Back
ठाणे पालिका की प्रारूप मतदाता सूची में घोटाला, राजन विचारे ने उजागर किया
SKShubham Koli
Dec 02, 2025 15:16:31
Thane, Maharashtra
ठाणे पालिकेच्या प्रारुप मतदार यादीमध्ये झोल शिवसेना नेते राजन विचारे यांनी केला पर्दाफाश १० हजार दुबार मतदार, वेगवेगळ्या प्रभागात ६ हजार एकच नावे, फक्त नाव आणि आडनाव असलेले ३ हजार मतदार ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी नुकताच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमधील महत्त्वाच्या गंभीर चुकांचा पर्दाफाश शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी आज केला आहे. ठाणे पालिका हद्दीत १० हजार ६५३ दुबार मतदार, वेगवेगळ्या प्रभागात ६ हजार ६४९ एकच नावे, फक्त नाव आणि आडनाव असलेले ३ हजार ४८५ मतदार याद्यांमध्ये आहेत. ठाणे पालिकेच्या या प्रारुप मतदार यादीमध्ये झोल असून गंभीर चुका असताना जिल्हा निवडणुक आयोग तसेच पालिकेचे निवडणुक अधिकारी गप्प का? असा सवाल विचारे यांनी आज Taken पत्रकार परिषदेत केला. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावर हरकती व सूचना देण्यासाठी २७ नोव्हेंबर शेवटची तारीख ठरवण्यात आली परंतु ठाणे महापालिकेने मतदार यादी देण्यास उमेदवारांना विलंब होत असल्याने निवडणूक आयोगाने हरकती घेण्याची ३ डिसेंबर अशी करण्यात आली. या सर्व प्रभागाच्या याद्या घेण्याकरिता गेल्या असताना असे लक्षात आले की संपूर्ण याद्यांच्या एकत्रीकरण पुस्तके बनवून गठ्ठे देण्यात आले. हे गठ्ठे फोडून पुरवण्या जोडून याद्या तयार करायला दोन ते तीन दिवस लागले त्यानंतर प्रत्यक्ष काम करताना अनेक अडचणी येऊ लागल्या असल्याचे मत विचारे यांनी व्यक्त केले. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेत मतदार यादीतील घोळ असलेले पुरावे देण्यात आले.. निवडणुक आयोग सरकारचे बटिक म्हणून काम करत ठाण्यात मतदार यादी मधील गोंधळ मोठ्या प्रमाणात असल्याने एवढ्या कमी कालावधीमध्ये त्याच्या हरकती घेता येणे शक्य नसल्या ने राजन विचारे यांनी सॉफ्टवेअरद्वारे निवडणूक आयोगाच्या काही चुका शोधून काढल्या. या चुका इतक्या गंभीर आहेत की निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे नावे घुसविण्यात आलेल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला. तसेच निवडणुक आयोग सरकारचे बटिक म्हणून काम करत असल्याचा आरोप विचारे यांनी केला.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DVDinesh Vishwakarma
FollowDec 02, 2025 15:20:590
Report
ADArjun Devda
FollowDec 02, 2025 15:20:390
Report
VRVIJAY RANA
FollowDec 02, 2025 15:20:190
Report
MDMahendra Dubey
FollowDec 02, 2025 15:20:090
Report
NSNiroj Satapathy
FollowDec 02, 2025 15:19:52Koraput, Odisha:କୋରାପୁଟ - ବୈପାରିଗୁଡ଼ା ଅବକାରୀ ବିଭାଗ ଦ୍ଵାରା ବାଇକ ରେ ଗଞ୍ଜେଇ ଚୋରା ଚାଲାଣ ସମୟରେ ଜବତ। ବାଇକ୍ ଜବତ। ଜଣେ ଗିରଫ। ବାଇଟ - ଅବକାରୀ ଓ ଆଇ ସି, ବୈପାରିଗୁଡ଼ା.
0
Report
RSR.B. Singh
FollowDec 02, 2025 15:19:390
Report
KCKashiram Choudhary
FollowDec 02, 2025 15:18:280
Report
KCKashiram Choudhary
FollowDec 02, 2025 15:18:110
Report
0
Report
JGJugal Gandhi
FollowDec 02, 2025 15:17:540
Report
G1GULSHAN 1
FollowDec 02, 2025 15:17:330
Report
BKBRAJESH KUMAR
FollowDec 02, 2025 15:17:090
Report
SPSohan Pramanik
FollowDec 02, 2025 15:16:470
Report
0
Report