Back
पाचोरा में शिवसेना शिंदे गट की सभा: गुलाबराव पाटील की फटकेबाजी
WJWalmik Joshi
Nov 02, 2025 13:31:06
Jalgaon, Maharashtra
जळगाव
पाचोरा येथे आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची फटकेबाजी !
माझ्या आयुष्यातली ही सर्वात कठीण सभा आहे. कारण मी राज्याचा मंत्री एका पक्षाचा नेता जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, एका आमदाराचा काका आहे, अशा चार-पाँच अडचणीत मी या सभेत उभा आहे. दुसरीकडे सर्व पत्रकार उभे आहेत की, गुलाबराव पाटलांची नेमकी भूमिका काय आहे?
किशोर पाटील यांचा राग बरोबर आहे. भाजपाने माझ्या मतदारसंघात चांगले काम केले. पण आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात काम केले नाही, हे मी पण मान्य करतो, गुलाबराव पाटील याांच्या तक्रारीच्या समर्थन
माझ्यावर पण एकदा अन्याय झाला होता. मी तर मोदी साहेबांच्या सभेत गोंधळ घातला होता. पाच वर्ष मी मेहनत करायची आणि ऐनवेळी कुणी गोंधळ घालत असेल तर प्रत्येक माणसाच्या करिअरचा विषय असतो. किशोरपाटलांच्या सांगण्यात एक तडतड आहे, कळकळ आहे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेचे केले समर्थन
सर्व ठिकाणी युती करावी हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेला आहे. पण स्थानिक परिस्थितीवर पण काही निर्णय होतील, असे चित्र आहे.
माजी आमदार दिलीप वाघ हे बंद पडलेले दुकान तुम्हीच चालू केलं. दिलीप वाघांना तुम्हीच मोठे केलं आणि फेडरेशनमध्ये बिनविरोध निवडून दिले. किशोरआप्पा मला मी दोष द्यायचे की गुलाबभाऊ तुम्हाला माणसं ओळखता येत नाही. पण अमोल शिंदे तुमचाच, वैशूताई तुमचीच... हे आपले कधीच नव्हते तुम्हीच आणले. राजकारणात आंधळे प्रेम करतात पण कोणी कोणी धोके देतात.
जमीर बेचनेवालों से हमने दोस्ती नही की वरना वक्त के पहिले अमीर हो जाते. हम एक साथ दोन अशा नही करते वरना वक्त के पहिले फकीर हो जाते, अशी शेरोशायरी करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांचे कान टोचले
उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब यांच्यावर आम्ही कधीच टीका केली नाही. कारण त्यांच्यावर टीका करण्याची आमची लायकी नाही. आपला माल संजय राऊत पण ते आजारी पडलेत. फ्राय करके खाता हु मै उसको.
आमदार चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाचे असले तरी मुक्ताईनगरमध्ये त्यांचे एकच घर आहे. पण कुणाशी लढले अनाथांचे नाथ एकनाथ... अजूनही लढत आहे. पण हे दोघं (आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील) माझ्यावर दादागिरी करतात. पण मी तुमचा मोठा काका आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी दोघांना मिश्किल टोला लगावला.
आज उबाठा पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात येत आहेत. त्यांना दुसरा पर्याय नाही. दुसऱ्या पक्षात जाऊन काय मिळणार?
मेरे जिस्म पर बाळासाहिताकारा नाम है. मै आज जो हू बाळासाहेब की वजह से हू... अशा शेरो शायरीद्वारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना दिला उजाळा
किशोर पाटील पोलीस असताना शिवसैनिकांनाच मारायचे आणि आता शिवसेनेमुळेच आमदार झालेत मी देखील टपरीवाला आता मंत्री झालो पोलीस मागे पुढे असतात बरं वाटतं.
Shivसैनिक माझ्याही अंगात आहे. परंतु मंत्रि म्हणून जबाबदारीने वागावे लागेल, असे म्हणत, आमदार किशोर पाटील यांच्या स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट भाष्य करणे टाळले. परंतु पाचोरा भडगाव मधील स्थिती पक्ष नेतृत्वापर्यंत निश्चित पोहोचवेल. मला खात्री आहे की ते काही तोडगा काढतील. परंतु या ठिकाणी आता तोडगा काढण्याच्या पलीकडे स्थिती झाली आहे. आमदार किशोर पाटील यांची गाडी आता 120 च्या बाहेर गेलेली आहे.
हमारी राहो मे काटे भरी हुई है... मगर मंजिल साफ है... भगवा उचा उठाना है और हिंदुत्व को आगे बढना है, मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुचकरीत्या कार्यकर्त्यांना दिला पाचोरा भडगाव मध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा संदेश.
तुमच्याप्रमाणे (आमदार किशोर पाटील यांना उद्देशून) मलाही अनेक लोक सोडून गेले पण आपले मन साफ आहे. तुमच्याप्रमाणे विरोधात कितीही लोक एकत्र येऊ द्या. पण तुम्ही लोकांची काम केली आहेत. जनता वेडी नाहीये पायातील काटा काढणाऱ्याची ही उपकार विसरत नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. म्हणूनच पाचोरा भडगाव मतदार संघात तुम्हाला घवघवीत यश मिलेल असं मला विश्वास आहे.
मुक्ताईनगर आणि पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे डीपीडीसीतून सर्वाधिक निधी या दोघा तालुक्यांना देण्याचे आश्वासन देखील यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले गेले हे. पण गेलेल्यांनाच मंत्रिपद मिळते. तू पण जा तुला पण मंत्रिपद मिळेल (कार्यकर्त्याला उद्देशून)... पुढच्या वेळेस मी निवडणुक लढेल किंवा नाही हे मला माहीत नाही माझे वारस आहात पुढे चालत राहा.
मला यावेळी मुस्लिम समाजाने मते दिली नाहीत. पण आमदार किशोर पाटील यांना दिले. मी त्यांना (मुस्लिम बांधव) यांना इतके आय लव यू, म्हटले पण त्यांनी सेम टू यु म्हटले नाही. त्यांनी मला नो वेअर केलं यावेळेस. ठीक आहे त्यांना वरतून फतवा आला की गुलाबराव पाटलांना मतदान करायचं नाही. पण मी आता निवडून आलो मंत्री झालो. आता ते माझ्याकडे येतात मी परत त्यांना आय लव यू म्हणतो.
निवडणुका लागल्यावर विरोधक मतदार संघात फिरतात. आता तर अशी स्थिती आहे की कोणी मरायच्या एक तास आधी हजर होऊन जातात. पण निवडणूक आटोपल्यावर आम्हीच मतदारसंघात फिरतो. बाळासाहेब म्हणायचे सत्ता आली तर माजू नका आणि सत्ता गेली तर लाजू नका अशा बाळासाहेबांच्या मी शिवसैनिक आहोत.
आमदार किशोर पाटील यांच्या प्रमाणे मी सलग तीन वेळेस पहिला टप्प्यात आमदार होऊ शकलो नाही. दोन वेळेस चालू नंतर ब्रेक मारला त्यानंतर पुन्हा 17 नंबरचा फॉर्म भरला. त्यानंतर मी पण हॅट्रिक केली.
माणसांनी तरी कंजूसी केली. पण दीड हजार घेतलेल्या माझ्या बहिणीने छप्परफाडके मतदान केले आम्हाला. पहिले बाई माणसाकडे पैसे मागायची पण आता उलटा कार्यक्रम झालेला आहे. डायरेक्ट खात्यात पैसे येतात. लाडकी बहीण एसटीमध्ये थाटात बसते आणि अर्ध्या टिकतात थेट पंढरपूर जाते. ही किमया शिंदे साहेबांचे आहे.
मुलगी शिकत नाही, आत्महत्या करते हे कळताच रात्री दोन वाजता शिक्षण मंत्री आणि प्रधान सचिवांना फोन लावून आदेश देतात की उद्यापासून शिक्षणासाठी कुठलीही आत्महत्या करू नये मोफत शिक्षणाचा आदेश करणारा एकमेव नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहेत.
लोकसभेत आमच्या 17 सीट त्यांच्या 31 सीट...गुलगुले चालू होऊन गेले कोण मुख्यमंत्री, मंत्री कोण? पण एकनाथ शिंदे साहेब सांगायचे सत्ता आपली येणार आहे. खटाखट निर्णय घेतले. एक रुपयात विमा, अर्ध टिकीट महिलांना पंधराशे रुपये, शासन आपल्या दारी... अडीच वर्षात सतरा वेळेस येणार एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. रात्री तीन वाजेपर्यंत काम करणारा एकच मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे...अशा माणसाची आम्ही कार्यकर्त्या होत याचा आम्हाला गर्व आहे. त्यामुळे कितीही त्रास देणारी येऊ द्या... आम्ही पण कच्चे गुरुचे चेले नाहीत. अभी भी जान बाकी है... शेर अभी भी जिंदा है...!
Sound byte : गुलाबराव पाटील, पालकमंत्री जळगाव
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PCPranay Chakraborty
FollowNov 02, 2025 19:00:190
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowNov 02, 2025 18:45:430
Report
DMDILEEP MISHRA
FollowNov 02, 2025 18:45:350
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 02, 2025 18:45:26Noida, Uttar Pradesh:कांस्टेबल द्वारा सरकारी लेवल पर से गोली मारकर खुदकुशी करने के मामले में वॉक थ्रो
0
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowNov 02, 2025 18:45:070
Report
0
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 02, 2025 18:31:06Noida, Uttar Pradesh:कांस्टेबल द्वारा सरकारी लेवल पर से गोली मारकर खुदकुशी करने के मामले में वॉक थ्रो
0
Report
OSONKAR SINGH
FollowNov 02, 2025 18:30:560
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 02, 2025 18:30:41Noida, Uttar Pradesh:दौसा
कैबिनेट मंत्री डॉ किरोड़ीलाल मीणा का छापा
दौसा भरतपुर बार्डर पर मिल्क मेकिंग फैक्ट्री पर छापा
महवा थाना क्षेत्र में स्थित है फैक्ट्री
0
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 02, 2025 18:30:320
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 02, 2025 18:30:19Noida, Uttar Pradesh:दौसा
कैबिनेट मंत्री डॉ किरोड़ीलाल मीणा का छापा
दौसा भरतपुर बार्डर पर मिल्क मेकिंग फैक्ट्री पर छापा
महवा थाना क्षेत्र में स्थित है फैैक्ट्रि
0
Report
0
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowNov 02, 2025 18:16:040
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowNov 02, 2025 18:15:540
Report
VKVIKRANT KUMAR
FollowNov 02, 2025 18:15:400
Report