Back
अकोला में नौ बदमाशों ने अक्षय नागलकर की हत्या कर दी
JJJAYESH JAGAD
Nov 02, 2025 10:04:41
Akola, Maharashtra
जयেশ जगड , अकोला..
22 ऑक्टोबरला अकोल्यात घडला एक रहस्यमय थरार..एक युवक आईला ' जेवण बनव ' परत येतो म्हणत घरून निघाला आणि घरी परतलाच नाही.ही घटना आहे अकोला येथील अक्षय नागलकरची..
अक्षय नागलकर 22 ऑक्टोबरला आपल्या एका मित्रासोबत बाहेर गेला. मित्रावर विश्वास असल्याने अक्षय बिंधास्त त्याच्यासोबत एका धाब्यावर जेवण करायला सुद्धा गेला. आणि अक्षय सोबत नऊ जणांनी घात करून त्याची हत्या केली.
अक्षय घरी परतला नसल्याने आईने अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस ठाणीयात अक्षयच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली आणि प्रकरणातील रहस्य अखेर उघड झाले तब्बल तीन दिवसां नंतर..बेपत्ता असलेला अक्षय नागलकरला त्याच्याच 9 मित्रांनी निर्दयपणे जाळून ठार केल्याचं समोर आलं.
काय आहे नेमकी संपूर्ण घटना...
अक्षय नागलकर 22 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता.त्याच्या कुटुंबीयांनी अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिस यंत्रणांनी त्याचा तीन दिवस शोध घेतला.दरम्यान,अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे परिसरात अक्षयला मारून जाळल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. या घटनेमुळे अकोला शहरात मोठा संताप उसळला.पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी अक्षयला एका धाब्यावर जेवणासाठी बोलावलं आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. त्यानंतर आरोपींनी अक्षयचा मृतदेह शेतशिवारातील एका टीनच्या शेडमध्ये नेऊन पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने जाळून टाकला. इतकंच नव्हे तर आरोपी मृतदेहाची राख पूर्णतः नष्ट होईपर्यंत तिथेच थांबले आणि नंतर ती राख गायब करून संपूर्ण टीन शेड रंगवून टाकली.
कोण होता अक्षय नागलकर..
अक्षय नागलकर हा गोरक्षक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून ओळखला जात होता.त्याच्या खुनामागे वैयक्तिक वाद असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला चार आरोपींना ताब्यात घेतलं या मध्ये मुख्य आरोपी असलेल्या चंद्रकांत बोरकरचाही समावेश होता. पोलिसांनी उर्वरित पाच आरोपींचा शोध सुरू ठेवला, यानंतर चार आणखी आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं तर एक आरोपी फारच राहिला.शेवटी पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर शेवटच्या आरोपीपर्यंत ही पोलीस पोहोचली आणि या हत्याकांडातील नवही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं.
पोलीस तपासा त आतापर्यंत काय निष्पन्न झालं ?
पोलिसांनी आतापर्यंत अक्षय नागरकर हत्याकांड प्रकरणात नऊ आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी खुनाची कबुली दिली असून अकोल्यातील मोर्णा नदी पात्रातून पोलिसांनी बंदुकीच्या गोळीचा वापरलेला काडतूस तर बाळापूर येथील नदी नदीपात्रातून हाडांचे तुकडे शोधून काढल्याचा दावा केला आहे, जे तपासासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत.या घटनेचे नियोजनपूर्वक स्वरूप लक्षात घेता, पोलिसांसमोर या प्रकरणाचा तपास अधिकच गुंतागुंतीचा ठरण्याची शक्यता आहे. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, आरोपींची संख्या आणि अत्यंत अमानुष पद्धतीने केलेली हत्या या सगळ्या गोष्टींमुळे हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे.
अकोला पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पुढील तपासात आणखी काही महत्वपूर्ण तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात
पोलिसांन सामोर आव्हान..
रहस्यमय आणि क्रूर अशा दोन्ही शब्दांचा प्रत्यय देणाऱ्या या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या भीषण हत्याकांडानंतर पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आरोपींचा हेतू, खुनामागचं कारण आणि मृतदेहाशी संबंधित सत्य हे सर्व उघड करण्यासाठी पोलिसांची कसोटी लागणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 02, 2025 15:52:550
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 02, 2025 15:30:200
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 02, 2025 15:17:260
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 02, 2025 15:00:340
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 02, 2025 14:35:580
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 02, 2025 14:29:140
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 14:00:230
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 13:54:030
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 02, 2025 13:49:410
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 02, 2025 13:32:190
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 02, 2025 13:16:370
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 02, 2025 13:02:450
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 13:02:360
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 13:01:040
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 13:00:210
Report