावर ठाम असल्याचे ही आमदार गुट्टे म्हणाले, संतोश देशमुख खून प्रकरणी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं असा आरोप केला होता असा प्रश्न केला असता यावर मला काही बोलायचं नाही,पण मला धनंजय मुंडे यांना अस म्हणायचं की तुमची परळी एवढी बदनाम कशामुळे झालीय, परळीत धनुभाऊ आमदार आहेत,तितजे काय होत नाही तिथं, तेथे मरणारे आणि मरणारे ही धनंजय मुंडे यांचे आहेत, मेलेले कुनापाशी होते याची माहिती घ्या अस आवाहन ही आमदार गुट्टे यांनी केलंय,त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी...
114
comment0
Report
Advertisement
Back to top